नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! कुलदेवी ची सेवा घरातील कुलदेवी ने करणे अगत्याचे आहे. सर्व सौभग्यवती महिलांनी आणि कुमारिकांनीही कुलदेवीची सेवा करावी. महाराष्ट्रातील प्रमुख कुलदेवता तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी माता आहेत.
सर्व कुल स्त्रियांनी अश्विन आणि चैत्र नवरात्रात 14-14 पाठ श्री दुर्गा सप्तशती चे करावे.. नित्याच्या सेवेत एक माळ नवर्णव मंत्र व एक वेळां श्री सुक्त म्हणावे.. जमल्यास आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि शुक्रवार.. दुर्गा सप्तशती चे पारायणही करावे.
रोज कुंजिका स्तोत्र वाचावे. ग्राम देवता आणि कुलदेवता यांच्यात फरक आहे. ग्रामदेवता ही कुलदेवतेच्या एक सहत्रांश स्वरूप आहे.म्हणून तीन वर्षातून एकदा तरी जोडप्याने कुलदेवी चे मुळ स्थानावर जाऊन यथासांग मान सन्मान करावा.
ज्यांना आपली कुलदेवता कोण आहे माहित नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील क्षात्रधर्म या ग्रंथाचा आधार घ्यावा. त्यातही नाही मिळाल्यास श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात केंद्रात आपली कुलदेवता कोणती याचे मार्गदर्शन केले जाते. चुकीच्या कुलदेवतेची पूजा केल्यास आई सोडून मावशीचा पूजा सन्मान केल्यास मुळ कुलदैवत चा कोप होतो.
कुलदेवतेचा मान सन्मान का करावा..?
घरातील काही स्त्रियांना काही कारणाने अडचणी, समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते. नंतर मात्र त्यांना केलेल्या नवसाचा विसर पडतो. काय नवस केला हे लक्षात राहत नाही. कालांतराने विविध समस्या उदभवतात. म्हणून 11अलंकार कुलदेवतेस वहावे. त्यात न फेडलेल्या नवसाची पूर्तता होते.
घरातील विवाहाचे कार्य मुख्यतः हे कुलदेवतेच्या अधिकारातील आहे. त्यामुळे विवाहासाठी 11 अलंकार वाहून कुलदेवतेचा मान सन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटका होते.
मातोश्री आई साहेबांचे 11 अलंकार
1 साडी चोळी, बांगड्या
2 मणीमंगळ सूत्र, जोडवे, विरोदे
3 हळद कुंकू (125 ग्रॅम)
4 गुलाल, शेंदूर (125 ग्रॅम)
5 हार वेणी
6 पंचखाद्य (खारीक, खडीसाखर, खसखस, खोबरे, खवा)
7 खेळणा, पाळणा
8 पुरणाचा नैवेद्य
9 ओटीचे सामान (खण, गहू, सुपारी, पैसा)
10 पाच प्रकारचे फळे, नारळ, विडा,दक्षिणा
11 होमपुडा, हळीकुंकू, अष्टगंध, अक्षता, फुले, धूप दीप, कलश, पळी, भांडे ताम्हण व पुरणाचे दिवे 21
मंत्र साधना – नमो देवी, नमो देवी, नमो दवी, नमो नमः
संदर्भ – मानसन्मान कुलदेवता व कुलदैवतेचे
भारतातील कुलदेवतेची स्थाने पुढील प्रमाणे आहेत.
1 महाकालिका – कलकत्ता
2 महालक्ष्मी – वैष्णव देवी जम्मू
3 महासरस्वती – कन्याकुमारी
महाराष्ट्रातील कुलदेवतेची स्थाने –
1 महाकाली – माहूर – रेणुका माता.
2 महालक्ष्मी – कोल्हापूर – महालक्ष्मी माता.
3 महासरस्वती – तुळजापूर – तुळजाभवानी माता.
4 राजराजेश्र्वरी सप्तशृंगी गड – सप्तशृंगी माता.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!