कोणत्याही दुविधेतून तारुन जाण्याची शक्ति म्हणजे स्वामी.. यशोदामामींना आलेला स्वामींचा प्रत्यक्ष अनुभव.!!

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवरत तुमचं मनापासून स्वागत आहे… यशोदामामी प्रत्येक कामात असताना त्यांचे स्वामींचे नामस्मरण चालूच असे. आज भल्या पहाटेपासून त्यांनी गुरुचरित्राचे वाचन देखील केले होते आणि नामाचा जप तर अखंड चालू होते. आण्णामामांच्या घराला देवधर्म हा काही नवीन नवता. दहा बारा वर्षापूरणी मामांनी मामींना अक्कलकोटला नेले होते तेव्हापासून मामींना स्वामीची ओढ लागली ती लागली. यशोदा मामी म्हणजे अख्ख्या गावाच्या मामीच. गोल भरलेला चेहरा, नाकी डोळी नीटस, उजळलेला सावळा रंग, अंगावरची नऊवारी साडी आणि कपाळावर आठ आण्या एव्हडे कुंकू. मामी आणि मामांचे प्रसन्न व्यक्तिमत्व अख्ख्या गावाला माहिती होते.

सकाळपासून किंबहुना काल रात्रीपासूनच मामी जरा अस्वस्थ होत्या. गेले दोन दिवस कधी नव्हे असा मुसळधार पाऊस चालू होता. बरे पावसाचे काही नाही पण घरात अवघडलेली सून शांता. सरकारी दवाखान्यातल्या नर्स येऊन गेल्या आणि म्हणल्या की इथे उपकेंद्रात बाळंत होण्यासारखे दिसत नाही कारण बाळ फिरलेले दिसतेय. तालुक्याला न्यावे लागेल. तेव्हापासून मामींच्या डोळ्याला डोळा नवता कारण शांताचे दिवस भरलेले होते.

काळपासून गावाबाहेरचा ओढा तुडुंब वाहत होता. इकडचा माणूस तिकडे आणि तिकडचा कुणी इकडे येत नवता. गाडीची व्यवस्था झालीही होती पण जाणार कसे ? वरून शांताला आज सकाळपासूनच दुखायला लागले होते. तिला कळा यायला लागल्या होत्या. इकडे मामा देखील चिंतेत होते, मुलगा काल पलीकडे गावाला गेलेला होता तो तिकडेच अडकलेला त्यात सुनबाईंचे भरलेले दिवस. त्यांनी गाडीची सोय देखील केली होती पण पलीकडे जाणार कोण?. अस्वस्थ मामा वाड्यात येर झार्‍या घालत होते.

एकमेव उपाय म्हणून मामीन्नी गावातल्या एका जुन्या सुइणीला निरोप धडला व्हता. भल्या पहाटे पांडू निरोप घेऊन गेला होता पण ती जागेवर नवती तर आजूबाजूला ‘आली की ताबडतोब पाठवून द्या’ सांगून तो देखील बिचारा परत आला होता. त्यात शांताच्या कळा वाढायला लागल्या होत्या. मामींनी दहा बारा वर्षापूर्वी एकदा काही सुविधा नसल्याने आपल्या मुलीचे घरीच बाळंतपण केले होते. पण आज ती स्थिती नवती, त्यावेळी सगळी बाळंतपणे घरीच व्हायची. आता वयाने थरथरणार्‍या हातांना का बाळंतपण करणे जमणार होते?

तरीदेखील त्या खंबीर बाईने सगळी तयारी करून ठेवली होती. सूती कपडे, गरम पानी आणि नाळ कापायला कोरे ब्लेडपान देखील. माझ्या स्वामींनी वेळ आणली तर त्यांच्यावर भार सोपवून ती सगळे करणार होती. देवाचा धावा करत मामा सूनेच्या खोलीबाहेर अस्वस्थपणे फिरत होते. त्यांनी पुन्हा एकदा पांडूला बघून यायला संगितले. काही वेळात पांडू देखील हात हलवत परत आला.

