मला आई व्हायचंय.!! दोन मिनिटे वेळ असेल तर नक्की वाचा डोळ्यातून पाणी येईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. सुषमा आता एम बी ए पास झाली होती आणि एम बी ए करत असताना सुषमा एम बी ए च्या कोर्समूळे महेशला भेटली महेशने नुकतेच आपला इंजीनियरिंग चा कोर्स पूर्ण केला होता, सुषमाने hr तर महेशने ओपरेशन मॅनेजमेंट साठी ऍडमिशन घेतले होते आणि हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असल्यामुळे हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि त्यापुढे प्रेम कसे झाले त्या दोघांनाही कळाले नाही. MBA पूर्ण झाल्यानंतर आपसूकच दोघांच्याही घरात त्यातल्या त्यात सुषमाच्या घरात तिच्या लग्नाचा विषय डोकं वर काढू पाहत होता. दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना आपापल्या घरी दिली आणि व्हायचा तेवढा विरोध दोघांच्याही घरून झाला.

“सुषमा दिसायला महेशला साजेशी नाही…थोडी उंची कमी आणि स्थूल आहे…आपल्या महेश ला कितीतरी चांगली मुलगी मिळेल!” असं नाकडोळे मोडत महेशची आई म्हणायची…तर “महेशचं आता कुठे शिक्षण झालंय, तो अजून financially सेटल नाही!” असं सुषमाच्या आई बाबांना वाटायचं…शेवटी दोघांच्याही घरच्यांना लग्नाला मान्यता द्यावीच लागली…आणि दोघांचं लग्न झालं…पण काहीशा नाखुशीतच!!

लग्नानंतरची दोन तीन वर्षे अगदी मजेत गेली…दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरे कोणी दिसायचे नाही…माहेरी जाऊन राहणं तर सुषमाला माहीतच नव्हतं!आपली मुलगी सासरी सुखात आहे हे पाहून सुषमाच्या आईबाबांची नाराजीही कमी झाली होती…आणि महेश मूळे त्याची आई सुषमाशी प्रेमाने वागत होती…पण आता घरात एका नवीनच वादाने जन्म घेतला होता…!

लग्नाला चार पाच वर्षे लोटली होती…पण ही दोघे सगळ्यांना अपेक्षीत असलेली ‘ती ‘ गुड न्युज काही देत नव्हते…याविषयी सुषमाच्या सासूबाई महेशला अधून मधून विचारणा करायच्या…आणि महेश वेळ मारून न्यायला काहीतरी उत्तरं देऊन तेव्हढ्यापुरतं शांत करायचा…काही दिवसांनी दोघांनी डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू केली..वेगवेगळ्या टेस्ट करून झाल्या…IVF च्या पाच दहा सायकल्स पण झाल्या….पण ‘ती’ गुड न्यूज काही केल्या येईना..।

प्रत्येक वेळी प्रेग्नन्सी टेस्ट किट आशेने आणली जायची…आणि त्यातली ती एक गुलाबी रेष ‘गुड न्यूज’ ऐवजी आणखी एकदा ‘बॅड न्यूज’ घेऊन यायची….आताआताशा दोघेही या बॅड न्यूजला कंटाळून गेले…कुठे लग्ना कार्यात जाणे मुश्किल झाले… जिथं जावं तिथं तोच प्रश्न,”मग पेढे कधी? किंवा “अजूनही काहीच नाही का?”

“आम्हाला आजी/ आजोबा/ काका/ काकू/ मावशी कधी बनवणार?” प्रश्न एकच… फक्त वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जायचा! जणू काही माणूस लग्न करतो ते फक्त मूल जन्माला घालायलाच! पण हे लोकांना काय सांगणार?
कुठे डोहाळे जेवण किंवा बारसं असेल तर सुषमाला जाणीवपूर्वक टाळलं जायचं…तिला ही अशी वागणूक असह्य व्हायची..!!

एक दिवस महेशची आई त्याला ठसक्यातच म्हणाली, “आमच्या मर्जीने एखाद्या दुसऱ्या मुलीशी लग्न केलं असतं; तर आतापर्यंत दोनदा आजी झाले असते मी!” “आई,, बस्स…बस्स झाला तो विषय…अगं आम्ही आई बाबा होऊ शकलो नाही…यात एकट्या सुषमाचा दोष आहे का? सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत…नसतं एकेकाच्या नशिबात आई बाप होणं…म्हणून काय आयुष्यभर कुढत बसणार आहेस का तू? बस्स…यापुढे ‘बाळ’ हा विषय या घरात बंद..!!”

या सगळ्या गोष्टींचा दोघांनाही खूप मनस्ताप व्हायचा…एक दिवस महेशने सुषमाला मूल दत्तक घेण्याविषयी तिचं मत विचारलं… पण या सगळ्या प्रकरणात दुखावलेली सुषमा म्हणाली, “महेश आपण मूल दत्तक घेतलं तरी काय होईल? सगळ्यांची तोंडं बंद होतील खरी…पण वां’झोटी असल्याचा हा डाग कपाळावर कायम राहील…त्याचं काय?” महेश सुषमासाठीच हा विचार करत होता पण ती खचून गेली होती..! आणि बाळ मग ते दत्तक असो की स्वतःचं… त्या विषयावर पूर्णविराम आला होता…आता दोघेही एकमेकांची मनं जपत एकमेकांसाठी जगू लागले….

दिवसामागून दिवस जात होते….आता दोघेही आयुष्यात खूप पुढे गेले आणि पाहता पाहता दहा वर्षे लोटली…आणि एके दिवशी ऑफिसमध्ये काम करताना सुषमाला चक्कर आली…डॉक्टरांनी “ती” टेस्ट करायला सांगितली होती… आणि सुषमाला रिझल्ट माहीत होता…! “तसं काही नाहीये डॉक्टर!” “तरी पण …माझ्या खात्री करता करून पाहू…” थोड्या वेळाने डॉक्टरांनी स्वतः तिच्याजवळ येत तिला सांगितलं, “तुम्ही आई होणार आहात.!”

अशाच प्रकारची विशेष कथा, बोध व माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment