Be careful if you lend money to someone कुणाला पैसे उधार देताय तर सावधान.. या घोर कलियुगात तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा..

Be careful if you lend money to someone कुणाला पैसे उधार देताय तर सावधान.. या घोर कलियुगात तुमचे पैसे बुडालेच म्हणून समजा..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण नेहमीच या समाजामध्ये वावरत असताना आपल्या आप्तेष्ट, मित्र यांच्याशी दैनंदिन व्यवहार करत असतो. आपल्या शेजाऱ्यांशी आपल्या जवळच्या लोकांशी आपण पैशाची देवाण – घेवाण करत असतो. हे चक्र नेहमी चालत आलेले आहे. मात्र आजकालच्या जगामध्ये असे पाहायला मिळते की, लोक दिलेल्या शब्दाला जागत नाहीत. पूर्वी ची लोकं शब्दासाठी जागणारे लोक होते. या मात्र या कलियुगामध्ये दिलेला शब्द लोक पाळतील याचा काही नेम नाही. त्यामुळे खऱ्याला या जगामध्ये खूप त्रास सोसावा लागतो हे आपण अनेकदा पाहिले आहे.

गरज असली की अनेकदा कधीही आपल्याला न विचारणारे लोक फोन करतात पैशाची मागणी करतात. त्यांना पैसे दिले तरच तुम्हाला चांगले म्हणतात अन्यथा तुम्हाला वाईट ठरवतात. तुमच्याविषयी वाईट साईट गोष्टी इतरांना सांगतात. त्यामुळे तुम्हीही एखाद्याने पैसे मागितल्यावर पेचात पडतात.

लोकं विचारतात कसं चाललंय. काय सुरु आहे. मग आपण सगळं व्यवस्थित आहे म्हटलं की ते लगेच आपला अंदाज घेतात. लगेच 2-3 दिवसांत फोन आलाच म्हणून समजा. मग सुरू होते खरी कहाणी.

या व्यक्तीने कधीच पैसे मागितलेले नाहीत, पहिल्यांदाच पैसे मागितलेले आहेत, याची खरच अडचण असेल म्हणून तुम्हीही डोळे झाकून विश्वास ठेवून त्या व्यक्तीला पैसे देता. जवळची व्यक्ती असल्याने आपण त्याच्याकडून कोणताही लेखी पुरावा चेक किंवा काहीही घेत नाही. आपण डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवतो.

आपण आपल्याकडे नसतील तरीही एखाद्या कडून घेऊन त्या व्यक्तीला पैसे देतो. कारण की त्याची गरज निघावी ही आपली चांगली भावना असते. आपण अशा प्रकारे त्या व्यक्तीची गरज भागवतो, नड काढतो. त्यामुळे तो व्यक्ती ही तुमच्याशी चांगला असतो. तुम्हालाही मदत केल्याचे चांगली भावना मनात असल्याने चांगले वाटते.

मात्र काही दिवसांनी त्याला तुम्हाला पैसे परत देण्याची वेळ येते. तुम्ही त्याच्याकडे पैसे मागता त्यावेळी समोरच्या व्यक्ती तुम्हाला टाळाटाळ करू लागते. तुम्हाला वेगवेगळ्या तारखा देऊ लागते. तुम्हाला कधी कधी फसवू लागते. त्यावेळी तुमचा राग अनावर होतो. मग एवढे दिवस जपलेले नातं कसं तोडावं या विवंचनेत तुम्ही असता.

याचाच गैरफायदा घेत समोरची व्यक्ती तुम्हाला वारंवार टाळाटाळ करत पैसे देताना अनेक वायदे देत असते. समोरच्या व्यक्तीकडून तुम्ही घेतलेले पैसे त्याला परत करणे हे तुमचे कर्तव्य असते. मात्र तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे मदतीसाठी दिलेले आहेत तो व्यक्ती पैसे देत नाही. त्यावेळी खूप वाईट वाटते. मग नात्यांमध्ये कटूता नको म्हणून एक तर पैसे सोडावे लागतात, अन्यथा कणखर भूमिका घेऊन पैसे परत काढून घ्यावे लागतात.

हे ही वाचा : वृश्चिक रास.. गरिबीचे दिवस सरणार.. पुढच्या 10 दिवसात राजासारखे जीवन जगणार..

कधी कधी यामध्ये नाती तुटतात त्यामुळे सावधान.एखाद्या व्यक्तीला पैसे देताना किंवा मध्यस्थी करताना त्याच्या घरातील व्यक्तींची तसेच आजूबाजूच्या तुम्हाला माहित असलेल्या दोन व्यक्तींची या प्रकरणाची चर्चा करा. यानंतर सर्वांसमक्ष पैसे द्या व पैसे कधी परत मिळणार हेही त्याच्याकडून समजावून घ्या. त्याला थोडा वेळ वाईट वाटेल मात्र नाते तुटणार नाही वाद होणार नाही. ठरलेल्या तारखेला पैसे परत द्यावेच लागतील हे त्याला स्पष्ट सांगा.

नाती निर्माण करण्यासाठी खूप वेळ लागतात मात्र नाती तोडण्यासाठी पैसा हे कारण पुरेस आहे. त्यामुळे पैशामुळे जर नाती तुटत असतील तर नात्यांमध्ये पैशाचे व्यवहार कधीच करू नका. अगदी जवळचे नाते असेल तर कदापि पैशाचा व्यवहार करू नका. कारण पैशाने माणसं तुटतात.

त्यामुळे तुम्ही समाजामध्ये वावरत असताना कीतीही जवळचा व्यक्ती असेल तरी व्यवहारिक दृष्ट्या त्या व्यक्तीशी व्यवहार करणे कधीही विसरू नका. कारण तुमची सहानभूती तुम्हाला पश्चाताप आणू शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!