माझ्या स्पर्ममुळे कुणीतरी आई होत असेल.. हा विचार मला सुखावून जातो..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… विकी डोनर या चित्रपटात स्पर्म डोनर सेंटरमध्ये अडल्ट फोटो दाखवण्यात आले होते. पण प्रत्यक्षातल्या सेंटरमध्ये मात्र एक वॉशरूम होती ज्यात भिंत, कमोड, नळ आणि वॉश बेसिन होतं.

मला खूप अस्वस्थ वाटत होतं. घरातल्या चार भींतीच्या आत ह स्त मै थुन करण्यापेक्षा एका वॉशरुममध्ये ते करणं अवघड होतं. वॉशरुममधील एका प्लास्टिकच्या कंटेनरवर माझं नाव लिहिलेलं होतं. ह स्त मै थून केल्यानंतर मी कंटेनर तिथेच ठेवला. त्याचा मोबदला म्हणून मला 400 रुपये देण्यात आले.

माझं वय 22 वर्षं आहे, मी इंजिनियरींगचा विद्यार्थी आहे. या वयात गर्लफ्रेंड हवी असणं आणि लैं गि क आकर्षण वाटणं… या सामान्य गोष्टी आहेत.

पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुणासोबतही शा रीरिक सं बंध ठेवायले हवेत. मी ज्या लहान शहरातून येतो तिथं लग्नापूर्वी शा रीरिक सं बंध ठेवणं नक्कीच सोपी गोष्ट नाही. अशीच स्थिती मुलींचीही असते, असं मला वाटतं.

‘ह स्तमै थुन एकच पर्याय’ – या स्थितीत ह स्त मै थुन हा मुलांसाठीचा एक पर्याय असतो. असं असलं तरी पहिल्या दिवशी स्पर्म सेंटरच्या वॉशरुममध्ये मला अस्वस्थ वाटत होतं.

स्पर्म डोनेशनविषयी मी वर्तमानपत्रात वाचलं होतं. त्यापूर्वी मी र क्तदानाबद्दल तर ऐकलं होतं पण स्पर्म डोनेशनबद्दल तेव्हा पहिल्यांदाच वाचत होतो.

स्पर्म डोनेशन ही संकल्पना वाचल्यानंतर मी ती बातमी पूर्ण वाचली – बातमी वाचल्यानंतर मला कळलं की, आपल्या देशात अनेक दांपत्य अशी आहेत ज्यांना स्पर्ममधील गुणवत्तेच्या कमतरतेमुळे मुलं होत नाहीत. त्यातूनच स्पर्म डोनेशन मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलं आहे.

दिल्लीत ज्या भागात मी राहतो तिथं शेजारीच स्पर्म डोनेशन सेंटर असल्याचं मला समजलं. तिथं एकदा जाऊन यावं, असा विचार माझ्या मनात आला.

मी गोरा आहे, उंचापुरा आहे आणि बास्केटबॉल खेळतो. स्पर्म कलेक्शन सेंटरमध्ये गेल्यानंतर मी स्पर्म डोनेट करण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा तिथं बसलेल्या डॉक्टरनं माझ्याकडे पाहात स्मितहास्य केलं. माझी पर्सनालिटी पाहून ती डॉक्टर खूश झाली होती आणि त्यामुळे मला अत्यानंद झाला होता.

पण इथं सर्वकाही फक्त माझ्या लूकपुरतंच मर्यादित नव्हतं. मला माझे स्पर्म विकायचे होते आणि त्यासाठी मला हे सिद्ध करायचं होतं की बाहेरून मी जितका सशक्त आहे तितकाच आतूनही ताकदवान आहे.

त्यानंतर डॉक्टरनं मला काही प्रक्रिया पूर्ण करायला सांगितलं.

माझं ब्लड सँम्पल घेण्यात आलं. त्यातून मग मला एचआयव्ही, डायबिटीज आणि इतर आजार आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली.

स्पर्म डोनर होण्यासाठी लोकांची रांग – या सर्व तपासण्यांनंतर मला तिसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता बोलावण्यात आलं. माझ्याकडून एक फॉर्म भरून घेण्यात आला. त्यात गोपनीयतेच्या अटी होत्या. त्यानंतर प्लास्टिकचं कंटेनर हातात देऊन मला वॉशरुमचा रस्ता दाखवण्यात आला.

आता याचा सराव व्हायला लागला होता. माझं नाव लिहिलेलं ते कंटेनर मी वॉशरुममध्ये ठेवत असे आणि पैसे घेऊन निघून जात असे.

