कोऱ्या कागदावर लिहा फक्त हा एकच मंत्र, आवडती व्यक्ती होणार वश..

समजा जर तुम्हाला एखादी व्यक्ती खुप आवडते पण त्या व्यक्तीला तुमच्याशी काहीही देणंघेणं नाहीए अशा आविर्भावात ती व्यक्ती वावरत असेल, आणि याचा तुम्हाला त्रासही होतो पण अशा वेळी तुमच्या हातात झुरत बसण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नसतो.

ती व्यक्ती तुमचा जीव की प्राण असते, पण ती जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल तुमचं काही एक ऐकत नसेल, तर त्या व्यक्तीला वश मध्ये करण्यासाठी, आपल्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी, आपण आजचा हा उपाय कसा करु शकतो हे आपल्याला माहीती करून घ्यायचं आहे.

मित्रांनो आज आपण असा एक मंत्र पाहणार आहोत, ज्या मंत्रामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला सहज तुमच्या वश मध्ये करू शकता. यालाच शा’स्त्रामध्ये वशीकरण असं सुद्धा म्हटलं जातं.

तुम्ही आजचा हा उपाय केल्याने तुम्हाला आवडणरी समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसं वागू लागेल. तुमची प्रत्येक गोष्ट सुद्धा ऐकेल. तुम्ही जे काम सांगाल ते कामही ती व्यक्ती करेल.

पण एक गोष्ट लक्षात घ्या, या वशीकरणा मागचा हेतू वाईट नसावा. फक्त आणि फक्त सकारात्मक कामासाठी याचा वापर करावा. मित्रांनो वाईट हेतूने केलेलं काम नेहमी नुकसान कारकच ठरत असतं. म्हणून आपण हा उपाय वापरतांना एवढी काळजी घ्यायची आहे.

यासाठी काही अटी सुद्धा आहेत. ज्या व्यक्ती वर आपण वशीकरण करणार आहोत ती व्यक्ती आपल्या जवळची तथा चांगल्या परिचयाची असायला हवी. आणि म्हणूनच हा उपाय करताना आपल्या मनात स्वार्थाची किंवा चुकीची भावना अजिबात नसायला हवी. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल आणि ती व्यक्ती तुम्हाला अजिबात भाव देत नसेल, तेव्हा अशा व्यक्तीवरच तुम्हाला हा उपाय करण्याची मुभा आहे.

हा उपाय करतांना आपण शनिवारचा दिवस निवडायचा आहे. तुम्ही शनिवारी रात्री एक संपूर्ण पांढरा असलेला कोरा कागद घ्यायचा आहे. लक्षात असू द्या मित्रांनो या कागदावर काहीही लिहलेले नसावे. पूर्णत: तो कागद नवा कोरा असायला हवा, एक रेष सुद्धा त्यावर असता कामा नये.

असा कागद घेतल्यानंतर, तुम्हाला त्या कागदावर लाल शाईच्या पेनाने एक मंत्र लिहायचा आहे. कागदावर मंत्र लिहून झाल्यानंतर त्या व्यक्तीचं नावं पुढे तुम्हाला लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्ही वश करु इच्छिता आहात.

एक काळजी याठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे त्या व्यक्तीचं फक्त नाव लिहायचं आहे. आडनाव लिहण्याची गरज नाही.

आता आपण तो मंत्र कोणता आहे ते जाणून घेऊयात.

तो मंत्र आहे ‘वषमं भकर्म वश.’ हा 3 शब्दांचा मंत्र आहे. तो मंत्र त्या पांढऱ्या कागदावर लिहून, त्यापुढे ज्या व्यक्तीला वश करायचा मानस आहे त्या व्यक्तीचे नावं तुम्ही लिहायचं आहे.

हे लिहल्यानंतर तुम्ही त्या कागदाची घडी घालायची आहे व तो कागद झोपताना आपल्या उशी खाली ठेवायचा आहे. झोपण्यापूर्वी आपण तो लिहलेला मंत्र आणि नाव 4 वेळेला उच्चारण करुन बोलायचा व नंतर झोपून घ्यायचं आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा कागद आपल्याला जाळून टाकायचा आहे. आणि हा कागद जाळताना सुद्धा तो मंत्र 4 वेळेस म्हणायचा आहे. ‘वषमं भकर्म वश’ आणि त्या व्यक्तीचे नाव.

मित्रांनो हा उपाय केल्याने तुम्हाला थोड्या दिवसातच जाणवायला लागेल की ज्या व्यक्तीसाठी आपण हा उपाय करत आहोत व्यक्ती हळू हळू मनाने आपल्या जवळ येत आहे. आणि त्या व्यक्तीची वागणूक देखील तुमच्या मनासारखी होत आहे.

टिप- इथे कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा हेतू मुळीच नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आम्ही आपल्या पर्यंत पोहचवतो आमचं पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही.

या ठिकाणी शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर कुणी अंध श्रद्धा म्हणून करू नये. या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. ती अवलंबण्यापूर्वी कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या.

Leave a Comment