कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही ही वनस्पती : त्वचेच्या आरोग्यासाठी आहे संजिवनी..!!!

कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही ही वनस्पती कुठेही दिसली तर आजच घरी आणा ही चमत्कारी आणि उपयोगी वनस्पती..!!

आपल्या सर्वांना ठाऊक आहे की वातावरण हरित ठेवणे ही आता आपली जबाबदारी बनली आहे आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की लवकरच जर काही मोठे पाऊल उचलले नाही तर आपल्याला श्वास घेणे कठीण होईल. वनस्पती आणि वृक्ष आपल्याला प्रदूषणापासून मुक्त करतात, परंतु त्यांच्याकडे औषधी गुणधर्म देखील असतात. आपल्यापैकी बहुतेकांना बागकामाची आवड असते.

आपल्या घरातील गच्चीत, गॅलरीत छान रंगबिरंगी अशी फुलांची, पानांची झाडे लावतात. बऱ्याच लोकांना त्या झाडांचे फायदे माहीत नसतात. चला तर मग अशाच एका उपयोगी फुलझाडा विषयी जाणुन घेऊ.

आम्ही तुम्हाला अशाच एका वनस्पती बद्दल सांगणार आहोत. जिचे चमत्कारी फायदे वाचून तुम्ही म्हणाल हे आधी का नाही सांगितलेत आम्हाला..??? ज्याला आपण निरुपयोगी गवत म्हणत होतो ती वास्तविक एक उपयोगी अशी वनस्पती आहे. बहुतांश वेळा आपल्या घराच्या आसपास अशा अनेक वनस्पती आढळतात, ज्यामध्ये औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात.

कित्येकांना त्याचे फायदेही ठाऊक नसतात. तुम्हाला चित्रात दिसत असलेली वनस्पती जीला आपण ‘चिनी गुलाब’ यानावाने ओळखतो. सामान्य वाटेल, परंतु त्याचे चमत्कारी गुण आपल्याला आश्चर्यचकित करतील. या फुलाला हिंदीत नौबजिया फूल असेही म्हणतात, कारण हे फूल नेहमीच सकाळी ९ ते १० वाजेच्या दरम्यानच उमलते.

अशा या आगळ्यावेगळ्या फुलाबद्दल माहिती जाणून घेऊ. आपली त्वचा आणि आपले केस यासाठी वरदान आहे ही वनस्पती.

(1) त्वचेच्या समस्यांसाठी उपयुक्त –
या वनस्पतीची फुले आपल्या चेहऱ्यावरील पुरळ, मुरूम, काळे डाग नाहीसे करतात. या फुलांच्या पाकळ्या वाटून घ्यायच्या आणि त्याचा लेप चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे ठेवावा, नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

बघा लगेच फरक जाणवेल. असे आठवड्यातून तीन ते चार वेळा करावे. याचा नक्कीच फायदा होईल आणि आपल्याला सुंदर व नितळ चेहरा पाहून आनंद होईल. या फुलांच्या पाकळ्या आणि पानांचा वापर करून आपण काळवंडलेली त्वचा हि उजळ करु शकतो.

(2) लांब घनदाट आणि काळ्याभोर केसांसाठी लाभदायक –
चिनी गुलाब या वनस्पतीच्या पानांमध्येआणि फुलांमध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. त्यांची पेस्ट केसांना लावल्याने केस लांबसडक, मजबूत, काळेभोर आणि घनदाट होतात.

(3) त्वचारोगावर रामबाण औषध –
जर त्वचेला वेळोवेळी येत असेल तर त्याच्या पानांचा रस त्याजागी लावल्यास खाज सुटण्यापासून त्वरित आराम मिळतो .कारण त्यात अँटीफंगल आणि अँटीबैक्टीरियल गुणधर्म आहेत. जे खाज सुटणे आणि संसर्ग दूर करण्यात मदत करतात.

एक रुपया देखील खर्च न करता घरच्याघरी या फुलापासून आपण कितीतरी त्वचेच्या समस्या दूर करू शकतो. तर आजच आना आपल्या परसबागेत हे चमत्कारी फुलझाड.

Leave a Comment