मजबूत आणि काळेभोर केस मिळवा मिनिटांमध्ये : फक्त करा हे सोपे उपाय..!!

केसांची काळजी – घनदाट आणि मजबूत केसांसाठी, या 3 घरगुती उपायांपैकी कोणताही एक अवलंब करा, त्याचा परिणाम फक्त 1 महिन्यात दिसून येईल…!!!

सौंदर्य खुलवण्यात केसांचा मोठा वाटा असतो. काळेशार, लांबसडक आणि घनदाट केस मिळवण्यासाठी लोक कित्येक प्रकारचे उपाय करत असतात. केस मुलायम, घनदाट आणि लांबसडक होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू, तेल वापरतात. काही जण केमिकलयुक्त ट्रीटमेंटचीही मदत घेतात.

तर अनेकदा घरगुती उपायही करतात. पण नेहमीच्या धावपळीत केसांकडे शक्य तितके लक्ष दिले जात नाही. पण अशा काही सोप्या टिप्स ज्यासाठी तुम्हाला अधिक वेळ खर्च करावा लागणार नाही आणि त्यामुळे केसांचे आरोग्यही राखले जाईल.

केसांसाठी नैसर्गिक उपाय नेहमीच चांगले मानले जातात. तुम्हाला देखील सुंदर आणि लांबसडक केस हवे असतील तर आजीच्या बटव्यातील नैसर्गिक उपचार नक्की करून पाहा. नैसर्गिक उपचारांमुळे केसांना खोलवर पोषण तत्त्वांचा पुरवठा होईल. ऑफिसच्या कामामुळे तुम्हाला वेळ मिळत नसल्यास आठवड्यातून किमान एकदा तरी हे उपाय करून पाहावेत. पातळ केसांची समस्या महिला आणि पुरुष दोघांनाही त्रास देते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता.

केसांची काळजी – घनदाट आणि मजबूत केसांसाठी, या 3 घरगुती उपायांपैकी कोणताही एक अवलंब करा, त्याचा परिणाम फक्त 1 महिन्यात दिसून येईल.

केस घनदाट असण्याची प्रत्येक माणसाची इच्छा असते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष. तथापि, इच्छित केशरचना तयार करण्यासाठी, प्रत्येक मुलीला जाड आणि मजबूत केसांची आवश्यकता असते. जर तुमचे केस इतके पातळ आहेत की तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे केशरचना करू शकत नाहीत. तर येथे तीन सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत जे तुमचे केस जाड, घनदाट आणि नैसर्गिकरित्या मजबूत बनवतील. ते पण फक्त 1 महिन्याच्या आत…

काही दिवसातच कढीपत्त्यासह घनदाट आणि मजबूत केस मिळवा –

कढीपत्त्याचा वापर फक्त जेवणात स्वाद वाढविण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही होतो. कढीपत्त्याला गोडलिंबही म्हणतात. या पानांमध्ये अनेक औषधी गुण आहेत. कढीपत्ते केसांना काळे करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया…

कढीपत्त्याची काही पाने घेऊन आणि ती बारीक करून जाडसर पेस्ट बनवावी आता या पेस्टमध्ये 1 चमचे खोबरेल तेल टाकावे आणि तयार पेस्ट हेअर पॅक म्हणून लावावा.

कमीतकमी 30 मिनिटे ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवावे. म्हणजे तुम्हाला फक्त केस पाण्याने धुवायचे आहेत. शैम्पू किंवा कंडिशनर वापरू नका. तुम्हाला हवे असल्यास दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता. काळजी करू नका, हे पॅक लावल्या नंतर तुमचे केस चिकट होणार नाहीत.

कढीपत्ता अशा प्रकारे काम करतो:

गरजेपेक्षा जास्त केमिकलचा वापर आणि प्रदूषणामुळे केसांचं नुकसान होतं. कढीपत्त्यात असे सर्व पोषक तत्त्वे आहेत, जे केसांना निरोगी ठेवतात. या पानांना बारीक करून त्याचा लेप बनवावा. मग तो लेप केसांच्या मुळाशी लावावा. आपण कढीपत्ता खावू शकतो. कढीपत्ता तुमच्या केसांवर विशेष औषध म्हणून काम करतो.

