स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… या जगामध्ये देवाने मानव जातींमध्ये सुद्धा तीन प्रकारच्या जाती निर्माण केल्या आहेत. त्या अनुक्रमे पुरुष महिला आणि किन्नर अशा आहेत. आपल्याला किन्नरांबद्दल माहीती आहेच. ते बर्याच ठिकाणी पाहिले गेले आहेत किंवा बरेच लोक तर त्यांच्याशी सलोख्याने बोलतही असतात आणि त्यांच्यापैकी काहींचे या किन्नर लोकांशी मैत्रीपूर्ण सं’बंध देखील असतात.
आपण या विषयी बघितलेच असेल की, कुणाच्या घरी लग्नसोहळा किंवा काही अन्य कार्यक्रम असेल तर त्यावेळी किन्नर लोकांना तिथे नृत्यासाठी बोलावतात. तुम्ही त्यांच्याबद्दल कधी हे माहीत करून घेतलं आहे का, की ते कोणत्या ध’र्माला मानत असतात, कोणत्या देवाची पूजा करतात, त्यांची वैशिष्ट्ये आणि चालीरीती काय आहेत? नक्कीच नाही.
मित्रांनो म्हणूनच आज आपण त्यांच्याबद्दल, तसेच त्यांच्या रोजच्या राहणीमानाबाबत काही जाणून घेणार आहोत. आपल्या हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये न’पुंसकांचा खूप आदर आहे. आज आपण त्यांच्या लग्नाबद्दल आणि त्यांच्या सु’हागरात बद्दल जाणून घेणार आहोत. यासाठी आपण महाभारतातील एक कथा जाणून घेणार आहोत, त्यावेळी पांडव आणि द्रौपदी यांचा विवाह झाला होता. तेव्हा द्रौपदीने सर्वांसाठी एक नियम केला होता.
अर्जुनाने तो नियम पाळला नाही आणि त्यामुळे त्याला एकदा इंद्रप्रस्थातून हाकलून दिले आणि वर्षभरासाठी तीर्थयात्रेला पाठवले. तेथून निघून गेल्यावर अर्जुन ईशान्य भारतात गेला आणि तिथे त्याला उलुपी नावाची नागकन्या भेटली. नागकन्या उलुपी आणि अर्जुन एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकमेकांवर प्रेम करू लागत असतात. काही दिवसांनी उलुपी आणि अर्जुन लग्न करतात.
लग्नानंतर काही काळातच उलुपीने एका मुलाला जन्म दिला. दोघेही मिळून त्याचे नाव अरावन असे ठेवतात. अरावणच्या जन्मानंतर अर्जुन त्या दोघांना सोडून पुढच्या प्रवासाला निघतो. त्यावेळी अरावण आपल्या आईसोबत नागलोकातच राहत होता. अखेरीस, नागलोक सोडून, अरावण त्याचे वडील अर्जुनाकडे परत येतो आणि नेमके त्याच वेळेस कुरुक्षेत्र येथे महाभारताचे यु’द्ध सुरू झालेले होते.
आणि त्यानंतर अर्जुन त्याला यु’द्ध भूमीवर यु’द्धासाठी पाठवतो. या यु’द्धात एक वेळ अशी येते जेव्हा पांडवांना विजयासाठी कालीमातेच्या चरणी स्वइच्छेने एक नर ब’ळी द्यायचा असतो आणि अशा कठीण प्रसंगी अरावण स्वतः पुढे येतो. पण तो एक अट घालतो की अवि’वाहित राहून तो त्याग करणार नाही. पण त्यांना आपली मुलगी द्यायला कोणी देखील तयार होत नाही. कारण मुलगी दुसऱ्या दिवशी विधवा होईल हे त्यांना माहित होते.
मग अशा वेळी श्रीकृष्ण स्वतः मोहिनीचे रूप धारण करतात व अरावनाशी लग्न करतात. त्या योजनेनुसार दुसऱ्या दिवशी अरावण स्वतः काली मातेला आपले म’स्तक अर्पण करतो. त्यानंतर, म्हणजे अरावणाच्या मृ’त्यूनंतर, भगवान श्रीकृष्ण दीर्घकाळ असा शोक व्यक्त करत असतात. श्रीकृष्ण हे पुरुष असून शुद्ध स्त्रीच्या रूपात अरावनशी विवाह करतात.
त्यामुळे स्त्री या रूपातील पुरुष म्हणून ओळखले जाणारे किन्नर एका रात्रीसाठी अरावण देवतेशी लग्न करतात. किन्नर लोकांचे पूजलेले देवता हे अरावण आहेत. वर्षातून एकदा हे लोक भगवान अरावनशी लग्न करत असतात. पण हे लग्न केवळ एका दिवसाचं असत आणि दुसऱ्या दिवशी अरावनाचा मृ’त्यू होतो. त्यामुळे किन्नर हे विधवा होतात. तामिळनाडूत अनेक ठिकाणी भगवान अरावनचे मंदिर आहेत.
पण अरावन देवाचे सर्वात प्राचीन आणि मुख्य मंदिर हे विल्लूपुरम जिल्ह्यातील कुवगाव येथे आहे. या मंदिराला कुथांडावर मंदिर म्हणून ओळखले जात. या मंदिरात केवळ भगवान अरावनचीच पूजा केली जाते. कुवगाव येथे प्रत्येक वर्षी तामिळ नववर्षच्या पहिल्या पोर्णिमेपासून 18 दिवस चालणाऱ्या महोत्सवाला सुरवात होते.
या उत्सवात केवळ भारतातीलच नाही तर जवळपासच्या इतर देशातील किन्नर देखील हजेरी लावतात. पहिले 16 दिवस येथे किन्नर देवाची आराधना करत नाचतात आणि गातात. वर्तुळ बनवून सर्व किन्नर आनंदाने नाचतात आणि आपल्या लग्नाची तयारी करतात. यावेळी येथील वातावरण अगदी उत्साहाचं आणि प्रसन्नतेचं असत. 17 व्या दिवशी पुजाऱ्याच्या हाताने पूजा करून अरावन देवाला नारळ वाहिले जातात.
त्यानंतर अरावन देवासमोर पुजाऱ्याच्या हाताने किन्नरांच्या गळ्यात मंगळसूत्र घातले जाते, ज्याला तिथे थाली म्हणतात. त्यानंतर हे किन्नर अरावन देवासोबत लग्न करतात. 18 व्या दिवशी अरावन देवाच्या प्रतिमेला कुणगावात फिरविण्यात येत आणि मग ती प्रतिमा तो डून टाकतात. नवरीच्या वेशात असलेले किन्नर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तो डून टाकतात, तसेच अरावन देवासाठी केलेला सर्व शृं’गार देखील पुसून टाकतात आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात.
विधवेच्या वेशातील हे कि’न्नर अरावन देवाच्या मृ’त्यूमुळे दु:खी होऊन आलाप करतात, खूप र’डतात. यानंतर पुढील वर्षीच्या पहिल्या पौर्णिमेची आस धरत आपल्या आपल्या घराकडे निघून जातात. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना या काही गोष्टींबद्दल माहीत सुद्धा नसते. हे लग्न केवळ एक दिवसाचे असते. त्यांचे लग्न हे त्यांच्या वि वाहाच्या पहिल्या रात्रीच संपते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!