Monday, May 29, 2023
Homeअध्यात्मलक्ष्मीचे प्रतीक असते घरातील पाल, जाणून घ्या त्या मागचे शुभ संकेत..!!

लक्ष्मीचे प्रतीक असते घरातील पाल, जाणून घ्या त्या मागचे शुभ संकेत..!!

पाल हा जीव बरेचदा आपल्या घरात किंवा आजुबाजूला दिसून येणारा प्राणी आहे. साधारणपणे आपण पालीला पाहून घाबरत असतो, जेव्हा कधी पाल घरात येते तेव्हा आपण तिला घराबाहेर काढण्यासाठी पुढे सरसावतो.

पण तुम्हाला हे माहिती आहे का, आपल्या ध’ र्म’ ग्रंथां मध्ये पाल ही खूपच शुभ किंवा मांगल्याचं प्रतिक मानली जाते. तसेच पाल घरात असणे म्हणजे संपत्ती बरकती असे समजले जाते. पाल जर आपल्या शरीरावर पडली तर ते देखील शुभ असल्याचं प्रतिक मानले जाते.

शरीराच्या या भागावर पाल पडणे शुभ आहे –
ध’ र्म’ ग्रंथाच्या मान्यतेनुसार जर एखादी पाल चुकून एखाद्या माणसाच्या उजव्या बाजूने पडली तर तो शुभ संकेत आहे आणि यामुळे त्या व्यक्तिचा पैशाशी संबंधीत फा-यदा होतो.

आणि जर ती मनुष्याच्या डाव्या बाजूने पडली तर ते अशुभ असल्याचा संकेत आहे. तसेच जर पाल एखाद्याच्या हातावर पडली तर तो शुभ संकेत आहे आणि याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला धनाची प्राप्ती होणार आहे.

पाल जर एखाद्या व्यक्तिच्या नाकावर पडली तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचे नशीब लवकरच बदलणार आहे आणि ती व्यक्ती यशस्वी होणार आहे.

चुकून पाल कुणाच्या गळ्यावर पडली तर समजून घ्यावं की तुमच्या शत्रूचं अस्तित्व नष्ट होणार आहे आणि तुम्ही तुमच्या शत्रूवर लवकरात लवकर विजय मिळवाल.

तसेच पाल एखाद्या व्यक्तीच्या मिशीवर पडणे हा देखील चांगला संकेत मानला जातो आणि याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचा सन्मान होणार तसेच लोक त्या व्यक्तीची प्रशंसा करतील.

पाल चालतांना जर आपल्या उजव्या कानावर पडली तर तुम्ही सोन्याचे दागिने घेणार आहात असं समजून घ्यावं. तेच जर पाल तुमच्या डाव्या कानावर पडली तर तुमचे वय वाढते.

पाल कपाळावर पडणे हा देखील शुभ संकेत आहे आणि यामुळे घरात जास्तीत जास्त पैसे येण्याचे संकेत मिळतात. पण जर ती डोक्यावर पडली तर समजून घ्या की आपल्या बरोबर काही अनुचित प्रकार घडण्याचे ते संकेत आहेत.

पाल जर उजव्या पायावर किंवा टाचेवर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला एखाद्या प्रवासाला जावं लागणार आहे. हो पण हा प्रवास शुभ होणार असल्याचे ते संकेत आहे.

परंतु डाव्या पायावर पाल पडणे हा चांगला संकेत मानला जात नाही. शास्त्रानुसार जर पाल एखाद्या व्यक्तीच्या डाव्या पायावर पडली तर त्या व्यक्तीच्या घरात भांडणं सुरू होण्याचे ते संकेत आहेत.

अचानक उजव्या गुडघ्यावर पाल पडणे हा शुभ संकेत, आणि परंतु या जागी पाल पडणे म्हणजेच आपल्याला अवांछित ठिकाणाहून पैसे मिळण्याचे ते संकेत आहेत.

परंतु डाव्या गुडघ्यावर पाल पडणे हे चांगले संकेत मानले जात नाही. असे म्हणतात की पाल डाव्या गुडघ्यावर पडली तर तुम्हाला वेदनादायी प्रवास करावा लागेल.

ध’ र्म’ ग्रंथानुसार पाल हे लक्ष्मीचे प्रतिकही मानलं जातं. दीपावलीच्या दिवशी जर पाल तुमच्या घरात आली तर समजून घ्या की तुम्हाला धनलाभ होणार आहे.

तसेच आपण त्या पालीचं पूजन करुन तिला हळद कुंकू आणि तांदूळ अर्पण करावे. एवढंच नाही, त्या पालीला पाहून तुम्ही एखादी इच्छा देखील मागू शकतात.

जर एखादी पाल तळापासून भिंतीच्या वरच्या भागाकडे चढत असेल तर ते देखील शुभ संकेत आहेत. परंतु जर ती पाल जर वरपासून खालपर्यंत येत असेल तर ते अशुभ संकेत मानले जातात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स