कडीपत्ता खाणे आणि लावणे दोन्ही तुमच्या केसांना लाभ देतात. कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून, ते तुमच्या केसांना मुळापासून पोषण देते आणि त्यांना घनदाट आणि मजबूत बनवते. यामुळे केस काळे, लांब आणि घनदाट होतात. सोबतच केसांची मूळं मजबूत होतात. कढीपत्त्यात व्हिटॅमिन बी १, बी ३, बी ९ आणि सी असतात. याशिवाय आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस आढळतं. याचं दररोज सेवन केल्यानं आपले केस काळे, लांबसडक होतील. तसंच डँड्रफ म्हणजेच कोंड्याची समस्याही दूर होईल.

अंड्याच्या बलकाने आपल्या केसांची मालिश करा:

अंडी ही प्रोटिन, व्हिटामिन, अत्यावश्यक फॅटी ऍसिडस आणि अ‍ॅन्टी ऑक्सिडेंटसननी परिपूर्ण असतात. अंड्यामुळे केसांच्या सर्व समस्या दूर होऊन केस चमकदार व मऊसूत होतात. केसांचे गळणे, शुष्कता, फाटे फुटणे, कोंडा यापैकी समस्या कोणतीही असो, अंड्याचा हेअरपॅक हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे.

अंड्यातील अत्यावश्यक फॅटी ऍसिड मुळे केसांचे मुळापासून पोषण होते. झँथोफिल किंवा अँटिऑक्सिडेंट मुळे केस चमकदार होतात तसेच शुष्कता कमी होऊन ते मजबूत होतात. कोलेस्टोरॉलमुळे अंड्यातील महत्त्वपूर्ण घटक केसांमध्ये शोषले जाऊन केसांचा पोत सुधारतो. मग केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अंड्याचे हे काही घरगुती हेअरपॅक जरूर वापरून पहा.

अंड्यातील पिवळ बलक म्हणजे अंड्याचा पिवळा भाग घ्यावा आणि त्यात एक चमचा खोबरेल तेल मिसळून चांगले फेटून घ्यावे. आता या मिश्रणाने केसांच्या मुळांमध्ये मालिश करावी.

अंड्यांचा वास टाळण्यासाठी, नारळाच्या तेलाऐवजी, एक चमचा मोहरीचे तेल मिसळा आणि कोणत्याही सुगंधी तेलाचे काही थेंब मिसळा. यामुळे तुम्हाला अंड्याचा वास येणार नाही आणि तुम्ही सहजतेने हे मिश्रण लावून ठेवू शकाल.

कमीतकमी 10 मिनिटे मालिश करावी आणि पुढील 30 मिनिटांसाठी हे पॅक तसेच असू द्यावे. नंतर शॅम्पू आणि कंडिशनर वापरून केस स्वच्छ धुवून घ्यावेत. असे आठवड्यातून एकदा केल्यावरही तुमचे केस काही महिन्यांत घनदाट आणि मजबूत होतील. एवढेच नाही तर केस मऊ देखील व्हायला मदत होईल.

मेथीच्या दाण्याची पेस्ट केसांवर लावा –

मेथी दाण्यांमध्ये अँटी-फंगल आणि इतर अनेक प्रकारची खनिजे असतात. हे केसांना मॉइश्चरायझ करण्यासोबतच कोंडा काढून टाकण्यास मदत करते. खोबरेल तेलात मेथीचे दाणे घालून केसांची मालिश करा आणि दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुवा. असे केल्याने केस लांब, घनदाट आणि चमकदार होतात. तसंच मेथी दाणे केस गळण्याची समस्या देखील कमी करू शकते. मेथी दाण्यांची पेस्ट कशी बनवावी हे सविस्तर जाणून घ्या…

तुमच्या केसांची लांबी लक्षात घेऊन मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवावे. सकाळी या मेथी दाण्यांची मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट बनवावी. या पेस्टमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल मिसळावे. आता हेअर पॅकप्रमाणे केसांमध्ये लावून घ्यावे. कोरडे झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्यावेत.

तुम्ही दुसऱ्या दिवशी शॅम्पू करू शकता. मेथीचे दाणे केस दाट करतात आणि केस गळण्यापासून रोखतात. मेथी केसांतील कोंडा दूर करते. पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि फॉलिक
ऍसिड समृध्द असल्याने केस लवकरच घनदाट होतात.

Leave a Comment