नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो बजरंग बलींची पूजा करण्यापूर्वी स्वच्छता आणि शुद्धतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. पूजा करताना कोणत्याही प्रकारची अशुद्धता असू नये.
मारुतीची उपासना केल्याने कोणत्याही प्रकारची बाधा असो ती झटक्यात दूर होते. त्यांच्या सेवेचे फळ नक्कीच प्राप्त होते. मारुतीची उपासना आपल्या मनातली सर्व इच्छा लवकर पूर्ण करणारी मानली जाते. जी व्यक्ती हनुमानजींना योग्य मार्गाने प्रसन्न करण्याचा प्रयत्न करते, हनुमानजींच्या कृपा आशीर्वादाने अत्यंत कमी कालावधीत श्रीमंत होते.
जर तुम्ही सुद्धा महाबलीचे भक्त असाल आणि पैशांच्या समस्यांपासून मुक्त व्हायचे असेल तरत्यासाठी अत्यंत लाभदायी असा हा एक विशेष उपाय आहे. या उपायानुसार हनुमान जीची पूजा रात्रीच्या वेळी करावी. स्त्री असो किंवा पुरुष, दोघेही पूजा करू शकतात, परंतु हे लक्षात ठेवा की पूजा करताना तुम्हाला काही विशेष नियमांचे पालन करावे लागेल.
बजरंग बलीची पूजा करण्यापूर्वी शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध ठेवावे. या पूजेदरम्यान, मनात वाईट विचार येऊ देऊ नका आणि मनाला इकडे -तिकडे भटकू देऊ नका. तरच आपल्याला पूजेचे फळ प्राप्त होईल.
आजच्या कलियुगाच्या काळात, हनुमान जी सर्वात लवकर प्रसन्न होणाऱ्या देवतांपैकी एक मानले जातात. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे उपाय प्राचीन काळापासून अवलंबिले जातात. हे उपाय केवळ व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करत नाहीत तर सर्व इडापिडा नष्ट करतात आणि संपत्तीत वाढ देखील होते.
यातील पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे हनुमान चालीसाचा पाठ करणे. म्हणून तुम्ही दररोज किंवा प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालीसाचे पठण करावे. तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी, तुम्ही रोज रात्री हनुमानजीसमोर कापसाची वात आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कारण सूर्यास्तानंतर रात्री दिवा लावणे खूप फायदेशीर आहे. या उपायानुसार मातीचा दिवा वापरावा. यानंतर हनुमानजींच्या मंत्रांचा जप करावा.
यासोबतच हनुमान चालीसाचे पठण करावे. जर तुम्हाला संपूर्ण हनुमान चालीसा वाचता येत नसेल, तर तुम्ही काही ओळींचा जप देखील करू शकता. या उपायाने एखाद्या व्यक्तीचा वाईट काळ लवकरच चांगल्या वेळेत बदलतो. यासह, पैशाशी संबंधित सर्व समस्या देखील दूर होतात. आपले दुःखाचे दिवस संपणार आणि सुख समाधान ऐश्र्वर्य प्राप्त होईल. तुमच्यावर मारुती भगवान प्रसन्न होतील. तुम्हाला इच्छित फलप्राप्ती नक्कीच होईल.
याशिवाय, तुलसीदास रचीत रामचरितमानस मधील सुंदरकांडाचे पठण केल्याने हनुमानजी खूप लवकर शुभफल प्रदान करतात. जे भक्त श्री रामाचे नाम जपतात आणि त्यांच्यावर अतुट श्रद्धा ठेवतात ते हनुमानजींना अत्यंत प्रिय असतात. प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी मारुतीला शेंदुर आणि सुगंधी तेल अर्पण करावे. मारुतीला शेंदुर खूप प्रिय आहे, म्हणून जे भक्त शेंदुर अर्पण करतात, हनुमान जी त्यांची इच्छा लवकरच पूर्ण करतात.
यासोबतच हनुमानजींना नियमितपणे धूपदीप लावावे आणि पुष्पहार अर्पण करावे. महाबली यांचा फोटो घरात एका पवित्र स्थानावर लावावा आणि अशा प्रकारे लावा की मारुती दक्षिण दिशेला बघताय असे दिसायला हवे. याशिवाय, कोणत्याही विशेष मुहूर्तावर किंवा विशेष सणाला आपल्या इच्छेनुसार पूर्ण भक्तीने मारुतीची सेवा करावी. त्यांचा श्रृंगार करावा.
तसेच दर शनिवारी किंवा मंगळवारी बनारसी पान बजरंग बलीला अर्पण करावे. बनारसीच्या पानांनी बनवलेला विडा अर्पण केल्याने हनुमानजींची कृपा कायम राहते. यासह, जे भक्त रामायण किंवा श्री रामचरितमानसचे पठण, श्रवण करतात किंवा दररोज त्यांचे दोहे वाचतात, त्यांनाही हनुमान यांचा विशेष स्नेह प्राप्त होतो.
अशा या अगदी सोप्या सरळ उपायांनी तुम्ही मारुती रायाला प्रसन्न करून आपले मनोरथ साध्य करून घेऊ शकतात.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरला सल्ला सुद्धा घेऊ शकता.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!