माझ्या स्पर्ममुळे कुणीतरी आई होत आहे, हा विचार मला सुखावून जायचा.. स्पर्म डोनेट करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी असायला हवा, असं मला सांगितलं जायचं. म्हणजे आज स्पर्म दिले तर 72 तासांनंतर पुन्हा स्पर्म डोनेट करता यायचे. पण याहून जास्त काळ गेल्यास स्पर्म डेड होत असे.

या कामासाठी मला पुरेसे पैसे मिळत आहे का, हा विचार काही दिवसांनंतर माझ्या मनात आला. विकी डोनर या चित्रपटाला हीरो हे काम करून श्रीमंत होतो आणि मला एकदा स्पर्म डोनेट करण्याचे फक्त 400 रुपये मिळतात.

म्हणजे एका आठवड्याला दोनदा स्पर्म डोनेट केल्यानंतर 800 रुपये तर महिन्याला 3200 रुपये मिळतात. यामुळे फसवणूक झाल्यासारखं मला वाटत होतं. त्यामुळे मग मी स्पर्म सेंटरमध्ये गेलो आणि विकी डोनर चित्रपटाचा हवाला देत नाराजी व्यक्त केली.

पण जेव्हा मला स्पर्म डोनेट करण्यासाठी रांगेत असलेल्या खूप साऱ्या लोकांचे इमेल सेंटरमध्ये दाखवण्यात आले, तेव्हा मला माझ्याबद्दल असलेला गर्व गळून पडला. तिथून बाहेर पडल्यानंतर मी आयुष्मान खुराना नाही असं स्वत:ला समजावलं.

इतक्या कमी पैशांमुळेच आमच्यासारख्या लोकांना डोनर म्हटलं जातं ना की सेलर. पैसे कमी असले तरी यामुळे माझ्या जीवनावर एक सकारात्मक परिणाम झाला आहे. स्पर्म असेच वाया घालवायला नकोत, असा विचार आता माझ्या मनात येतो. दुसरं म्हणजे घरी दररोज ह स्त मै थून करायचो, ती सवय आता सुटली आहे.

ही लाजिरवाणी बाब नाही..
मी काही चुकीचं काम करत नाही हे मला माहिती असलं तरी मी याबद्दल सर्वांनाच सांगू शकत नाही. याचा अर्थ असा नाही की मला कुणाची भीती वाटते. पण मला नाही वाटत की, ही गोष्ट समजण्याइतपत समाज परिपक्व आहे.

माझ्या घरच्यांनाही मी याबद्दल काही सांगू शकत नाही. कारण आई-वडिलांना कळलं तर त्यांना धक्काच बसेल. असं असलं तरी मित्रांसाठी ही बाब निषिद्ध नाही आणि त्यांच्यासाठी हे सर्व काही सामान्य आहे. खरी अडचण कुटुंब आणि नातेवाईकांबाबत आहे.

तसंच ही गोष्ट गर्लफ्रेंडला सांगायलाही मला काही अडचण वाटणार नाही. सध्या मला गर्लफ्रेंड नाहीये. आधी होती. पण माझी जी कुणी गर्लफ्रेंड असेल ती शिक्षित असावी आणि तिनं या गोष्टीला योग्यप्रकारे समजून घ्यायला हवं, असं मला वाटतं.

बायका खूपच पझेसिव्ह असतात आणि माझ्या बायकोला नाही वाटणार की, तिच्या नवऱ्य़ानं दुसऱ्या एखाद्या महिलेला स्पर्म द्यावेत. माझ्या बायकोला मी ही गोष्ट सांगणार नाही.

तसंही स्पर्म विकत घेणारे अविवाहित मुलांच्या स्पर्मला प्राधान्य देतात आणि वयाच्या 25 वर्षांपर्यंत यासाठी लायक समजलं जातं.

मला माहिती आहे की, स्पर्म डोनर ही ओळख शेवटपर्यंत माझ्यासोबत राहणार नाही, कारण शेवटपर्यंत स्पर्मही राहणार नाहीत. मला हेही माहिती आहे की, माझी ही ओळख माझ्या आईसाठी शरमेची गोष्ट ठरू शकते, तसंच लग्नासाठी एखादी मुलगी मला नकार देऊ शकते.

पण माझी आई किंवा माझ्या होणाऱ्या बायकोला हे माहिती नसेल का की या वयातली मुलं ह स्त मै थून करतात.? स्पर्म डोनेशनला लाजिरवाणं मानलं जात असेल तर ह स्त मै थूनही लाजिरवाणं आहे. पण मला असं वाटतं की या दोन्ही गोष्टी लाजिरवाण्या नाहीत!

Leave a Comment