
नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो 5 फेब्रुवारी रविवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे माघ पौर्णिमा. मित्रांनो पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीची अत्यंत प्रिय तिथी मानली जाते. पौर्णिमा तिथीस केलेले उपाय हे माता लक्ष्मीस प्रसन्न करतात. माता लक्ष्मी जर प्रसन्न असेल तर आपल्या जीवनातील धन संबंधित सर्व समस्या दूर होतात. तुमच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी पौर्णिमा तिथीस आपण माघ पौर्णिमेचे उपाय दिवसभरात किंवा रात्री सुद्धा करू शकता.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला वडाच्या झाडाचं एक पान घ्यायच आहे वडाच्या झाडाचं पान नाही मिळालं तर तुम्ही पिंपळाच्या झाडाचे पान सुद्धा घेऊ शकता. तर वडाच किंवा पिंपळाच एक पान आपण घ्यायच आहे. चांगल्या स्थितीतलं ताजपान घ्यायच आहे. फाटलेलं किंवा खराब झालेल पान आपण घ्यायचं नाही. तर हे पान गंगाजल ने स्वच्छ धुवायचे आहे. गंगाजल नसेल तर साध्या पाण्याने आपण हे पान धुवायचे आहे.
त्यांनतर हे पान कोरडं करायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी हात पाय धुवून आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. त्यांनतर जे पान आपण घेतलेल आहे वडाचे किंवा पिंपळाच पान तुम्ही घेतलेल असेल तर त्यावर लाल चंदनाच्या साह्याने आपण दोन अक्षरे लिहायचे आहेत. ही अक्षर लिहिण्यासाठी आपण लाकडी काडीचा वापर करू शकता. लाकडी काडी घेऊन लाल चंदनाच्या साह्याने या पानावरती ओम श्रीम हे दोन अक्षर आपण लिहायचे आहेत.
आता हे दोन अक्षर त्या पानावरती लिहिल्यानंतर एखाद्या ताटामध्ये आपण हे पान ठेवायच आहे आणि त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायच आहे. थोडेसे अक्षत पण अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ओम श्रीम श्रीये नमः ओम श्रीम श्रीये नमः या माता लक्ष्मीच्या मंत्र्याचा मनोभावे 108 वेळा जप करायचा आहे. तुमच्याकडे जर कमल गटाची माळ असेल तर या माळेचा वापर आपण हा मंत्र जप करण्यासाठी करू शकता.
माता लक्ष्मीच्या मंत्राचा मनोभावे 108 वेळा जप केल्यानंतर जे पान आपण घेतलेला आहे वडाच किंवा पिंपळाच पान ज्यावरती आपण ओम श्रीम लिहिलेल आहे या पानांची आपण व्यवस्थित गोल गोल गुंडाळी करायची आहे. ज्याप्रमाणे आपण नोट गुंडाळतो अगदी त्याचप्रमाणे हे पान आपण गुंडाळायच आहे आणि लाल रंगाचा जो कलम असतो जो धागा असतो त्या धाग्याने हे पान आपण व्यवस्थित बांधायचं आहे जेणेकरून या पाण्याची गुंडाळी सुटणार नाही.
आता हे पान घरातील जी तिजोरी आहे त्या ठिकाणी हे वडाच किंवा पिंपळाच पान ठेवायच आहे आणि आपल्या मनात जी काही इच्छा आहे ते आपण त्या ठिकाणी बोलून दाखवायचे आहे. आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात पैसा यावा, घरात धनधान्य सुख समृद्धी नांदावी अशी मनोमन प्रार्थना आपण त्या ठिकाणी करून हे वडाचे पान तिजोरी मध्ये ठेवायच आहे.
हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात पैसा येऊ लागेल. या ना त्या मार्गाने धन तुमच्या घराकडे खेचले जाईल. घरात जो पैसा येतोय तो सुद्धा टिकून राहील. उद्योगधंदा व्यवसाय यामध्ये सुद्धा उत्तरोत्तर वाढ होत राहील. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की बसेल तर मित्रांनो या माघ पौर्णिमेस हा छोटा उपाय नक्की करून बघा.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!