
नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला कितीतरी गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि कितीतरी कामे करावी लागतात, जेणेकरून सर्व कामे वेळेपूर्वी पुर्ण होतील आणि आपल्यासाठीच सोपं होईल.
पण वाढत्या वयाने किंवा असे म्हणा की आपल्या काही सवयींमुळे आपली स्मरणशक्ती बिघडू लागते आणि अनेकदा आपण छोट्या छोट्या गोष्टी विसरू लागतो आणि या विसरण्याच्या सवयीमुळे आपले खुप मोठे नुकसान होऊ शकते. एवढेच नाही तर आपल्यावर मोठे संकट येऊ शकते आणि यामुळे आपल्याला मोठी किंमतही मोजावी लागू शकते.
यासर्व गोष्टींपासून स्वतःला वाचवायचे असेल तर आपल्याला आपली स्मरणशक्ती बळकट करावी लागेल आणि त्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील आणि काही वाईट सवयीं पासून स्वतःला दूर ठेवावे लागेल.
तसेच एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना सक्रिय राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी स्वतःला सदैव सक्रिय राहण्याचीही सवय लावा. याचबरोबर मेंदूचा वेग वाढवण्या साठी मानसिक आरोग्याची भूमिका महत्त्वाची आहे. हाती घेतलेलं काम वेळेत आणि तंतोतंत पूर्ण होण्यासाठी उत्साही राहण्याचा प्रयत्न करावा. चला तर मग जाणून घेऊया स्मरण शक्ती सुधारण्याचे हे 7 मार्ग…
1) जास्त प्रमाणात मादक पदार्थांचे सेवन करणे हे आरोग्या साठी अनेक प्रकारे हानिकारक ठरू शकते आणि याचा तुमच्या स्मरणशक्तीवरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही निरीक्षणानुसार, मा द क पदार्थांचे सेवन आपल्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले जाते.
केंद्रीय मज्जासंस्था आणि श री रा च्या इतर अवयवावर क्रिया करून मा द क पदार्थ व्यक्तीच्या, मनःस्थितीत कामात, समज आणि जाणीेत बदल घडवितात. मा द क पदार्थाचे सेवन केल्यावर व्यक्ती उत्तेजीत, अत्यांनदी किंवा उदासीन होउ शकते. अशा परिस्थितीत, जास्त प्रमाणात मद्यपान टाळणे हा तुमची स्मरणशक्ती जपण्याचा एक स्मार्ट उपाय आहे.
2) आरोग्य खात्याच्या अहवालानुसार, माशांचे तेल ओमेगा -3 फॅटी ऍसिड ईकोसापेंटेनोइक एसिड (ईपीए) आणि डोकोसाहेक्सैनोइक एसिड (डीएचए) ने समृद्ध आहे. एकूणच आरोग्यासाठी हे महत्वाचे असले तरी हृ द य रोग आणि जळजळ होण्याचा धो का कमी करण्यासाठी, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी देखील हे महत्वाचे आहे. त्याचबरोबर, अनेक निरीक्षणातून असे दिसून आले आहे की मासे आणि मास्यांचे तेल आपल्या आहारात घेतल्याने स्मरणशक्ती सुधारू शकते.
3) जास्त साखर खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या वाढू शकतात. काही संशोधनात असे सांगण्यात आले आहे की, साखरेचा समृध्द आहार स्मरणशक्ती कमी करू शकतो. त्यामुळे साखरेचे सेवन कमी करावे. यामुळे तुमची स्मरण शक्ती सुधारेलच, पण श री रा चे आरोग्यही चांगले होईल.
जास्त प्रमाणात गोड पदार्थ, साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमचे लक्ष विचलित होते. एखाद्या गोष्टीत तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही. पण जर तुम्ही गोड कमी प्रमाणात खाल्ले तर तुमचा मेंदू तल्लख होतो व कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमता वाढते.
4) ध्यानाचा सराव तुमच्या आरोग्यावर अनेक प्रकारे सकारात्मक परिणाम करू शकतो. हे आरामदायक आणि सुखदायक आहे. हे तणाव आणि वेदना कमी करण्यास, र क्त दा ब संतुलित करण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते.
ध्यानामुळे मेंदू लहरी “अल्फा स्थितीत” येतात ज्यामुळे रो ग-निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. ध्यान केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या भावनांचा अतिरेक होतो, आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, त्या त्या वेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते.
5) मनुष्याला रोगांपासून दूर राहण्यासाठी निरोगी श री र असणे आवश्यक आहे. एका निरोगी श री रा तूनच निरोगी मन व बुद्धीचा विकास होतो. श री रा ला स्वस्थ ठेवण्यासाठी खेळांचे भरपूर महत्त्व आहे. खेळांमुळे श री र व मन दोघेही निरोगी राहतात. खेळ खेळल्याने मनुष्यात धैर्य, सहनशीलता आणि मानवी गुणांचा विकास होती. खेळ आजच्या व्यस्त जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. खास करून विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळांचे महत्त्व भरपूर आहे.
म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला दिवसातून थोडा वेळ काढून खेळायला हवे. खेळ खेळल्याने तंदुरुस्ती सोबत मनोरंजनही होते. बुद्धी कौशल्याचे विविध खेळ खेळून तुम्ही तुमची स्मरणशक्ती उत्तम ठेवू शकता. स्मरणशक्ती वाढवण्याचा हा एक मजेदार आणि प्रभावी मार्ग आहे. स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी, आपण बुद्धिबळ, कोडे सोडवणे, क्रॉसवर्ड गेम इ.खेळ खेळू शकतात.
6) झोपेचा अभाव देखील स्मरणशक्तीशी जोडलेला आहे. चांगल्या स्मरणशक्तीमध्ये झोप महत्वाची भूमिका बजावते. काही संशोधन दर्शवते की जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा तुमच्या स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आपल्या झोपेचे तास अधिक गांभीर्याने घेणे महत्वाचे आहे, विशेषत: एखाद्या परीक्षेच्या आधी, किंवा महत्त्वपूर्ण माहिती अभ्यासल्यानंतर किंवा वाचन केल्यानंतर, कारण हे चांगल्या संज्ञानात्मक कार्यासाठी आवश्यक आहे.
7) एकूण शा री रि क आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम खूप फायदेशीर आहे. हे मेंदूसाठी फायदेशीर असले तरी ते लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकते. कोणताही आजार निर्माण झाल्यावर, त्यावर उपचार करीत बसण्यापेक्षा मुळात आजारच होऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे सर्वात चांगले असते.
यासाठी निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे उपयुक्त असते. कारण रोजच्या व्यायामामुळे वजन आटोक्यात राहते, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, र क्त दा ब– ब्ल ड शु ग र आणि र क्ता तील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो, तसेच मानसिक ताण दूर होण्यास व्यायामाने मदत होते.
पर्यायाने लठ्ठपणा, हृ द य विकार, उच्च र क्त दाब, डा य बेटीस, प क्षा घा त, सांधेदुखी, गुडघेदुखी, मानसिक तणाव यासारख्या अनेक गंभीर आजारांपासून नियमित व्यायाम केल्याने दूर राहता येते. अशाप्रकारे निरोगी आरोग्यासाठी व्यायामाचे खूप महत्त्व आहे.
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्यायामामुळे न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रथिनांचा स्त्रा व वाढू शकतो आणि न्यूरॉन्सची वाढ आणि विकास सुधारू शकतो, ज्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते.