मागच्या लॉकडाऊन मध्ये एक शब्द प्रचलित झाला ‘कोरोनावॉरियर्स’.. आणि आता..,

मागच्या वर्षीच्या लॉ’ क’ डाऊन मध्ये एक शब्द फार प्रचलित झाला होता ‘ को’ रो’ना वॉरियर्स’, आणि आता या वर्षीच्या लॉ’ क’ डाऊन मध्ये एका नविन शब्दांची भर पडणार आहे. तो म्हणजे ‘ऑक्सिजन वॉरियर्स’ हो तुम्ही बरोबर वाचलं.

या को’ रो’ ना काळात औषधांचा काळाबाजार करणारेही पाहिलेत. आणि रुग्णांची श्वासांसाठी होणारी धडपड अविरतपणे सुरु ठेवण्यासाठी जीवाचं रान करणारे हे ‘ऑक्सिजन वॉरियर्स’ देखील

रविवारी दुपारचे तीन वाजता आहेत. आणि आम्ही स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (सेल) च्या आयनॉक्स बोकारो प्लांटमध्ये उभे आहोत.

दिवसरात्र येथे लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) तयार केला जातो. बोकारो स्टील लिमिटेडच्या कॅप्टिव्ह प्लांटमध्ये ऑक्सिजन तयार करणारी मशीनेंही दिवसरात्र आवाज काढत आहेत.

46.48 टन ऑक्सिजन घेऊन जाणारे चार टँकर येथून लखनऊला रवाना झाले आहेत. पाच टँकरमध्ये 75 टन ऑक्सिजन आहे, जे रात्री उशिरा सोडण्यात येईल. कैप्टिव् ऑक्सिजन प्लांटमध्ये 90 बीएसएल कर्मचारी आहेत.

मेसर्स आयनॉक्सच्या प्लांटमध्ये सुमारे 80 कामगार आहेत. 8-8 तासांच्या तीन शिफ्टमध्ये सतत ऑक्सिजनचं उत्पादन चालू आहे.

तेथे समोर कामगारांचा लंच बॉक्स पाहून आम्ही त्यांना अशाच प्रकारे विचारले, तुम्ही जेवलात काय? आणि कामगार म्हणाले, दररोज 150 टन ऑक्सिजन तयार करावा लागेल.

आज 100 टनसुद्धा तयार केला नाही. वेळ कमी आहे. अजूनही 50 टन ऑक्सिजन तयार होईपर्यंत आम्ही अन्न खाणार नाही. हे शब्द त्या कामगारांचे होते.

स्टील प्लांटचे प्रभारी संचालक अमरेंदू प्रकाश म्हणतात की सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. को’ रो ‘नाच्या दुसर्‍या लाटेत, रूग्णालयात ऑक्सिजनची पातळी कमी असल्याच्या तक्रारी वाढल्यामुळे ऑक्सिजनची मागणी देखील वाढली.

यामुळे बहुतेक शहरांमध्ये ऑक्सिजनचा अभाव निर्माण झाला. रुग्णांना श्वास घेण्यास अवघड होतं आहे. अशा जिकरीच्या वेळी या सेल युनिटने संपूर्ण देशाला ऑक्सिजन देण्याचे वचन दिले आहे.

एप्रिल महिन्यात किती ऑक्सिजन देण्यात आला. (मेट्रिक टन मधील आकडेवारी)

झारखंड 308
उत्तर प्रदेश 456
बिहार 374
पं. बंगाल 19
पंजाब 44
महाराष्ट्र 19
मध्य प्रदेश 16

Leave a Comment