माघ पौर्णिमा.. इथे गुपचूप फेका 2 विलायची.. बाधा, करणी, साडेसाती संपेल… पिढ्या पैशांवर राज्य करतील…

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो 5 फेब्रुवारी 2023 म्हणजेच रविवारचा दिवस आणि या दिवशी माघ पौर्णिमा आलेली आहे. मित्रांनो कलियुगाचा प्रारंभ मग पोर्णिमेपासूनच झाला होता. म्हणूनच या पौर्णिमेच महत्व अनन्य साधारण आहे. यंदाच्या वर्षी माघ पौर्णिमेच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्याने या पौर्णिमेच महत्व अनेक पटींनी वाढलेले आहे. खरतर या दिवशी आपण एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करावं असं शास्त्र सांगत.

मात्र आजच्या आधुनिक काळात प्रत्येकाला हे करणे शक्य होत नाही. मात्र अशा वेळी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात सफेद तीळ टाकून स्नान करावे. असे केल्याने तीर्थ क्षेत्री जाऊन स्नान केल्याचे पुण्यफल आपल्याला प्राप्त होत. मित्रानो अशी मान्यता आहे कि या दिवशी दान धर्म केल्याने आपल्या पुण्यात कैक पटीने वाढ होते.

परंतु मित्रांनो तुमच्यावर कोणती बाधा झाली असेल तर या दिवशी दूध आणि दही यांचं दान करणे कटाक्षाने टाळा. ज्यांना साडेसातीचा त्रास होत आहे अशा लोकांनी या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करावी. घरातून तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत वृक्षाला जल अर्पण करायचं आहे.

झाडाभोवती विषम संख्येत प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ज्या लोकांचा व्यापार, उद्योग धंदा आहे तो उद्योग धंदा व्यवस्थित चालत नाहीये, दुकान चालत नाहीये, ग्राहक येत नाहीयेत. एखाद्याला उधार पैसे दिले असतील आणि समोरून पैसे येत नसतील अशा वेळी हा उपाय आपण करायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन विलायची घ्यायच्या आहेत आणि त्या विलायची घेऊन आपल्या जवळील शिव मंदिरात जाऊन अर्पण करायच्या आहेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत या विलायची शिवलिंगावर अर्पण करा. विलायची अर्पण करण्याआधी तांब्या भर जल आपण शिवलिंगावर अर्पण करायचं आहे.

तसेच सोबतच ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर अर्पण केलेल्या विलायची मधले दाणे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते दाणे आपण पिंपळ वृक्षाच्या खोडावर अर्पण करायचे आहेत. तुम्ही आजवर पहिलेच असेल कि या पिंपळाच्या झाडाच्या आसपास मुंग्या किंवा मुंगळे असतात.

हे कीटक विलायची दाणे जसे जसे खातात तस तस तुमच्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या दूर होऊ लागतात. तर मित्रांनो या पौर्णिमे निमित्त हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या सर्व इच्छा, सर्व अपेक्षा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ..

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment