महीलेनेच सांगितले एका स्रीचे समाधान कधी होते? नक्की जाणून घ्या…

मी एक बायको आहे आणि सांगते मला कशाने समाधान होईल. मला माझ्या मनाप्रमाणे जगण्यात समाधान होते. मला सारखे न टोकता माझ्यावर विश्वास ठेवल्याने समाधान होते. आपल्या कडे हे नाही चालत, तू हे नाही खाऊ शकत, हे कपडे नाही घालायचे, अमुक नाही करायचं, तमुक नाही करायचं असं सतत मागे लागून सांगितलं तर फार त्रास होतो.

मी एक बायको, एक आई, एक सून, एक नणंद , एक वहिनी सगळे आहे आणि मला ही नाती निभावयला खूप आवडतात. मला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला आवडतं. कोणाला दुख्वयाला नाही आवडत. पण मला हे सगळं माझ्या पद्धतीने करायला आवडतं. मी सगळं नेहमीच तुमच्या म्हणण्याने कसे करेन?

माझ्या मनाने जेव्हा मी खर्च करते , मी आधी घराच्या आणि इतरांच्या गर्जेकडे आपसूकच लक्ष देते. मी सगळ्यांच्या चवी लक्षात ठेऊन त्यांच्या साठी स्वयंपाक करते, भले मला स्वतःला रोज तेच जेवण नाही आवडत. मला समजत नाही तेव्हा सासूबाईंना , पतीला, आईला, किंवा इतराना विचारते पण सारखे तू असं कर, तसं कर, करून मला दिलेल्या सूचना नाही आवडतं मला.

सगळ्या बायका ( 98 टक्के तरी,) आपल्या घराला, घरातील लोकांना आणि त्यांच्या गरजांना आपल्या गरजांच्या आधी ठेवतात. तुम्ही दर महिन्यात बायकोला सगळं पगार दिलात तर ती जाऊन सगळे आपल्या दागिने, साड्यांवर उधळल का? काही करतील पण तश्या अगदी बोटावर मोजण्याइतक्या. बाकीच्या निगुतीने काटकसरीने घर चालवतील, पैसे वाच्वतील, बचत करतील. पण तेव्हा घराची खरी मालकीण असल्याची भावना तिला समाधान देईल. तिच्या वरचा तुमचा विश्वास समाधान देईल. सतत तुम्ही संशयाने बघाल तर समाधानी राहील का ती?

मला कमी न लेखता मी घरात दुय्यम नसून बरोबरीची आहे हे जाणवल्यवर मला समाधान होतं. माझ्या घरी 3 बायका काम करतात. एकीला पती नाही पण बाकी दोघींचे दारुडे आहेत, त्या दिवसभर मर मर करतात आणि घर चालू ठेवतात. पण तरी नवराच वरती. तिला काय कळतंय, बावळट आहे ती असे म्हणतात. त्यांना वाईट वाटतं. पण काय करणार ताई म्हणून उसासे सोडतात आणि कामाला लागतात.

बायकोला प्रेमाबरोबर आदर, विश्वास आणि सन्मानाने वागवले जाणे ह्यात तिला समाधान मिळते. आणि हो ते बायका, शेजारणी, कामवाल्या बायका ह्यांच्यवर घाणेरडे जोक्स करतात त्याने त्या फारच असमाधानी होतात बरं.

कृपा करून हे लक्षात ठेवा की बायकांना पण घर, संसार , नाती गोती खूप आवडतात. पण त्यांना आपल्याला दुय्यम दर्जा आहे, ती बाईची जात तिला काय कळतं? बाईची बुद्धी, बायकांना अक्कल नसते असे ताशेरे ऐकून वाईट वाटतं. तिला बरोबर कळतं की कधी नवऱ्याच्या मागे, कधी बरोबर आणि कधी नवऱ्याच्या पुढे राहायचे ते.

बायकोला तुम्ही जितका सन्मान आणि मनाप्रमाणे वागण्याची मुभा द्याल तितकी ती समाधानी होईल. सगळ्यांना स्वातंत्र्य तितकेच प्रिय असते आणि बायका स्वतंत्र झाल्या तर बिघडतील आणि वाईट कामं करतील ही भीती मनातून काढून टाकावी. सगळ्या पुरुषांना इतके स्वातंत्र्य आहे तर ते सगळे काही बिघडले आहेत का? साधारण ज्या गोष्टीने नवऱ्यांना समाधान मिळते त्याचं गोष्टीने बायकांना पण. ह्यात कोणाला दुखवण्याचा हेतू नाही हां!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद