माघ शुक्र प्रदोष.. बेलाच्या वृक्षाला अर्पण करा ही वस्तु.. पैसा इतका येईल की सांभाळता येणार नाही..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! मित्रांनो 3 फेब्रुवारीस माघ महिन्यातील शुक्र प्रदोष आलेला आहे. महादेवांना म्हणजेच भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठीचा हा सर्वोत्तम दिवस आहे. आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकट दूर करून भगवान भोलेनाथांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी हा उत्तम दिवस आहे. त्यासोबतच काही अत्यंत छोटे छोटे उपाय करून आपण आपल्या जीवनातील तमाम समस्या दूर करू शकता.

विशेष करून ज्यांच्या जीवनामध्ये धन संबंधित समस्या आहेत, घरात पैसा येत नाही, काम तर करत आहे पण त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर यासाठी हे काही उपाय या वेळी आपण नक्की करा. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रदोष काळ निवडायचा आहे. सायंकाळची वेळ म्हणजेच प्रदोष काळा. आता प्रदोष काळ कधी सुरू होतो तर सूर्यास्त होण्याच्या आधीचा एक ते दीड तास. आणि सूर्यास्त नंतरचा एक ते दीड तास हा प्रदोष काळ मानला जातो.

तर या वेळेमध्येच आपण हा उपाय करायचा आहे. जर तुम्ही हे प्रदोष व्रत करताना या दिवशी उपवास करत नसाल तरीसुद्धा हा उपाय आपण करू शकता. पण हा उपाय करण्यापूर्वी आपण सायंकाळच्या वेळी हात काय तोंड स्वच्छ धुवायचे आहेत. शक्य असेल तर स्नान करावे आणि त्यानंतर भगवान भोलेनाथांची मनोभावे पूजा करायची आहे. तुम्हाला जर मंदिरात जाऊन हा उपाय करणे शक्य असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन हा उपाय करा किंवा घरातल्या घरात जर तुमच्या घरात शिवलिंग असेल तरीसुद्धा हा उपाय आपण करू शकता.

आता शिवलिंगावर आपण मनोभावे जल अर्पण करायच आहे. मित्रांनो हे जल अर्पण करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंगावर आपण जे पाणी अर्पण करणार आहोत, जे जल अर्पण करत आहोत त्यातील थोडसं जल आपण वाचवून ठेवायच आहे आणि हे शिल्लक राहिलेले पाणी आपण बेलाच्या झाडास अर्पण करायच आहे. तुमच्या आसपास जिथे कुठे बेलाचा वृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन या बेलाच्या वृक्षास आपण जे शिल्लक राहिलेले जल आहे तेच जल बेलाच्या झाडाला अर्पण करायच आहे.

त्यानंतर मनोभावे हात जोडून त्या बेलाच्या वृक्षास आपण आपल्या जीवनातील दुःख संकट दूर होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. आपली जी काही मनोकामना शुभेच्छा असेल ती त्या ठिकाणी आपण बोलून दाखवायची आहे. मित्रांनो बेलाच्या वृक्षांमध्ये साक्षात भगवान महादेव वास करतात. भोलेनाथ हे खरोखरच खूप भोळे आहेत. आपल्या भक्तांची मनोकामना ते नक्की पूर्ण करतात. तर अशा प्रकारे आपल्या मनातील इच्छा त्याठिकाणी बोलल्यानंतर आपण आपल्या घरी निघून यायचं आहे. मित्रांनो शक्य असेल तर त्या बेलाच्या वृक्षा खाली आपण गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा प्रज्वलित करू शकता.

मित्रांनो अत्यंत प्रभावी असा प्रदोष व्रताच्या दिवशी केला जाणारा हा उपाय आपल्या जीवनातील दुःख संकट दूर करण्यासाठी आपण सुद्धा नक्की करून पहा. मित्रांनो आपली मनोकामना पूर्ण करणारा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपण सुद्धा नक्की करून पहा. जेव्हा तुम्ही घरी महादेवांची पूजा करणार आहात तेव्हा शिवलिंगावर बेलपत्र नक्की वाहा, धूप दीप दाखवा, पांढऱ्या रंगाची फुले जी महादेवांना अत्यंत प्रिय आहेत अशी पांढऱ्या रंगाची फुले सुद्धा महादेवांच्या शिवलिंगावर नक्की वाहा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment