नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो दागदागिने हा स्त्रियांचा आवडता विषय आहे. इतकेच नव्हे तर आपल्याकडे शास्त्रांमध्ये सुद्धा दागिन्यांचं महत्त्व सांगण्यात आले आहे. नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना काही विशिष्ट दागिने घालण्यासाठी सांगतात.
जसं की मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या हे विवाहित स्त्रीच्या सौभाग्य अलंकार आहेत. पण असेही काही दागिने आहेत जे स्त्रियांनी घालू नये असे सांगितले आहे. ते कोणते दागिने आहेत ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो विवाह हे एक पवित्र बंधन आहे.
आणि लग्न झालेल्या मुलीला मंगळसूत्र जोडवी बांगड्या इत्यादी अलंकार दिले जातात. हे अलंकार महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची भूमिका बजावतात. असं पारंपरिक चिकित्सा पद्धतीमध्ये सांगण्यात येतं. हे तर चाललय सौभाग्य अलंकाराबद्दल.
हे सर्व महिलांनी घालावे असे सांगितले जाते. असेही काही दागिने आहेत जे महिला वर्गाने घालू नये असे सांगण्यात येतं. मित्रानो अनेक महिला सोन्याचे पैंजण वापरताना आपल्याला दिसून येतात. पण सोन्याचे पैंजण घालू नये असेही आपल्याला सांगण्यात येतं.
पैंजण हे चांदीचे असावे. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही कारणे सांगितली जातात. धार्मिक कारणानुसार नारायण म्हणजे श्रीहरी विष्णू यांना सोनं खूप प्रिय आहे. कारण सोनं हे माता लक्ष्मीचे रूप आहे. आणि माता लक्ष्मी ही त्याची पत्नी आहे.
असे म्हटले जाते की पायामध्ये किंवा कमरेच्या खालच्या बाजूस सोन परिधन करणे म्हणजे भगवान विष्णू सर्व दैवता आणि लक्ष्मी मातेचा अपमान आहे. हे झालं धार्मिक कारण. यामागच वैज्ञानिक कारण अस आहे की सोन्याचे दागिने शरीरात उष्णता निर्माण करतात.
तर चांदी शरीराला शीतलता प्रदान करते. अशावेळी कमरेच्या वर सोन्याचे दागिने आणि कमरेच्या खाली चांदीचे दागिने घालून शरीराचे तापमान संतुलित केले जाते. त्यापासून आपल्याला अनेक आजारातून मुक्त होता येते.
जर संपूर्ण शरीरावर सोन्याचे दागिने घातले तर शरीरात तीच उर्जा वाहते. तर शरीराला इजा होऊ शकते. मग आपल्याला अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. शरीरातील तापमान संतुलित राखण्यासाठी चांदीचे दागिने कमरेखाली घातले जातात.
आणि सोन्याचे दागिने उष्ण असतात त्यामुळे ते कमरेच्या वरच्या भागात घातली जातात. चांदी थंड आणि सोने उष्ण म्हणजेच शीतलता आणि उष्णता यांचा शरीरामध्ये संतुलन राहावं यासाठी असं सांगितले जाते. असं वैज्ञानिक कारण आहे.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!