महाभारतात शेवटी या 5 योद्ध्यांना.. युद्धाच्या नियमाविरुद्ध कपटाने मरण का मिळाले.?


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. कुरुक्षेत्राचे ते मैदान जिथे कोट्यवधी योद्धे धर्म आणि अधर्माच्या नावाखाली युद्धात सहभागी झाले होते आणि त्यांनी या युद्धात आपले प्राण गमावले. हे महायुद्ध महाभारत म्हणून ओळखले जाते.

या युद्धापूर्वी च श्रीकृष्णाने अर्जुनाला असे सांगितले होते की, या योद्धांकडे लक्ष देऊन पाहा, हे या काळातील सर्वात महान आणि पराक्रमी योद्धे आहेत, जे या युद्धानंतर दिसणार नाहीत आणि येणाऱ्या युगात असे योद्धे पुन्हा जन्माला येणार नाहीत. भगवान श्रीकृष्णाच्या या वाक्यावरून च महाभारताच्या महायुद्धाच्या भीषणतेचा अंदाज आपल्याला बांधता येतो.

या महायुद्धाला हजारो वर्षे उलटून गेली आहेत, धर्म आणि अधर्माच्या या युद्धात धर्माच्या विजयासाठी अनेक महान योद्धे कपटाने आणि युद्धाच्या नियमाविरुद्ध मारले गेले. कारण युद्धामधे, विजय हा एकच नियम असतो आणि त्यासाठी सगळे नियम आणि आचार विसरले जातात.

भीष्म – महाभारताच्या महान युद्धात भीष्म हे सर्व योद्ध्यांमध्ये सर्वात वृध्द आणि श्रेष्ठ होते. त्यांच्या राजभक्तीमुळे, त्यांनी कौरवांशी युद्धात भाग घेण्याचे ठरवले आणि पांडवांच्या विजयात सर्वात मोठा अडथळा ते बनले होते. महाभारताच्या युद्धात पांडवांना पराभूत केल्याशिवाय विजय मिळणे अशक्य होते कारण भीष्म हे कौरवांचे सेनापती म्हणून त्यांची ढाल झाले होते.

18 दिवस चाललेल्या या युद्धात भीष्मांनी एकट्याने 10 दिवस पांडवांच्या सैन्याचा नाश केला. अशा स्थितीत भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुन शिखंडीला आपल्या रथावर आणले होते, जो पुरुष नव्हता आणि स्त्रीही न्हवता. भीष्मांनी शिखंडीला स्त्री मानले होते आणि पांडवांना हे रहस्य माहीत होते. स्त्रीवर शस्त्रे न उचलण्याच्या भीष्मांच्या वचनाचा फायदा घेऊन अर्जुनाने युद्धाच्या दहाव्या दिवशी भीष्मांना बाणांनी मारले.

द्रोणाचार्य – भीष्मानंतर कौरवांचे सेनापती झालेले द्रोणाचार्य कौरव आणि पांडवांचे गुरु होते. भीष्मांप्रमाणे हे सुद्धा पांडवांच्या मार्गातील मोठा अडथळा ठरले होते. युद्धात त्यांचा पराभव करणे कोणालाही शक्य न्हवते. असे मानले जात होते की केवळ त्यांच्या दुःखानेच द्रोणाचार्यांचा वध केला जाऊ शकतो. अशा स्थितीत पांडवांनी द्रोणाचार्याशी एक कपट केले. भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारले आणि द्रोणाचार्याकडे गेला आणि म्हणाला की मी अश्वत्थामाला मारले.

द्रोणाचार्यांच्या मुलाचे नावही अश्वत्थामा होते. भीमाच्या बोलण्यावर द्रोणाचार्यांचा विश्वास बसला नाही. तेव्हा धर्मराजाने युधिष्ठिराला विचारले की अश्वत्थामा मारला गेला का? यावर युधिष्ठिर म्हणाला, ‘अश्वत्थामा हटो, नरो वा कुंजरो वा।’ म्हणजेच अश्वत्थामा मारला गेला, पण तो नर आणि हत्तीही असू शकतो. युधिष्ठिर असे म्हणत असताना भगवान श्रीकृष्णाने शंख फुंकला त्यामुळे द्रोणाचार्यांना ते नीट ऐकू आले नाही आणि त्यांनी शोकात आपली शस्त्रे ठेवली. संधीचा फायदा घेत द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न याने द्रोणाचार्याचा वध केला.

जयद्रथ – दुर्योधनाचा मेहुणा जयद्रथामुळे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याला कौरवांनी एकत्र मारले. त्यामुळे संतप्त झालेल्या अर्जुनाने दुसऱ्या दिवशीच्या युद्धात सूर्यास्ताच्या वेळी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर स्वतः अग्निसमाधी घेऊन, अशी शपथ घेतली होती. कौरवांचे संपूर्ण सैन्य त्या दिवशी जयद्रथाच्या रक्षणात गुंतले होते, अशा स्थितीत अर्जुनाला जयद्रथाचा वध करणे अशक्य झाले.

अशा स्थितीत श्रीकृष्णाने एक युक्ती खेळली, त्यांनी सूर्याला आपल्या भ्रमाने झाकले, त्यामुळे अंधार पडला. जयद्रथाला वाटले की संध्याकाळ झाली आहे आणि तो स्वतः अर्जुनासमोर हजर झाला. श्रीकृष्णाला हेच हवे होते, त्यांनी अर्जुनाला धनुष्य हाती घेऊन जयद्रथाचा वध करण्यास सांगितले, अजून सूर्यास्त झालेला नाही असेही त्यांनी सांगितले. मग कृष्णाने हे सांगताच सूर्यदेव पुन्हा प्रकट झाले आणि मग पुढे अर्जुनाने क्षणाचाही विलंब न करता जयद्रथाचा वध केला.

कर्ण – अर्जुनाने कपटाने च कर्णाचा वध केला होता. युद्धाच्या मधेच एका शापामुळे कर्णाच्या रथाचे चाक जमिनी रुतले गेले. आणि त्यावेळी अर्जुनने नि:शस्त्र कर्णावर दैवी शस्त्र चालवले आणि कर्णाला वीरगती प्राप्त झाली.

दुर्योधन – महाभारताच्या युद्धाचा शेवटचा महान योद्धा, जो कपटाने मारला गेला, तो दुर्योधन होता. आणि हा महाभारताचा खलनायक देखील मानला जातो. दुर्योधन आणि भीम यांच्यात गदा युद्ध झाले. या युद्धात कमरे पासून वर गदा मारण्याचा नियम होता. पण कृष्णाच्या सांगण्यावरून भीमाने दुर्योधनाच्या कंबरेवर हल्ला करायला सुरुवात केली कारण गांधारीने दुर्योधनाच्या शरीराचा वरचा भाग वजराचा बनवला होता. आणि अशा प्रकारे दुर्योधनाचाही कपटाने व’ध झाला.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!