नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, जर आपण प्राचीन भारताचा इतिहास पाहिला तर तुमच्या हे लक्षात येईल की स्त्रियांना आपल्या संस्कृतीत एक आदराचं स्थान देण्यात आलं आहे. त्याबद्दल तसे महत्त्व मनुस्मृतीमध्ये सुद्धा सांगितले गेले आहे.
धर्मशास्त्रांचा एक मुख्य प्रमाणभूत ग्रंथ, ज्याला आपण मनुसंहिता असेही म्हणतो. यजुर्वेदात म्हटले आहे, की मनूने जे जे सांगितले आहे, ते एखाद्या औषधासारखे हितकर आहे. स्मृतिकार बृहस्पतीने म्हटले आहे, की मनुस्मृतीमध्ये जे जे सांगितले आहे, ते ते वेदोक्त असेच आहे.
मित्रांनो हिंदू धर्मग्रंथांनुसार, या जगातला पहिला मनुष्य हा ‘मनु’ होता. हा माणूस विश्वाचे निर्माते ब्रह्माच्या मा न सि क संकल्पनेतून जन्माला आला. या मनुने मानवाच्या सामाजिक-धार्मिक कायदा संहितेची रचना केली, जी आजची ‘मनुस्मृती’ म्हणून ओळखली जाते.
आपल्या समाजाचा महिला एक आधार असल्याचे मनुने आपल्या मनुस्मृतींमध्ये सांगितले आहे. गृहिणीला घराचे पालनपोषण करण्याचे वरदानही दिलेले आहे, आणि अन्नधान्य देवता अन्नपूर्णा यांनी महिलांना हे वरदान दिले होते.
ज्या घरामध्ये स्त्रियांची पूजा केली जाते त्या घरात देवतांचे वास्तव्य असते असे म्हणतात आणि जिथे त्यांचा अनादर केला जातो, त्यांची सर्व कामे अयशस्वी होतात आणि संपत्तीची देवी सुद्धा कोपते.
असाही शास्त्रात उल्लेख आहे. कारण सद्गुण आचरण असलेली स्त्री नेहमी घराशी जोडलेली असते आणि सदस्यांमध्ये नेहमी सुसंवाद राखते. ज्याप्रमाणे जमिनीशिवाय झाडे-झुडपे असू शकत नाहीत, त्याचप्रमाणे स्त्रीशिवाय कोणतेही मूल जन्माला येऊ शकत नाही.
महिलांविषयी स्मृतींचे विचार खूप चांगले आहेत. त्याच्या दृष्टीने स्त्री ही साक्षात देवीचे रूपे आहे. मनुस्मृतीमध्ये स्त्रियांच्या सं बं धा त अनेक गोष्टींचे वर्णन करण्यात आले आहे. मनुच्या मते, ज्या घरात स्त्रीला कपडे, दागिने आणि गोड बोलण्याने सन्मानित केले जाते, त्या घरात देव नेहमी आनंदी असतो. पण ज्या घरात त्यांचा आदर नाही, त्या घरात त्या कुटुंबातील सर्व कृती व्यर्थ ठरतात.
प्रत्येक स्त्रीला शृंगार करणे खूप प्रिय असते, विविध आभूषण घालयला तिला खुप आवडतात. मनुस्मृतीनुसार, ज्या घरात पुरुष आपली पत्नी, आई किंवा बहिणीला चांगले कपडे भेट देतो, तेथे देव नेहमी प्रसन्न असतो. अशा घरात नेहमी सुख आणि शांती असते आणि सर्व कामात यश मिळते.
शास्त्रांमध्ये स्त्रीला घराची लक्ष्मी मानले गेले आहे, जर स्त्रिया ग लि च्छ किंवा घा णे र ड्या क प ड्यां मध्ये राहतात किंवा घरातील पुरुष वेळोवेळी त्यांच्या पत्नीला, आईला किंवा बहिणीला चांगले कपडे पुरवत नाहीत, तर अशा घरावर माता लक्ष्मी नाराज होते. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने घरातील महिलांना त्यांच्या क्षमतेनुसार कपडे पुरवत राहिले पाहिजे.
दागिने महिलांच्या सर्वात प्रिय वस्तूंपैकी एक आहे. ज्या घरात स्त्रिया सुखी असतात ते देवतांचे निवासस्थान आहे असे मानले जाते. प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातील स्त्रियांना भेट म्हणून सुंदर दागिने दिले पाहिजेत, जिथे घरातील स्त्रिया चांगले कपडे आणि दागिन्यांनी सजतात, तिथे कधीही गरीबी नसते.
स्त्रियांना धर्मग्रंथांमध्ये आदरणीय मानले गेले आहे. अनेक ग्रंथ आणि पुराणांमध्ये स्त्रियांचा आदर करा असे म्हटले आहे. मनुस्मृतीनुसार, ज्या घरात स्त्रियांबद्दल वाईट बोलले जाते किंवा त्यांचा अनादर केला जातो तेथे देव सुद्धा राहत नाही.
जो पुरुष स्त्रियांचा आदर करत नाही त्याला सतत काही त्रासदायक गोष्टींचा सामना करावा लागतो. म्हणूनच पुरुषाने नेहमीच स्त्रियांचा आदर केला पाहिजे आणि त्याच्या घरातील स्त्रियांना प्रत्येक वेळी प्रेम आणि आदराने वागवले पाहिजे.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!