कितीही उपासना करुन देव प्रसन्न का होत नाही.? जाणून घ्या..!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! खूप लोक असे म्हणतात की आम्हाला देव प्रसन्न होत नाही. आम्ही वर्षानुवर्ष एवढी उपासना करून ही आम्हाला देव का प्रसन्न होत नाही. तर आम्ही या विषयाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

आजकाल प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये संकटे येत असतात. मग ती संकटे कोणतीही असो. मी ही संकटे मर्यादा च्या बाहेर जात असतील ती संकटे कमी व्हायचे सोडून वाढत जातील तर तेव्हा व्यक्ती खूपच नाराज होते आणि डिप्रेशन मध्ये जाते. आयुष्यात अशी कोणती गोष्ट नाही आहे की ज्यावर मार्ग नाही.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की देव का प्रसन्न होत नाहीत –

पहिली गोष्ट म्हणजे पूजापाठ अमावस्या पौर्णिमा हे सर्व करूनही लोकांची तक्रार असते की आमच्यावर देव प्रसन्न होत नाही हे सर्व करून तुमच्या दैनंदिन आयुष्यात काही चुका होत असतील तर तुम्हाला या संकटांशी सामोरे जावे लागते.

तुम्ही जर चुका करत राहिला तर देव तुमच्यावर प्रसन्न होत नाहीत. त्यातील पहिली गोष्ट आहे आपली कुल देवता . सर्वप्रथम आपल्याला गणपती नंतर आपल्या कुलदेवतेचे स्मरण केले पाहिजे. पूजा, आरती केली पाहिजे.

तुम्हाला तुमची कुलदैवत माहित नसेल तर सरळ सरळ ओम कुलदेवताय नमो नमः हा जप रोजच्या रोज कमीत कमी पाच वेळा तरी देवघरा समोर बसून करायला पाहिजे. असे केल्याने तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होते व तुम्हाला शुभ आशीर्वाद प्रदान होतात. तिच्याकडे वर्षातून एकदा नक्की जात जावा.

दुसरी गोष्ट दारात अडगळ असेल दारात खूप सार्‍या चपला असतील जुने चपला व बुट पडलेले असतात. व त्याचा घाण वास येत असतो. आई घाण पहिला तुमच्या दारातून काढून टाका. कारण दारातूनच तुमच्या घरात लक्ष्मी येते.

तुम्ही घरात अन्नधान्य जे काही असतं ते दारातूनच आत आणता त्यामुळे तुमचं दार, अंगण नेहमी स्वच्छ ठेवा. ज्या काही चपला व बूट खराब झालेल्या आहेत त्या टाकून द्या. दारात स्वस्तिक शुभचिंतक रांगोळी काढायला विसरू नका.

आपल्या दारात तुळशी असते तर तिथे सुद्धा काही घाण ठेवू नका ती जागा सुद्धा स्वच्छ ठेवा. कपडे वाळायला दुसरीकडे घाला. त्या कपड्यातील पाणी तुळशीवर पडायला नको. तुळशीच्या वरती जर तुमच्याकडे वाळत घालायच्या दोऱ्याच्या असतील तर त्या काढून टाका.

जर तुमच्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांचा सत्कार करा. त्यांना मानसन्मान द्या. ते तुमच्या आवडीचे असो किंवा नसो. कारण पाहुणे देव स्वरूपात आलेली आहे हे विसरू नका. त्यासाठी तुमच्याकडून जेवढे जमेल तेवढं करा.

जर एखादी स्त्री तुमच्या घरात वर्षातून एकदा येत असेल तर तिची ओटी भरायला विसरू नका. कोणतीही स्त्री तुमच्या घरी आली तर तिला हळद कुंकू लावून, चहा पाण्याला विचारायला विसरू नका. जर स्त्री मोठी असेल तर तिला नमस्कार करायला विसरू नका.

घरांमध्ये मोठ्याने टाळ्या वाजवणे , शिट्ट्या वाजवणे म्हणजे शिळ घालण्याची बऱ्याच जणांना सवय असते. ही सवय अतिशय चुकीची आहे. काहींना अंगावर थापा मारण्याची सवय असते. अंगा बडवणे हे खूप अपशगुन असते.

घरातील औषधांचे प्लास्टिक व कागद कोठेही टाकू नये. असे केल्याने घरातील आजारपण कधीच संपत नाही. देवघरात वाहिलेली फुले रोज झाडा खाली टाकून द्यावे ती घरामध्ये पिशवीमध्ये घालून साठवू नये. या अतिशय लहान लहान गोष्टी आहे या गोष्टी पाळल्याने कोणतीही अडचण कधीही येणार नाही.

दात होट खाऊन मुलांना स्वयंपाकातील वस्तूने किंवा झाडूने मारणे. यामुळे लहान मूल रडते तर त्या रडायचा आवाज घरामध्ये येऊ देऊ नका. लहान मुलांना मारणे खूप मारणे चुकीचं आहे. घरामध्ये एकमेकांना अपशब्द बोलू नका.

घरामध्ये वास्तूविषयी बोलू नका. म्हणजे या घरात मला सुखच नाही आहे. असे शब्द वापरू नका. तुम्ही जेवढे सकारात्मक बोलत रहायला तेवढे सकारात्मक रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायावर तुमचे प्रेम पाहिजे त्या व्यवसायावर कधीही तक्रार करू नका.

आणि मग बघा तुमच्या घरामध्ये भरभराटी कसे होते. तुमच्याकडे काही कामगार कामाला असतील तर त्यांना भरपूर मान द्या. त्यांच्या गरजेला मदत करा. यामुळे तुमच्या व्यवसायात तुम्हाला यश लाभेल. घरामध्ये ओला कचरा व खरकटी भांडी तसेच ठेवू नये. कचरा लगेच टाकून द्यावा. खरकटी भांडी जेवण झाल्यानंतर स्वच्छ धुऊन ठेवाव्यात.

संध्याकाळच्या वेळी घरात कधीही झोपू नये. जर तुम्ही आजारी असाल तर चालेल वृद्ध व्यक्ती झोपल्या तर चालतील. टनठणीत व्यक्तीने कधीही संध्याकाळच्या वेळी झोपू नये. हेसुद्धा घरामध्ये चुकीचे असते. घरात बेडवर व सोफ्यावर बसून कधीही जेऊ नये. खाली जमिनीवर बसून जेवावे.

जेवताना व जेवण झाल्यावर अन्नदेवाला नमस्कार करायला विसरू नका. काही लोकांना चांगले दिवस आले की देवाचा विसर पडतो. आणि वाईट वेळ आली की देवाचा विचार लगेच मनामध्ये येतो. तुमची देवावरची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती व कसा फरक पडेल. रोज देवाला नमस्कार करणे विसरू नका. या लहान लहान गोष्टी तुम्ही पाळल्यात तर सुख तुमच्या घरात येईल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊन आणि विविध स्त्रोतांच्या आधारावरच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment