कोणत्याही बुधवारी रात्री झोपतांना उशीखाली ठेवा ही एक वस्तु, अनेक अडचणी होतील दूर.. माता लक्ष्मींचा लाभेल विशेष आशिर्वाद..!!!

हॅलो फ्रेंड्स.. आपण आजच्या आपल्या या नवीन धार्मिक लेखामध्ये, आपल्या कुंडलीतील बुध या ग्रहाची स्थिती कशी मजबूत करावी याबद्दल जाणून घेणार आहोत. बुध हा ग्रह, ग्रहांचा राजपुत्र मानला जातो आणि भगवान गणेश यांना त्यांचे सर्वोच्च देवता मानले जाते, बुध हा ग्रह अभ्यास, शहाणपण, बुद्धिमत्ता, इ. साठी कारक मानला जातो.

मित्रांनो, जर येथे तुमच्या करिअरबद्दल, तुमच्या कर्तुत्वाबद्दल बोलायचं झालं तर त्यासाठी तुमचा बुध हा प्रबळ असायला हवा. तुमच्या प्रगतिमध्ये बुध हा प्रथम येत असतो कारण जर तुमचा बुध ग्रह प्रबळ असेल तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात भरपूर यश मिळते, त्याबरोबर तुमच्या व्यक्तिमत्वाचा सुद्धा खूप चांगला विकास होत असतो.

ज्योतिष शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की जर तुमच्या कुंडलीतील बुधाची स्थिती चांगली नसेल तर तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात. शास्त्रानुसार बुधवार हा दिवस गणपतींना अर्पण असलेला वार आहे.

या बुधवारच्या दिवशी काही उपाय करून आपण बाप्पांना प्रसन्न करू शकतात, या उपायामध्ये बाप्पांना प्रिय असलेल्या या एका गोष्टीचा वापर आपण करणार आहोत. फक्त ही बाप्पाला प्रिय असणारी वस्तु आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशीखाली ठेवायची आहे.

तर मित्रांनो, आठवड्याच्या कोणत्याही बुधवारी, आपण सकाळी लवकर उठायचे आहे. आन्हिंक आवरुन झाले की जवळच्या एखाद्या मंदीराच्या पटांगणात किंवा माळरानावर उगवणारी गवत प्रकारातील वनस्पती दुर्वा घेऊन यायच्या आहेत, त्यातील पाच पाच पाने घेऊन त्यांच्या 11 जुडी बनवायच्या आहेत, आणि एक त्या दुर्वांच्या जुडी बांधण्यासाठी लाल रंगाच्या धाग्याचा आपण वापर आपण करणार आहोत.

या दुर्वांच्या ११ जुडी बनवल्यानंतर आपण घरातील देवघरातील गणपती समोर किंवा तुमच्या घरात बाप्पांची मोठी मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या समोर आपण बसायचे आहे. हा उपाय करत असताना आपल्याला बसण्यासाठी लाल किंवा पिवळसर रंगाचे आसन घ्यायचे आहे.

आता बाप्पांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्या. आणि गणपती बाप्पाला एक चिमूटभर सिंदूर अर्पण करुन, आपल्या हातात दुर्वांची एक जुडी घेऊन पुढीलप्रमाणे मंत्रोच्चारण चालू करायचंय..

‘भाल चंद्रय नमः’ या मंत्राचा आपण 108 वेळा जप करायचा आहे.

या मंत्राचा जप करत असतांना तुम्ही बाप्पांच्या कपाळावर दुर्वा अर्पण करत रहायचे आहे, एक लक्षात ठेवा या दुर्वा कधीही बाप्पांच्या चरणी अर्पण करू नका.

तर दुर्वा अर्पण केल्यावर, त्या सर्वच जुडी दिवसभर बाप्पांच्या मूर्ती जवळच राहू द्यायच्या आहेत, गुलाल आणि अक्षत: वाहून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तुमची पूजा झाल्यावर तुमची जी पण इच्छा असेल ती आपण बाप्पांना सांगायची आहे.

मित्रांनो, त्यानंतर रात्री झोपायच्या आधी त्या दुर्वांच्या जुडी घेऊन, काही फुले, काही अखंड अक्षत: घ्या. आता पुन्हा आपण आपली इच्छा मनामध्ये बोला, या नंतर श्रींचे नाम स्मरण करत आपण त्या दुर्वा झोपतांना आपल्या उशीखाली ठेवून झोपायचं आहे.

या सर्व वस्तू आपल्या उशीखाली ठेवा, मित्रांनो, हा उपाय कुणीही करू शकतो, कुणालाही आ-र्थिक प्रगतीसाठी, व्यवसायात यश मिळविण्यासाठी, नोकरीच्या जागी बढती साठी सुद्धा हा उपाय तुम्ही करु शकतात.

तर असा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या, संकटं दूर होतात आणि त्याद्वारे पैशांची नवीन साधने, नविन संधी निर्माण होतात. मित्रांनो, सकाळी उठून उशीखाली ठेवलेल्या सर्व वस्तू बागेतील एखाद्या कुंडमध्ये किंवा मातीमध्ये दाबून द्या, तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील.

टिप – वरील लेख केवळ धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.

Leave a Comment