‘कुणी आहे का घरात’ बाहेरून एका बाईचा आवाज आला. रमा सुइण आली म्हणून मामी आनंदाने बाहेर पळाल्या पण बाहेर दुसरीच कुणीतरी होती. एखाद्या घरंदाज घरातली वाटावी आणि चेहरा चन्दनासारखा नितळ. मामींनी तिचा विचारले तर ती म्हणाली रमा आजींनी पाठवले आहे, म्हातारपणी त्यांच्यापेक्षा हे काम मी चांगलं करील म्हणून. मामींचा जीव आता भांड्यात पडला. त्यांनी आनंदाने तिला पायावर पानी घ्यायला लावून घरात घेतले.

मामींनी सगळी पूर्वतयारी आधीच करून ठेवली होती. आता मामा मामी दोघांनाही हायसे वाटले होते. बराच वेळ शांताचा ओरडण्याचा आवाज बाहेर येत होता पण त्यापाठोपाठ लहानग्याचा ‘ट्याहो… ट्याहो…’ असा आवाज वाड्यात घुमला तसे मामा खुडचीवर बसले. मामींना काय करू आणि काय नाही असे झाले होते. बाळ फिरलेले होते, पण सुईनीने निष्णात डॉक्टरांना जमणार नाही अशा पद्धतीने बाळंतपण केले होते.

बाहेर येत मामींनी गोड बातमी ममाणणा दिली, बाळ आणि शांता दोघेही सुखरूप आहेत संगितले. सगळ काही व्यवस्थित करून ती सुइण निघाली तेव्हा मामींनी चहा टाकला आणि म्हणल्या, तुला कंदि गावात नाही पाहिले. तेव्हा ती म्हणाली मी राजश्री, रमा आज्जीच्या लांबच्या नात्यातली. चहा नंतर मामी ओटी भरू म्हटल्या पण तिने नंतर येते म्हणून संगितले आणि निघून गेली. मामी तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहताच होत्या.

दिवस मावळतीला आला होता आणि दुपारपासून पाऊस कमी झाला होता, बाळकृष्ण आता छान झोपला होता. मामांचा मुलगा रमा सुइणीला गाडीवर टाकून गडबडीने आलेला होता. बायकोला कळा येताएत हे त्याला कळले होते आणि उशीर नको म्हणून ओढ्याचे पानी जरा कमी झाले तसे त्याने पालीकडेच अडकलेल्या सुईनीला गाडीवर बसवले आणि लगबगीने घरी पोचला.

सगळ्यांचे हसत चेहरे बघून त्यालाही हायसे वाटले. मामींनी सगळी गोष्ट सांगितली तेव्हा म्हातारी रमा सुइण म्हणाली, आव काय सांगू मामी मी वढ्याच्या पल्ल्याड होते. कशी येणार होते ? आण तुम्ही म्हणता तशी कोण बाय नाही बाय माझ्या नात्यात आण पाहुणी तर कोण आलेली नाही. मामा मामी आश्चर्याने पाहत होते, पांडू सुदिक म्हणला की जेव्हा तो गेला तेव्हा घर साफ बंद होते आणि कुणीबी नवत.

मामी लगेच पळाल्या आणि स्वामींपुढे साखर ठेवली, म्हणल्या महाराजा भक्तांसाठी तुमी अन्नपूर्णा देवीचे रूप घेतलेलं होत आज पुन्हा सुइणीच रूप घेऊन तुमी माझ्या सुनेला सोडवलीत. माझ्या नातवाचे मोठे भाग्यच म्हणावे लागेल की जन्मतच स्वामींचे हात त्याला लागले. चिंब भिजलेल्या डोळ्यांनी मामी अनेक तास स्वामींच्या समोरच बसून होत्या.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद.!!

Leave a Comment