लग्न आपल्या विस्कळीत का’मेच्छा भावनांना अर्थपूर्ण बनवते.. हे खरंच खरंय का.?


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. जसं जश्या मूलभूत गरजा पूर्ण होत जातात तसा माणूस पुढच्या गरजांचा विचार करू लागतो. जसं की नोकरी, वैयक्तिक, सुरक्षितता, आरोग्य, पैसा इत्यादी. परंतु याच मूलभूत गरजांमध्ये अजूनही गरज आहे ती म्हणजे लैं’गिक गरज.

या सर्वांना biological and physiological needs असे म्हणतात. लैं’गिक गरज हीसुद्धा माणसासाठी महत्त्वाची आहे. कारण याचा पुनरुत्पादन, तसेच शा’रीरिक व मानसिक स्वास्थ्यामध्ये मोठा वाटा आहे. पण या गरजे मध्ये बरेचदा चुकीच्या गोष्टी घडण्याची शक्यता असते. पौगंडावस्थेमध्ये लैं’गिक इच्छा उत्पन्न होण्यास सुरुवात होते.

विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होतं. यातून जे संबंध येतात, तेव्हा जी नाती तयार होतात त्यामध्ये शा’रीरिक आकर्षणाचा भाग जास्त असतो. वयाप्रमाणे ही इच्छा वाढत जाते. बरेचदा या इच्छा योग्य प्रकारे व्यक्त केल्या जात नाही, करता येत नाहीत. त्यातून चुका होतात, चुकीच्या मार्गाकडे व्यक्ती वळते. आणि अशा इच्छा तुमच्या संबंध होता त्यात प्रेम असेलच असं नाही, त्यात लैं’गिक इच्छा पूर्ण करण्याचा भाग जास्त असतो. पण यात लग्न एक महत्त्वाची भूमिका निभावू शकते. ते कसं?

तर लग्नाआधी जे शा’रीरिक सं’बंध असतात किंवा नसतात ही त्यात फक्त इच्छा असते, त्यात एक प्रकारचा विस्कळीतपणा असतो. तुम्ही त्या माणसाशी पूर्णपणे attach असाल हे गरजेचे नाही. दरवेळी उत्कट प्रेम, आदर असेलच असे नाही. याउलट शा’रीरिक गरज, एक प्रकारची ऊर्मी म्हणून याकडे पाहिले जातात. पण लग्नात समोरच्या व्यक्तीशी आपण मनाने कुठेतरी जोडले जातो. ही व्यक्ती आपल्या आयुष्यभराची सोबती आहे, जोडीदार आहे अस आपण त्याला पाहतो.

त्या व्यक्तीवर असलेल प्रेम, त्याबद्दल असणारी काळजी हे सर्व असल्यावर जे शा’रीरिक सं’बंध येतात ती फक्त का’मेच्छा राहत नाही, ती फक्त गरज राहत नाही तर त्या दोघांचं नातं अजून फुलवत. त्या दोघांना अजून जवळ आणत. यामध्ये फक्त एकतर्फी विचार केला जात नाही तर समोरच्याचा सुखाचा पण विचार केला जातो. या नात्यातून पुढील नात्याबद्दल जसं की पालक होण्याच्या दृष्टीने पण विचार केला जातो. त्यामुळे ते फक्त एक इच्छा राहत नाही तर प्रेम होऊन जातं. त्याच प्रतीक होत.

पण यातही पुन्हा हाच मुद्दा आहे की लग्नानंतर ही कामेच्छा अर्थपूर्ण होण्याची शक्यता वाढते. पूर्णपणे अस होईलच असे नाही. याचं कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याची विचार पद्धती वेगळी आहे. बरेचदा लग्न झाल्यावरही समोरच्याच विचार न करता फक्त स्वतःचा विचार केला जातो. म्हणून लग्नात अडथळे येतात.

म्हणून लग्न जरी आपल्या विस्कळीत का’मेच्छाना अर्थपूर्ण बनवत असेल तरी कधी जर आपण समोरच्याला काय वाटतं याचा विचार केला, त्याची मर्जी सांभाळली, आपल्या प्रत्येक हालचालीतून स्पर्शातून काळजी आदर प्रेम व्यक्त केलं तर. तर खऱ्या अर्थाने या इच्छा अर्थपूर्ण होतील.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!