Thursday, June 8, 2023
Homeअध्यात्ममी माझ्या भक्तांना कधीही एकटं सोडून जात नाही.. हेमांगीताईंना आलेला स्वामी महाराजांचा...

मी माझ्या भक्तांना कधीही एकटं सोडून जात नाही.. हेमांगीताईंना आलेला स्वामी महाराजांचा सत्य अनुभव..

नमस्कार मित्रांनो.. आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे.!! श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लेखमालेमध्ये तुमचे स्वागत आहे. आज स्वामींचे लेख सातासमुद्रापार पोचले आहेत ते केवळ तुमच्यामुळे. स्वामींच्या लेखांना असेच प्रेम देत रहा, स्वामी तुमच्या श्रद्धेला नक्कीच न्याय देतील. लेखाला शेअर करायला विसरू नका. !श्री स्वामी समर्थ!! यापुढील लेख हा सेवेकर्‍याच्या शब्दांमधे.

मी हेमांगी, मोहिदा सेवा केंद्र मधील सेवेकरी. मित्रांनो मी सुरवातीला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ गुरुमाउली यांच्या चरणी त्रिवार वंदन व मुजरा करते. मला आलेला अनुभव मी आपल्याला कथन करत आहे.

एका रात्री आईची तब्येत फार खराब झाली होती. आईला तातडीने डॉक्टरांकडे घेऊन गेलो तेव्हा डॉक्टर बोलले की ऑपरेशन करावे लागेल. गुरुमाऊली कायम म्हणतात की शरीराला शस्त्र लावणे जितके होता होईल तितके टाळावे. मेडिसिन्स ने फरक पडून जाईल असे मी वडिलांना वारंवार सांगत होते.

पण आईचा त्रास जास्त वाढला त्यामुळे आईला ऑपरेशन करण्यासाठी धुळ्याला नेण्यात आले. माझ्या मनात अनामिक भीती होती. म्हणून आज सकाळी 11 वाजता स्वामी समर्थ महाराजांना स्मरण करून गुरुचरित्र लावले व विनंती केली की आईचे ऑपरेशन होऊ नका देऊ.

ऑपरेशन च्या ऐवजी तिला मेडिसिन्स ने फरक पडू द्या आणि तिला परत घरी घेऊन या. संध्याकाळचे 6:00 वाजले होते पण वडिलांना कॉल करायला हिंमत होत नव्हती. पण शेवटी भीती आणि चिंता यामध्ये चिंता जिंकली आणि म्हणून मी कॉल केला.

वडिलांना फोन करताच मी विचारलं की डॉक्टरांनी काय सांगितले? ऑपरेशन बद्दल काय बोलले ते ? वडील बोलले की जे ऑपरेशन करणारे जे डॉक्टर आहेत ते आता नाहीयेत आणि त्यामुळे किमान 5 दिवस सध्या आईला मेडिसिन्स दिल्या आहेत.

जेव्हा ते डॉक्टर येतील तेव्हा मग नंतर बघू काय होतं ते. वडिलांनी पुढे संगितले की आता आम्ही घरी येत आहोत. स्वामींना मी मनातून वारंवार विनंती करत होते व मग मला गुरुचरित्र वाचण्याची सद्बुद्धी आली आणि लगेच गुरुचरित्र वाचनास सुरुवात केली व तात्काळ स्वामीनी मला अनुभव दिला.

मला विश्वास आहे की 5 दिवसानंतर ही ऑपरेशन करण्याची वेळ अजिबात येणार नाही. गाय जसं वासराला कधी एकटे सोडत नाही तसं आपले गुरु त्यांच्या बाळांना कधीच एकटे सोडत नाही. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हेच आपले तारणहार आहेत व हेच गुरुचरित्र मधील नृसिंहसरस्वती आहेत याचा अनुभव आला..

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स