प्रत्येकाला मनापासून वाटतं की आपला खिसा हा नेहमीच पैशांनी भरलेलाअसावा, खरं तर पैसा हा प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचा आहे. जर खिशात पैसा असेल तर आपण समाधानी असतो. पण रिकामा खूपच दुःख देऊन जातो. बऱ्याच लोकांच्या बाबतीत असं होत की सकाळी खिशातील पॉकेट पैशांनी भरलेलं असतं पण संध्याकाळ पर्यंत ते अगदी रिकामं झालेलं असतं.
अस कशामुळे होत असेल बरं..? खिशातल्या पॉकेट मध्ये पैसे का शिल्लक राहत नाही आणि ते कायम राहण्यासाठी काय करायला हवं..?? तर त्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. जर तुम्ही हे उपाय केलेत तर नक्की तुमचं खिशातलं पॉकेट कायमस्वरूपी भरलेलंच दिसेल. चला तर मग आपण आता पाहुयात उपाय काय आहे ते…
आपल्या खिशातल्या पॉकेट मध्ये कायमस्वरूपी पैसे टिकून राहण्यासाठी आपण घ्यायचे आहेत एकवीस अखंड तांदूळ, तर हे २१ अखंड तांदूळ घ्यायचेत, आणि ते एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या खिशातील पॉकेटमध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत. याच्यामुळे काय होतं की अन्न जसं कणा-कणाने वाढते, तसेच आपले पैसेही कणा-कणाने वाढतात. आणि ते एकाजागी स्थिर राहतात. तर मित्रांनो, आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला अडचणींवर फरक पडलेला दिसून येईल.
दुसरा उपाय आहे पिंपळाचे पान…जर आपण एक पिंपळाचे पान आपल्या खिशातील पॉकेट मध्ये ठेवले तर आपले पैसे नेहमी टिकून राहतात, आणि वाढतही राहतात. तिसरी गोष्ट आपण पाहणार आहे कवडी, जर आपण एक कवडी आपल्या खिशातल्या पॉकेट मध्ये ठेवली तर आपले पैसे वाढण्यासाठी खुपच मदत होते. पैसे एकाजागी टिकून राहतील. त्यानंतर पुढची गोष्ट आहे रुद्राक्ष,
जर आपण रुद्राक्ष खिशातल्या पॉकेट मध्ये ठेवाल तर तुमच्यावर धनाची देवता लक्ष्मींची कृपा होत असते. असे केल्याने तुमच्या खिशातल्या पॉकेट मध्ये नेहमी पैसा टिकून राहतो. अणखी एक गोष्ट म्हणजे आपले आई वडील आपल्याला पॉकेट मनी देतात खर्च करण्यासाठी, किंवा बक्षीस म्हणून नाहीतर इतर कुठल्याही कामांसाठी दिलेले असतात. जर हे आईवडीलांनी दिलेले पैसे तुम्ही आपल्या पॉकेट मध्ये खर्च न करता जपून ठेवलेत, तर तुमचा पैसा टिकून राहण्यास मदत होते.
ते पैसे तुम्ही खर्च करायचे नाहीत. आई वडिलांनी दिलेले पैसे असतात ते कधीच खर्च करायचे नसतात, तर ते खिशातील पॉकेट मध्ये सांभाळून ठेवायचे असतात. या पैशांसोबत त्यांचे आशिर्वाद सुद्धा आपल्या सोबत कायम राहणार आणि त्याच बरोबर त्या पैशांमुळे तुमच्या आईवडीलांच्या आशिर्वादामुळेच तुमचे इतर पैसेही वाढण्यास मदत होते.
या नंतर आपण जे पैसे खिशातल्या पॉकेट मध्ये ठेवतो ते पैसे घडी न वळता ठेवायचे आहे. त्या पैशांची ते कधीच घडी करून ठेवायचे नाही. किंवा चुरगळलेल्या अवस्थेत कसेतरी ठेवायचे नाहीत. शक्य असल्यास त्या पैशांची घडी घालायची नाहीए.
अजून पुढचा एक उपाय म्हणजे मोर पंख , जर तुमच्या खिशातल्या पॉकेट मध्ये तुम्ही मोर पंख ठेवला असेल तर या मोर पंखामुळे आपले बचत केलेले पैसे टिकण्यासाठी मदत होते. तुमचा पैसाही आश्चर्यजनक रित्या वाढतो.
त्यानंतर मंदीरातला लाल धागा जर पूजा केलेला किंवा अभिमंत्रीत केलेला असेल आणि तो जर आपण आपल्या खिशातल्या पॉकेट मध्ये ठेवला. तर आपला पैसा वाढण्यास नक्की मदत होत असते. आता शेवटचा आणि खूप महत्त्वाचा उपाय म्हणजे धनाची देवता महालक्ष्मींची प्रतिमा,
जर महालक्ष्मींची प्रतिमा तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवत असाल तर तुम्ही दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात की जी महालक्ष्मींची प्रतिमा आहे ती बसलेल्या स्थितीत असावी, दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रतिमा दुमडलेली नसावी. तर मित्रांनो, अशी एक महालक्ष्मींची प्रतिमा आपल्याला खिशातल्या पॉकेट मध्ये ठेवायची आहे. असे केल्यास आपल्यावर महालक्ष्मींची कृपा कायम बनून राहते.
तर मित्रांनो हे होते काही उपाय ज्यामुळे तुमच्या पैशांच्या संदर्भातील सर्व अडचणी दूर होतील. उपाय केल्यानंतर फरक जाणवला तर नक्की कंमेंट करून आम्हाला कळवा. तसेच उपाय आवडले असतील तर नक्की लाईक करा…!!
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपाय आम्ही आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कुणीही तसा गैरसमज करू घेऊ नये. माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.