कितीही पैसे कमवा तरीही तुमचं पाकीट कायम रिकामं राहतं का ??? तर करा हे खास उपाय ज्यामुळे माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील..!!

काही लोक भरपूर पैसे कमवतात पण तरीही त्यांची पर्स रिकामीच असते. तुम्ही बर्‍याच लोकांना असे म्हणताना ऐकले असेलच की अरे पर्स मध्ये कितीही पैसै असूद्या ते केव्हा संपतात त्याचा पत्ताच लागत नाही. ते कुठे आणि कसे वापरले जातात हे देखील कळत नाही.

आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा असतानाच संपत्ती प्राप्त होते आणि ती टिकून राहते. तेव्हाच पर्समध्ये पैसे राहतात असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणून पर्स ठेवताना खालील मुख्य गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या…

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या पर्समध्ये माता लक्ष्मीचा फोटो अवश्य ठेवावा. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील आणि आपली पर्स कधीही रिकामी होणार नाही.

दुसरा उपाय म्हणजे आपल्या पर्समध्ये थोडेसे चिमूटभर तांदूळ ठेवावे. असे केल्याने आपले पैसे त्वरीत खर्च होणार नाहीत.

जर तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पैसे ठेवायचे असतील तर तुमच्या पर्समध्ये खाण्याचे पदार्थ अजिबात ठेवू नका.

आपल्या पर्समध्ये धार्मिक आणि पवित्र गोष्टींना स्थान द्या.

तसेच आपण पर्समध्ये रुद्राक्ष देखील ठेवू शकता. असे केल्याने तुमच्या पर्समध्ये सतत सकारात्मक ऊर्जा वास्तव्य करेल.

वास्तुशास्त्रानुसार आणखी एक उपाय सांगितला आहे. हे आपणास जरासे विचित्र वाटेल पण त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा हा होईल.

कधीही फाटकी, जीर्ण अशी खराब झालेली पर्स आर्थिक हानी पोहोचवते असे मानले जाते. बरेच लोक जुन्या बिले, पावती तसेच ठेवतात, अशा गोष्टींचा वाईट परिणाम होऊन राहुची नाराजी आपणाला भोगावी लागते.

तर मित्रांनो वरीप्रमाणे उपाय केले तर नक्कीच आपले नशीब चमकेल आणि माता लक्ष्मीची पुर्ण कृपा आपल्यावर राहील. आपले पाकिट कधीच रिकामे राहणार नाही.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment