Friday, December 8, 2023
Homeअध्यात्मलोक कल्याणासाठी स्वामींनी केलेला हा उपदेश नक्कीच वाचावा असा आहे..!!!

लोक कल्याणासाठी स्वामींनी केलेला हा उपदेश नक्कीच वाचावा असा आहे..!!!

मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची 9 वचने व त्यांच्या साराचं महत्वं काय ते बघणार आहोत. यात त्या वचनांवरुन समजते की श्री स्वामी समर्थ यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे लोक कल्याणसाठी घालवले आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात लोकांना खूप उपदेश केलेले आहेत.

मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच असेल श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्त गुरुंचे स्वरूप आहेत. मित्रांनो स्वामींनी लोकांच्या सुखासाठी, उत्कर्षासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोकसेवेसाठी अर्पण केलेले आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर ही श्री स्वामी समर्थ महराजांची हे 9 उपदेश, ही वचने पाळलीत तर तुमचे जीवन आनंदी होईल.

आणि मित्रांनो या उपदेशांमध्ये प्रचंड ताकद आहे. त्या वचनांचा अवलंब जर तुम्ही तुमच्या जिवनात केलात तर तुम्हाला जिवनात कोणत्याही गोष्टीचा लोभ मोह उरणार नाही. तसेच त्यांच्या अवलंब कराल तर तुम्ही कधीही कुणावर रागावणार नाही.

मित्रांनो, तुम्ही स्वामींच्या भक्तिमध्ये अगदी तल्लीन होऊन जाणार. चला तर मित्रांनो आता आपण स्वामींचे ती कोणती 9 वचने व उपदेश आहेत ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनात प्रचंड आनंद, भरभराटी, समृद्धी येईल.

मित्रांनो, स्वामी समर्थांनी लोक कल्याणसाठी केलेले ते 9‌ उपदेश पुढील प्रमाणे आहेत..

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

जे माझी निस्वार्थ भावाने भक्ति करतात त्यांचा मी योगेशमं मी स्वता करतो.

मी आळशी माणसांचे तोंड पाहत नाही.

शेतामध्ये कष्ट कर आणि स्वतःच्या कष्टाचं खा. मिळेल त्यामध्ये समाधानी रहा.

जा तुझे आपराध माफ केलेत यापुढे फक्त सावधगिरीने वाग.

कोणतेही संकट आले तर भिऊ नकोस पुढे जात रहा त्यांचा सामना कर आम्ही आहोत तुझ्या सोबत तुला नक्की यश भेटणार.

माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव आणि राहिलेले आयुष माझ्या नामस्मरणात तल्लीन हो, मोक्ष मिळेल.

मी सर्वत्र आहे मी फक्त तुझ्याचसाठी आलो आहे तू चिंता करु नकोस.

हम गया नाही हम जिंदा है.

मित्रांनो वर दिलेले 9 उपदेश तुम्ही नक्कीच पाळायला हवेत. आणि तुम्ही हे 9 उपदेश पाळलेत तरच तुम्ही स्वामींचे खरे भक्त होऊ शकाल. मित्रांनो वर दिलेले हे 9 उपदेश श्री स्वामी समर्थ यांच्या माहिती पुस्तिकेमधून घेतलेले आहेत त्यामुळे यांची कोणतीही निंदा करु नये.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स