Sunday, December 3, 2023
Homeअध्यात्मकुंमकुम चा करा अशा प्रकारे वापर.., वास्तूदोष होतील दूर..

कुंमकुम चा करा अशा प्रकारे वापर.., वास्तूदोष होतील दूर..

भारतीय वास्तूशास्त्राच्या नियमानुसार कुंमकुमचं महत्त्व खूप खास आहे. प्रत्येक सुंदर स्त्रीच्या शोभेचा एक भाग म्हणजे कुंमकुम. प्रत्येक सवाष्ण बाया आपल्या भाळी कुमकुम भरुन मिरवतात.

धर्मग्रंथात असे म्हटले आहे की महिलेने कुंमकुम लावल्यास तिच्या पतीचे आयुष्य दीर्घ आयुष्यभर टिकते आणि त्या पतीचं आजारांपासून संरक्षण होते.

रामायणातील एका कथेनुसार भगवान श्री रामांना अमर करण्यासाठी हनुमानाने आपल्या शरीरावर कुंमकुम लावलं होतं.

रोज पाण्यात थोडंसं कुंमकुम टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. कुंमकुमपासून आपल्या घराच्या दारावर स्वस्तिकचे चिन्हंही बनवा. असे केल्याने घरात सुख शांती व आनंद कायम राहतो.

जर घरात पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडण होत असेल तर हा उपाय एकदा करून पाहिलाच पाहिजे.

असा मानलं जातं की तेलामध्ये कुंमकुम मिसळून ते घराच्या मुख्य दरवाजावर लावल्यास ते नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करू देत नाही. सतत 40 दिवस असे केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतात.

देवी आणि देवतांची पूजा देखील कुंमकुमशिवाय अपूर्ण मानली जाते. यासाठी प्रत्येक पूजामध्ये हळद आणि कुंमकुमचा सामावेश असावा.

पैशांच्या समस्येवर विजय मिळविण्यासाठी चमेली तेलात कुंमकुम मिसळा आणि पाच मंगळवार आणि शनिवारी हनुमानजीला अर्पण करा.

असे केल्याने व्यवसायात प्रगती होईल आणि पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.

रूग्णांवरुन कुंमकुम उतारुन आणि ते वाहत्या पाण्यात वाहून द्या. असे केल्याने आजार जलद बरे होतात.

भगवान श्रीगणेशच्या मूर्तीवर कुंमकुम लावून घराच्या मुख्य दाराला लावल्यास घरात सुख, शांती व समृद्धी टिकून राहते.

सवाष्ण स्त्रियांनी सकाळी केस धुल्यानंतर गौरी मातेला कुंमकुम लावावे आणि यापैकी काही कुंमकुम देखील त्यांच्या स्वत: लावावा. असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी आणि आनंदी होते.

वास्तुशास्त्राचे हे छोटेसे उपाय करुन पहावे खूपच लहान आणि सोपे असणारे हे उपाय खुपसे खर्चिक पण नाहीत, परंतु ते आपला अनियमित खर्च थांबविण्यात प्रभावी ठरतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स