Friday, December 8, 2023
Homeअध्यात्ममहादेवांच्या नंदीच्या कानात बोला ही एक गोष्ट, संकटं दूर जातील.. सुख समृद्धी...

महादेवांच्या नंदीच्या कानात बोला ही एक गोष्ट, संकटं दूर जातील.. सुख समृद्धी भरभराटी आरोग्य नांदेल..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आता श्रावण महिना सुरु झाला आहे. प्रत्येक जण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा तसेच त्यांना दुग्धअभिषेक तथा जलाभिषेक करण्यात व्यस्त असतात.

आता या श्रावणात महादेवांचे मंदिरं भक्तांनी अगदी फुलून गेले आहेत. परंतु मित्रांनो, फक्त महादेवांची पूजा करूनच आपली इच्छा पूर्ण होत नसते. त्यासाठी त्यांच्या नंदी महाराजांचे देखील पूजन करावे लागते. मगच महादेवांची कृपादृष्टी आपल्यावर होथ असते आणि महादेवांनी नंदी महाराजांना तसे वरदान देखील दिलेले आहे.

मित्रांनो, नंदी महाराज हे महादेवांचे दूत देखील आहेत जर कधी आपण आपल्या मनातील कोणतीही गोष्ट च्या नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगितली तर ती प्रार्थना महादेवांपर्यंत पोहचविण्याचं काम नंदी महाराज करतात. याविषयीची एक पुराणात कथा देखील सांगितलेली आहे श्री लाभ नावाचे ब्रह्मचारी ऋषीमुनी होते. रोजच्या सवयीनुसार ते दिवसाची सुरुवात करुन..

एके दिवशी ते रानात गेले असताना त्यांना तेथे एक लहान मुले रडताना दिसले त्यांनी इकडे तिकडे पाहिले की त्या मुलाबरोबर कोण आले आहे. का तर तसे त्यांना काहीच दिसले नाही. ते मुल एकटेच होते आणि ते खूप रडत होते.

त्यांनी त्या मुलाला आपल्याबरोबर आपल्या आश्रमात घेऊन आले. व त्याचे संगोपन आपल्या मुला प्रमाणे ते करू लागले व ते त्या बालकास नंदी या नावाने बोलू लागले. ते बालक आता हळूहळू मोठे होऊ लागले होते

एकदा त्या मुलीच्या आश्रमामध्ये दोन साधू आले. व ते साधू त्या मुलाकडे पाहून मुनीला म्हणू लागले. की हे बालक खूपच हुशार आहे. पण हे बालक अल्पायुषी आहे त्याचे म र ण जवळ आले आहे.

जास्त दिवस हे बालक जगू शकणार नाही. हे त्या बालकास समजल्यानंतर ते बालक खूप रडू लागले. व त्याने रानात जाऊन महादेवाची घोर तपस्या करण्यास सुरु केले. ओम नमः शिवाय याचा जप तो करत होता. त्या बालकाच्या या तपश्चर्येने महादेव खुश झाले.

प्रकट होऊन त्याला अमर होण्याचा आशीर्वाद दिला. व त्या बालकास आपल्या बरोबर घेऊन गेले. महादेवांनी व पार्वतीने आपल्या सर्व गणांसमोर नंदीला सर्व गुणांचा अधिपती म्हणून अभिषेक केला.

व त्यावेळी त्यांनी असा आशीर्वाद दिला. की ज्या ज्या ठिकाणी महादेव असतील त्या त्या ठिकाणी नंदी महाराज हे असणारच. नंदी महाराजांच्या शिवाय महादेवांचे कोणतेही मंदिर पूर्ण होत नाही. आणि जे जे भक्त नंदीच्या कानामध्ये आपल्या इच्छा सांगतील, त्या त्या सर्व इच्छा त्यांच्या लवकरात लवकर पूर्ण होतील.

असा शुभ आशीर्वाद त्यांनी त्यावेळी नंदीला दिला. आपण महादेवांना आपली इच्छा सांगू शकतो. पण आपली इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी आपण जर नंदीच्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती इच्छा लवकर पूर्ण होते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स