महादेवांच्या या १२ मंत्रांचा जप केल्याने सर्व कामं यशस्वीपणे पार पडतील

भगवान महादेवांची साधना करतांना अतिउत्साहापोटी काही लोक अपूर्ण माहिती च्या आधारावर साधना करत असतात. तर या चुका आपल्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. भगवान शंकरांना देवांचा देव महादेव म्हणतात.

ज्या व्यक्तीला कुठल्याही अपेक्षा, लोभ नाही तोच महादेव असू शकतो. मनुष्याच्या स्वाभाव म्हणजे मनुष्याला कोणत्या ही कामाच्या बदल्यात मोबदला हवाच असतो . पण महादेव तेच असतात जे कधीच मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत. ते नेहमी लोकांच्या कल्याणासाठी झटत असतात.

संसारिक आयुष्यात महादेवांचे स्वरूप आणि चरित्र संतुलन आणि ताळमेळाची आदर्श प्रेरणा आहे. महादेव सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा, पालनकर्ता विष्णू या सर्व देवांचे प्रिय आणि पूजनीय आहेत.

महादेवाचे संहारक रूप जगाचे रचनाकार आणि पालनकर्ते यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाचा नाश करून जगामध्ये संतुलन कायम ठेवतात.

आणि याच कारणामुळे व्यवहारिक आयुष्यात सर्व दु:ख, कलह, दरिद्रता हे दोष दूर करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी महादेवाच्या छोट्या-छोट्या मंत्रांचा जप आपण करावयास हवा.

या मंत्रांमुळे महादेवाच्या वेगवेगळ्या रूपातील गोष्टी उजागर होतील. दर सोमवारी महादेवांच्या या लेखात खाली दिलेल्या १२ मंत्रांचा जप केल्याने मोठे-मोठे कार्य यशस्वी होतील.

सोमवारी शिवलिंगावर दुध आणि पाण्याचा अभिषेक करा. गंध, अक्षदा, नैवैद्य दाखवून महादेवाची पूजा करा. पूजा करतांना किंवा झाल्यानंतर दिवा लाऊन आसनावर बसा आणि खाली दिलेल्या मंत्राचा जप करा. सर्वात शेवटी महादेवाची आरती करा.

ॐ महादेवाय नम:,
ॐ हरये नम:,
ॐ हराय नम:

ॐ महेश्वराय नम:,
ॐ शंकराय नम:,
ॐ अम्बिकानाथाय नम:

ॐ गंगाधराय नम:,
ॐ जटाधराय नम:,
ॐ त्रिमूर्तये नम:

ॐ सदाशिवाय नम:,
ॐ मृत्युञ्जयाय नम:,
ॐ रुद्राय नम:

Leave a Comment