महाशिवरात्रि 2022 अशा पद्धतीने करा महामृत्युंजय मंत्राचा पाठ, महादेव करतील दुःख दूर..!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, आपल्यातील बरेच जण महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करत असतात आणि भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यास अकाली मृ’त्यू टाळण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार, अपघात किंवा अकाली मृ’त्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येतो किंवा हा रोग झालेला असल्यास त्याच्याशी सामना करण्याचे, रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते.

“ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌” भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. या मंत्राचा जप केल्यास अकाली मृ’त्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजारही बरा होतो. त्यासाठी भक्तिभावे या जपाचे मंत्रोच्चारण करावे लागते. वरील मंत्राचा अर्थ असा आहे, की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकराची उपासना करतो, ते या सृष्टीचे संरक्षण करतात. आमचे जीवन समृद्ध करतात, एवढेच नाही, तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात.

मित्रांनो वर सांगितलेला महामृत्युंजय मंत्र,रोज सकाळी अंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा. हा मंत्र सामूहिकरीत्या अर्थात कुटुंबासमवेत म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो. या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात. आपणास कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासले असल्यास या मंत्राचा नित्यनेमाने १०८ वेळा जप करावा.

मित्रांनो हा मंत्र म्हणजेच मृत्युवर विजय मिळवणारा असा हा महा मृत्युंजय मंत्र आहे. या मंत्राचे बरेच नाम आणि रूपे आहेत. यालाच भगवान शिवाच्या उग्र रुपाकडे संकेत करून रुद्र मंत्र म्हंटले आहे; भगवान शिवाचे तीन डोळ्यांकडे इशारा करून त्रयंबकम मंत्र आणि याला कधी कधी मृत-संजीवनी मंत्राच्या रूपात देखील जाणले जाते कारण की कठोर तपस्या पूर्ण केल्यानंतर राक्षसांचे गुरु शुक्राला हा मंत्र प्रदान केला होता. हाच तो संजीवनी मंत्र ज्यामध्ये मृताला पुनर्जीवन देण्याचे सामर्थ्य होते. आणि ते मंत्रसामर्थ्य बृहस्पती पुत्र कच याने हिरावून घेतले, हे आपल्याला माहित आहे.

त्याचबरोबर मित्रांनो हा मंत्र म्हणत असताना त्याचा जप करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते, मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार व त्याच बरोबर ग्रंथा मध्ये दिलेल्या माहितीनुसार या महमृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा, कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्र जाप केल्याने विशेष फायदा होतो. जप करताना केवळ रुद्राक्षच्या जप्याने जप करावा कारण असंख्य जपाचे फळ मिळत नाही. या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती, शंकराचे चित्र, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्यासोबत ठेवा.

त्याच बरोबर मित्रांनो या मंत्राचा जप करताना कंटाळा करू नका, आळस देऊ नका आणि मन एकाग्र ठेवा. मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नका, त्याच बरोबर विश्वासाने, भक्तीने आणि श्रद्धेने या जपाचे नित्यपठण करा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment