माता लक्ष्मींमुळे साजरं‌ केलं जातं रक्षाबंधन : जाणून घ्या या मागील अख्यायिका..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, यावर्षी रक्षा बंधन हा भाऊबहिणीच्या पवित्र नात्याचा सण, रविवारी 22 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणात बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रेशीम धाग्याने बनवलेली राखी बांधतात. त्याच वेळी, भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतो.

राखी हा फक्त धागा नाही, तर बहिणीला विश्वास आहे की तिचा भाऊ आयुष्यभर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. राखी पौर्णिमेच्या दिवशी बहिण भावाला टीळा लावतात. यासोबतच अक्षदा लावण्याची प्रथा आहे.

कुंकवाचा टिळाआणि तांदळाला शास्त्रांमध्ये खूप महत्त्व आहे. तिलक हे विजय, पराक्रम, सन्मान, श्रेष्ठता आणि वर्चस्वाचे प्रतीक आहे. कपाळाच्या मध्यभागी तिलक लावले जाते. हे स्थान सहाव्या इंद्रियाचे आहे. याचे वैज्ञानिक कारण असे आहे की टिळा लावताना कपाळाच्या या जागेवर दाब दिला तर स्मरणशक्ती, निर्णय क्षमता, बुद्धिमत्ता, तर्क, धैर्य आणि शक्ती वाढते.

असे म्हटले जाते की, टिळा लावून त्यावर तांदळाचे दाणे म्हणजेच अक्षदा लावण्याने सकारात्मक उर्जा प्रसारित होते. शास्त्रानुसार, तांदूळ हे यज्ञात देवतांना आहुति देण्यासाठी शुद्ध आणि पवित्र अन्न मानले जाते. तांदूळ आपल्या सभोवतालच्या नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेत रूपांतर करतात. जाणुन घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे.

रक्षाबंधन शुभ वेळ – पौर्णिमेची प्रारंभ: 21 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 03:45 वाजता पौर्णिमा प्रारंभ होईल.

पौर्णिमा तिथी समाप्त 22 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी 05:58 वाजेला पौर्णिमा समाप्त होईल.

राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त : सकाळी 05:50 ते संध्याकाळी 06:03 पर्यंत केव्हाही तुम्ही राखी बांधू शकता.

रक्षाबंधनाशी संबंधित पौराणिक कथा- पण एका पौराणिक कथेनुसार, देवराज इंद्राला देवासुर संग्रामाला जाताना त्याची पत्नी शचीने त्याच्या मनगटावर रक्षासुत्र बांधले होते, ज्याने त्याला त्या युद्धात संरक्षण दिले आणि तो जिंकल्यानंतर सुखरुप परतला. अशाप्रकारे, पत्नी या प्रसंगी तिच्या पतीला रक्षा सूत्र बांधते.

मध्ययुगीन इतिहासाशी संबंधित एक कथा आहे की जेव्हा मेवाडच्या महाराणी कर्णावतीच्या राज्यावर गुजरातच्या सुलतान बहादूर शाहने हल्ला केला होता, तेव्हा राणीने मुघल बादशाह हुमायूनकडे राखी पाठवून त्याच्याकडे मदत मागितली होती.

जरी राणी कर्णावती हिने जौहर केले, परंतु हुमायूनने तिच्या राज्याचे रक्षण केले आणि ते तिच्या मुलाला दिले. या कथेच्या संदर्भात भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण म्हणून रक्षाबंधन साजरा केला जातो.

माता लक्ष्मीमुळे साजरा केला जातो रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीचा प्रेमळ सन. विष्णु पुराणातसांगितलेली हि कथा आहे.

बळी कडून वामन अवतार धारण करून भगवान विष्णूंनी जेव्हा पृथ्वीमागितली होती त्यावेळी बळी ने त्यांच्याकडून असा वर मागितला की भगवान तुमचे दर्शन मलाकायम व्हावे. ह्या विचित्र वरदानामुळे श्री विष्णु यांना पाताळात राहावे लागले.

माता लक्ष्मी यांना मात्र श्री विष्णु यांचा विरह सहन होत नव्हता. त्यांना परत आणण्यासाठी माता लक्ष्मी साधारण स्त्रीचा वेष धारण करून बळी कडे गेल्या. त्याला म्हणाल्या की मी खुप अभागी आहे आणि मला कोणीच बंधू नाही.

त्यांचे दुःख बळीला बघितले गेले नाही. बळीने माता लक्ष्मीला आपली बहीण मानले आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करेल असे वचन दिले. तेव्हा माता लक्ष्मीने बळीला रक्षासूत्र बांधले आणि त्याबद्दलची भेट म्हणुन आपल्या खऱ्या रूपात येऊन श्री विष्णु यांची सुटका करण्यास सांगितले. वचनबध्द बळीला श्री विष्णूची सुटका करावीच लागली.

तो दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा दिवस होता. त्यानुसार आपण ह्या दिवशी राखीपौर्णिमा साजरी करतो. प्रत्येक बहिण आपल्या भावाला ओवाळते आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी भावाला राखी बांधते व त्याबदल्यात भाऊ बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतो. प्रेमाने बहिणीला भेटवस्तू देतो.

रक्षाबंधनाचा भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांच्याशी देखील संबंध आहे. एकदा भगवान श्रीकृष्णाचे बोट कापले गेले, ते पाहून द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता तिच्या साडीचा पदर फाडला आणि देवाच्या बोटाला बांधले. या अशा प्रेमळ बहिणीचे श्री कृष्ण कायम रक्षण करत. द्रौपदीचे वस्त्रहरण होत असताना भगवान श्री कृष्ण यांनी तिचे लज्जारक्षण केले.

श्रावणी पौर्णिमेला, काही ठिकाणी, पुजारी, ब्राह्मण आणि गुरु देखील संरक्षण-सूत्र बांधतात. रक्षासूत्र बांधताना ते एक मंत्र पठण करतात.येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल.’

दानवांचा राजा बळी याला जसे माता लक्ष्मीने रक्षासूत्र बांधुन त्याला सन्मार्गावर चालण्यास प्रवृत्त्त केले तसे तुला हे रक्षासूत्र धर्मानुसार आचरण करण्यास प्रवृत्त्त करेल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment