कुंडलीतील ग्रहदोष निवारणासाठी या ठिकाणी ठेवा र-क्तचंदनाचा एक तुकडा : नशिब घोड्याच्या वेगाने बदलेल..!!!

ग्रह दोष दूर करण्याचे सर्वात सोपे मार्ग… लाल चंदनामुळे ग्रह दोष दूर होतात..!!!

मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आज आपण ग्रह दोष दूर करण्याचे सर्वात सोपे मार्ग जाणून घेणार आहोत.

मानवी जीवनात प्रत्येक ग्रहाची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा एखादा ग्रह कमकुवत (ग्रह दोष) असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनात त्या संबंधित समस्या उद्भवतात. ग्रहांना बळकट करून आपण त्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैली, अन्न आणि निसर्गात छोटे बदल करावे लागतील. या बदलांमुळे आपण लवकरच आपल्या समस्येतून मुक्त होऊ शकतो.

चला आपण अशाच काही उपायांची माहिती घेऊया, ज्याद्वारे ग्रह दोष दूर केले जाऊ शकतात आणि सर्व ग्रहांचे शुभ परिणाम मिळू शकतात.

आपल्याला माहित आहे का? लाल चंदनाचे काही शास्त्रीय उपाय केले आहेत जे अत्यंत चमत्कारीक आहेत आणि ते त्वरित परिणाम दर्शवितात. लाल चंदनाचे चमत्कारीक उपाय केल्यावर तुम्हाला अडचणीपासून मुक्ती मिळेल. तसेच, लाल चंदनामुळे ग्रह दोष दूर केले जाऊ शकतात.

जर आपल्या जन्म कुंडलित ग्रह दोष असले तर आपल्याला कोणत्याही कामात यश मिळत नाही. परंतु ज्योतिषशास्त्रात या अशुभ ग्रहांच्या शांततेसाठी बरेच उपाय सांगितलेले आहेत, ज्यांच्या वापराने कोणत्याही ग्रह दोषांपासून बचाव केला जाऊ शकतो. हे उपाय इतके साधे आणि सोपे आहेत की कोणीही त्यांना करु शकतो आणि आपल्या ग्रहांना सामर्थ्यवान बनवू शकतो.

चला तर मग ते उपाय जाणून घेऊया…

1) जर सूर्य ग्रह अशुभ असेल तर अंथरुणाखाली तांब्याच्या भांड्यात पाणी किंवा उशाखाली लाल चंदन ठेवणे फायद्याचे आहे.

2) जर चंद्राची स्थिती चांगली नसेल, तर पलंगाखाली चांदीची भांडी पाण्याने भरुन ठेवावी किंवा चांदीची अंगठी उशाखाली ठेवुन झोपल्यास देखिल फायदा होतो.

3) जर मंगळामुळे आयुष्यात अडचणी येत असतील तर, पलंगाखाली पितळाच्या भांड्यात पाणी ठेवावे किंवा सोन्या-चांदीचे दागिने उशाखाली ठेवल्याने मंगल दोष टाळता येतो.

4) बुधाशी संबंधित शुभ परिणाम होण्यासाठी उशाखाली अंगठी किंवा कानातले असे कोणतेही सोन्याचे दागिने ठेवून झोपावे.

5) जर गुरु मुळे आयुष्यात समस्या उद्भवत असतील तर पलंगाखाली पाण्याने भरलेले पितळी भांडे ठेवावे किंवा पिवळ्या कपड्यात हळदीची गाठ बांधुन उशाखाली ठेवावी, असे केल्याने गुरु ग्रहासं-बधी सर्व दोष दूर होण्यासाठी मदत होते.

6) जर शुक्र ग्रह अशुभ परिणाम देत असेल तर चांदीचा मासा उशाखाली ठेवावा किंवा पलंगाखाली चांदीच्या भांड्यात पाणी ठेवणे देखील फायद्याचे आहे.

7) शनीदोषासाठी, लोखंडी भांड्यात पाणी भरून ते पलंगाखाली ठेवणे किंवा उशाखाली लोखंडी अंगठी किंवा नीलमणी रत्न ठेवणे अत्यंत लाभदायक असते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment