खुपचं भाग्यवान असतात या मुली, ज्या घरात जातात.‌. तेथे साक्षात लक्ष्मी नांदते..!!

मित्रांनो, मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्या कोणत्याही राशीच्या असल्यात, तरी त्या आपल्या कुटुंबासाठी, घरासाठी लक्ष्मीचं स्वरूप असतात. ज्याही घरात त्या जातात त्या घराला नंदनवन बनविण्याचे अंगभूत गुण त्यांच्यामध्ये असतात.

लग्न झालेल्या मुली जेव्हा एक घरटं सोडून दुसऱ्या घरट्यात जातात तेव्हा जरी त्यांना आयुष्याशी तडजोड करावी लागत असेल तरीही त्या हसत हसत नविन आयुष्यात आनंदाने रमून जातात. नविन घराला स्वतः चं घर मानून त्याचा स्वर्ग बनवतात.

तर मित्रांनो, लग्न करतांना आपण ज्योतिषाकडे कुंडली मांडून बघतो, गुणही जुळवून बघितले जातात. का..?? तर या सर्व बाजूंना एक तात्विक आधार आहे. या सर्व बजू बघून आपण लग्नाच्या बोलणीसाठी पुढे सरकतो. तर मित्रांनो, लग्नासाठी एक योग्य मुलगी कशी असावी कोणते स्वभाव गुण त्या मुलींमध्ये असावे हे सर्व आपण लग्न जुळवतांना बघत असतो.

तर सुयोग्य अशी प’त्नी कशी असते, जी आपल्या घरासाठी योग्य पत्नी आणि आई वडिलांसाठी योग्य सून असेल. अशा मुली खुपचं नशिबवान ठरतात, ज्योतिष शास्त्रानुसार रुंद कपाळाच्या मुलीं खुप भाग्यवान असतात‌. ज्योतिषशास्त्रात आणि समुद्रशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे अशा मुलींना अतिशय भाग्यशाली मानले गेले आहे. अशा मुली ज्या कुणाच्याही घरी जातात, त्या घरात धनाची कमतरता कधीही भासत नाही.

या मुलींच्या शरीरावर वेगवेगळ्या भागांवर असलेल्या तिळांचे महत्त्व समुद्र शास्त्रात सांगितले आहे. अशा मुली ज्यांच्या उजव्या अंगापेक्षा डाव्या अंगावर जास्त तीळ असतात, त्या मुलींना समुद्र शास्त्रानुसार भाग्यशाली मानलं गेलं आहे. या मुली ज्या कुटुंबात लग्न करुन जातात त्या घराची सुबत्ता आणि मानसन्मान तिन पटींनी जास्त वाढतो.

ज्या मुलींच्या पायाच्या तळव्यावर जन्मतः शंख, कमळ इ. ची जन्मखुण असते त्या मुली आपल्या कुटुंबासाठी अत्यंत शुभ असतात. जर अशा मुलींच्या पायाच्या तळव्याला वरिल पैकी एकही जन्मखुण असेल तर ती मुलगी स्वतः एका मोठ्या पदावर किंवा हुद्द्यावर तर पोहचते तसेच आपल्या पूर्ण कुटुंबासाठी देखील अतिशय भाग्यशाली ठरते.

या व्यतिरिक्त समुद्र शास्त्रानुसार ज्या मुलींचा अंगठा रुंद, किंवा गोल आणि लालसर असतो, त्या मुलींच्या कुटुंबाला जगातील सर्व सुख आणि ऐश्वर्य अनुभवायला मिळते. तसेच लांब बोटांच्या मुली आपल्या पतीसाठी अत्यंत भाग्यशाली असतात. त्या मुलींचे पती नोकरी व व्यवसायात खूपच प्रगती करतात.

ज्या मुलींची मान लांब असते, त्या देखील सुख-समृद्धीच्या बाबतीत भाग्यशाली असतात. त्यांचे पती खूप पैसे कमवतात. तसेच त्या आपल्या कुटुंबासाठी देखील खूप भाग्यशाली असतात. प्रत्येक क्षेत्रात त्या अव्वल असतात तसेच त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा देखील समाजात मान-सन्मान वाढतो.

टिप – कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर कुणीही अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Comment