‘या’ भारतीय क्रिकेटपटूसाठी काहीही करायला तयार होती धक धक गर्ल.. घरचेही लग्नासाठी होते तयार पण…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. तिच्या करियरच्या सर्वोच्च स्थानी असताना या क्रिकेटपटूच्या प्रेमात होती. बॉलिवूडमधील धक धक गर्ल अशी ओळख असलेली माधुरी दिक्षित तिच्या करियरच्या सर्वोच्च स्थानी होती तेव्हा तिच्या चाहत्यांची संख्या लक्षावधींमध्ये होती. अर्थात आजही माधुरीचे लाखो चाहते आहेत. पण काही वर्षांपूर्वी माधुरीची प्रचंड क्रेझ तिच्या चाहत्यांमध्ये होती.

माधुरीच्या एका इशाऱ्यावर तरुणाई भान हरपून जायची. एक काळ असा होता जेव्हा माधुरीकडे प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही गोष्टींची कमतरता नव्हती. मात्र प्रसिद्धी आणि पैशाबरोबरच तिच्यासंदर्भातील कॉन्ट्राव्हर्सिही फार होत्या.

मात्र याच कालावधीमध्ये एक क्रिकेटपटू असाही होता ज्याच्यासाठी बॉलिवूडमधील ही सर्वात सुंदर अभिनेत्री सर्व काही सोडून द्यायला तयार होती. हा क्रिकेटपटू त्या काळातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक होता.

माधुरी ज्या क्रिकेपटूसाठी वेडी होती त्याचं नावं होतं अजय जडेजा. माधुरीला जडेजा फार आवडायचा. ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती.

मात्र या दोघांचं नात्याला योग्य ते नावं मिळण्याआधीच दोघांच्याही आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या की त्यांच्या प्रेमाची ही गोष्ट अधुरीचं राहिली.

बॉलिवूडमधील चर्चांनुसार अजय जडेजा आणि माधुरी दीक्षितची ओळख एका जाहिरातीच्या शुटींगदरम्यान झाली होती. यानंतरच ते दोघे प्रेमात पडले.

दोघांचे काही फोटो समोर आल्यानंतर अजय जडेजा आणि माधुरी दीक्षितच्या प्रेमप्रकरणाबद्दल उघडपणे चर्चा होऊ लागली.

असंही म्हणतात की माधुरी जडेजाच्या एवढी प्रेमात होती की दिग्दर्शकांना त्याला चित्रपटांमध्ये संधी देण्याचीही मागणी करु लागली. जडेजालाही अभिनय क्षेत्रात करियर करण्याची सुप्त इच्छा होती.

मात्र या दोघांच्या लव्हस्टोरीमध्ये कधी परिस्थिती तर कधी कुटुंबियांनी खलयनायकाची भूमिका बजावली. त्यामुळेच अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित यांच्या लव्ह स्टोरीचा कटू शेवट झाला आणि ते दुरावले. नेमक्या कोणत्या कारणामुळे या दोघांचं लग्न झालं नाही ते जाणून घेऊयात…

अजय जडेजा आणि माधुरी दीक्षित एकमेकांशी लग्न करायलाही तयार होते. मात्र अजय जडेजाच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता. अजय जडेजा हा शाही कुटुंबातील सदस्य आहे. तर माधुरी ही सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरातील मुलगी होती.

सामान्य कुटुंबातील मुलीबरोबर लग्नाला विरोध असल्याने जडेजा कुटुंबियांनी अजय जडेजा आणि माधुरी दीक्षितच्या नात्याला विरोध केला. एकीकडे या नात्यावरुन वाद सुरु असतानाच दुसरीकडे जडेजाच्या करियरसंदर्भात प्रश्न उपस्थित होऊ लागले.

मोहम्मद अझरुद्दीनबरोबर मॅच फिक्सिंगच्या आरोपामध्ये अजय जडेजाचंही नाव समोर आलं. यानंतर माधुरी दीक्षितच्या कुटुंबियांनीही या नात्याला नकार दिला. त्यानंतर काही काळात माधुरी अमेरिकेला निघून गेली.

अमेरिकेमध्ये गेल्यानंतर माधुरी दीक्षितने डॉक्टर श्री राम नेनेंबरोबर लग्न केलं. माधुरीला दोन मुलं आहेत.

दुसरीकडे जडेजानेही राजकारणी असलेल्या जया जेटली यांची मुलगी अदिती जेटलीशी लग्न केलं. फोटोत जडेजा आणि त्याची पत्नी जया जेटली.

सध्या माधुरी रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रशिक्षक म्हणून दिसते तर जडेजा क्रिकेटमध्ये समालोचनक करतो.

Leave a Comment