Friday, December 8, 2023
Homeजरा हटकेमनगटावर बांधलेला मौली धागा बदलू शकतो तुमचं नशिब : जाणून घ्या इतर...

मनगटावर बांधलेला मौली धागा बदलू शकतो तुमचं नशिब : जाणून घ्या इतर खास फा’यदे..!!!

जाणून घ्या मनगटावर मौली बांधण्याचे आश्चर्यकारक असे फायदे..!! काय आहे त्यामागील धा-र्मि-क महत्त्व…!!!

मित्रांनो, आपल्या हिं-दु सनातन ध-र्मात लाल धागा, मौली, किंवा नाडा हाताच्या मनगटावर बांधण्याची परंपरा बर्‍याच वर्षांपासून चालत आलेली आहे. तसेच मनगटावर जो धागा बांधला जातो त्याला मौली किंवा रक्षासूत्र असे देखील म्हणतात.

हा धागा पूजा, धार्मिक विधी आणि विशेष तारखांना मंत्र जप करताना बांधला जातो. याशिवाय कोणतीही पूजा संपूर्ण मानली जात नाही. मनगटावर बांधलेल्या मौलीत तीन किंवा पाच रंगाचे धागे असतात. मौली बांधण्याचे अनेक धा-र्मि-क फायदे देखील आहेत. तसेच आरोग्यासाठीही हा धागा बांधणे खूप फायदेशीर असते.

पौराणिक मान्यतांनुसार, रा-क्ष-सी राजा बळीच्या अमरत्वासाठी वामनच्या रूपाने भगवान विष्णूने त्याच्या मनगटावर एक सुरक्षात्मक धागा बांधला होता. याशिवाय देवराज इंद्र वृत्रासुराशी लढायला जात असतांना इंद्राणीने देवराज इंद्रांच्या हातावर संरक्षक धागा बांधला होता.

अशी मान्यता आहे की, म्हणून मौली संरक्षक ढाल म्हणून बांधला जातो. जेव्हा जेव्हा हा धागा मनगटात बांधला जातो तेव्हा त्याचे मंत्र जपही केले जातात. ज्याचा व्यक्तीवर सकारात्मक परिणाम होतो.

मौलीमध्ये तीन ते पाच रंगांचे सूत वापरले जाते. असे मानले जाते की मौली हातात बांधल्याने भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि तिन्ही देवी-लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती यांचे आशीर्वाद त्या व्यक्तीवर असतात. श्रद्धेनुसार, तसेच मौली वाईट नजरेपासुन आणि त्रासातून संरक्षण करते.

मित्रांनो, ज्या ठिकाणी आपली पल्स चेक केली जाते त्या ठिकाणी मौली मनगटावर बांधली जाते. आणि त्या व्यक्तीच्या श-री-रातील आजाराची तपासणी केली जाते. या ठिकाणी मौलीला बांधून नाडीच्या दबाव नियंत्रित राहतो, यामुळे श-री-रावर देखिल नियंत्रण राहते.

मौलीचा दबाव कायम असल्यामूळे कफ, वात आणि पित्ताच्या समस्या उद्भवत नाहीत, जेणेकरून आपण कफ, वात आणि पित्ताशी सं-बं-धित आजारांपासून वाचू शकतो. र-क्त-दाब, हृ-द-य-वि-काराचा झटका, मधुमेह आणि अर्धांगवायूसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी मौली बांधून ठेवणे फायदेशीर आहे असे म्हणतात.

मौली चा अर्थ –

‘मौली’चा शाब्दिक अर्थ ‘सर्वात उच्चतम’ असा आहे. मौलीला मनगटात बांधल्यामुळे त्यास कलावा म्हणून देखील ओळखले जाते. त्याचे वैदिक नाव उप-मणिबंध आहे. मौलीचेही प्रकार आहेत. भगवान शंकरांच्या मस्तकावर चंद्र विराजमान आहे, म्हणूनच त्याला चंद्रमौली देखील म्हटले जाते.

मौली कोठे कोठे बांधला जातो?

मौली हाताच्या मनगटावर, गळ्यात आणि कंबराभोवती बांधला जातो. याशिवाय नवसासाठी देवी देवतांच्या मंदिरात बांधला जातो आणि जेव्हा नवस पूर्ण होतो तेव्हा काढला जातो. तसेच घरात आणलेल्या नव्या वस्तूलाही बांधला जातो आणि प्राण्यांनाही बांधला जातो.

मौली बांधताना करावा या मंत्राचा जप –

‘येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।।’

मौली करतो संरक्षण –

मौलीला मनगटावर बांधल्याने कलावा किंवा उप-मणिबंध म्हटले जाते. हातावर मुख्य तीन रेखा असतात ज्याला मणिबंध म्हणतात. नशिब आणि जीवनरेखा स्त्रोत देखील मणिबंध आहे. या तीन रेखांमध्ये शा-रीरिक, दैवी आणि भौतिक अशा त्रिवीध उर्जा देण्याचे आणि घेण्याचे सामर्थ्य असते.

शिव, विष्णू आणि ब्रह्मा अशी या मनिबंधाची नावे आहेत. तसेच शक्ती, लक्ष्मी आणि सरस्वतीसुद्धा येथे साक्षात वास करतात. जेव्हा आपण कलावाचा मंत्र म्हणुन त्यास मनगटात बांधतो, तेव्हा या तीन धाग्यांचा जप त्रिदेव आणि त्रिशक्तीला समर्पित होतो.

ज्यामुळे रक्षासूत्र बांधलेल्या प्रत्येक व्यक्तीचे सर्व बाबतीत संरक्षण होते. हे रक्षासूत्र दृढनिश्चयाने बांधले तर आपल्यावर भू त प्रे त जा दू टो णा वाईट गोष्टींचा परिणाम होत नाही. कलावा किंवा मौली बांधून व्यक्तीला स्वतःतून सकारात्मक ऊर्जा मिळत राहते. एवढेच नाही तर त्याचे मन शांत राहते आणि विचलित होत नाही. जेणेकरून तो एका योग्य दिशेने चालत राहतो.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स