नकळत ही 5 पाप करणारे जीवनभर दरिद्रीच राहतात.. शिवमहापुराण…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आपल्या धर्मामध्ये एकूण 18 पुराणं आहेत. त्यामध्ये शिवपुराण हे एक असे पुराण आहे ज्यामध्ये मनुष्य जीवन सुखमय होण्यासाठी अनेक मंत्र सांगितले गेले आहेत. शिवपुराणात माता पार्वती व भगवान शिव यांच्या संवादाचे सार सांगितले गेले आहे. शिवपुराणामध्ये अशा 5 पापांचे वर्णन केले गेले आहे, व जो मनुष्य नकळत किंवा चुकून ही पापे करतो त्याला त्याचा दंड भोगावा लागतो. शिवपुराणानुसार मनुष्याने अशी पापे चुकूनही करू नयेत.

भगवान शिवाची तुमच्यावर कृपा होत नाही. कलियुगात धर्म फक्त 1/4 उरला आहे. म्हणून मनुष्य पाप करतो. पण तुम्ही देवावर विश्वास ठेवून जर धर्माच्या मार्गावर चालत राहिलात, तर निराकार ईश्वराला तुम्ही लवकर प्रसन्न करू शकता. त्यासाठी तुम्हाला पापरहित मनुष्य बनावे लागेल.

जर तुम्ही यावर लक्ष दिले तर चुकूनही तुमच्या हातून पाप घडणार नाही व ईश्वराची सहज तुमच्यावर कृपा होऊ शकते. पण तरी तुम्हाला त्याचे उचित फळ प्राप्त होत नाही कारण नकळत तुमच्या हातून काही पापे होतात, जे तुमच्या पुण्यकर्माचे संतुलन बिघडवतात.

म्हणून तुम्हाला या पापांबद्दल माहिती असणे जरूरी आहे. आज आम्ही तुम्हाला त्या 5 पापांबद्दल सांगणार आहोत जी भगवान शिवानी पार्वतीला सांगितली होती. भगवान शिवांच्या अनुसार कलियुगातील माणूस चुकून अशी पापे करतात. पण ज्या व्यक्ति अशी पापे करत नाहीत, ते जीवनात सुखी राहातात. अशी व्यक्ति निरोगी राहाते. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती पाप..

सगळ्यात प्रथम मानसिक पाप – शिव पुराणानुसार, कलियुगी मनुष्य रोज मानसिक पाप करतो. मानसिक पाप ते असते जे माणसाच्या जीवनात वाईट विचार निर्माण करते. जे कोणत्याही स्त्रीबद्दल असो, किंवा दुसर्‍या व्यक्तीची उन्नती बघून होते, किंवा कोणाचे सौंदर्य बघून झाले असुदे, मनात त्याच्या प्रती वाईट विचार आणणे हे पाप आहे. तसेच, ईश्वराला प्रार्थना करणे, कोणाचे तरी वाईट होण्यासाठी तर ते पाप आहे. कोणत्याही मनुष्याच्या मनात देवाचा निवास असतो. तुम्ही जर मनात वाईट विचार आणले, तर तो त्या देवाचा अपमान मानला जातो.

दुसरे पाप आहे वाचेच्याद्वारे झालेले पाप – शिव पुराणानुसार तोंडाने कोणाला वाईट बोलणे किंवा कोणाला दू:ख देण्यासाठी वाईट भाषा वापरणे हे खूप मोठे पाप आहे. त्याला “वांछित पाप” असे म्हणतात. मनुष्याने नेहमी सत्य व मधाळ, गोड बोलले पाहिजे. जे लोक आपल्या तोंडाने खोटे बोलतात किंवा कटू शब्दात कोणाचा अपमान करतात, त्याला पाप मानले जाते. असे लोक जीवनात गरीब राहातात.

तिसरे आहे शारीरिक पाप – शिवपुराणात प्रकृतीला ईश्वर मानले गेले आहे. अत: प्रकृतीचे नुकसान करणे हे पाप मानले जाते. झाडे, रोपे कापणे, पशुची ह’त्या करणे हे शा’रीरिक पाप आहे. त्याशिवाय पायाखाली छोटे छोटे जीवजंतूंची ह’त्या करणे, हे पाप मानले गेले आहे.

चौथे पाप आहे निंदा करणे- शिवपुराणानुसार कलियुगातील सगळ्यात मोठे पाप आहे निंदा करणे. मनुष्याने कधीही कोणाचीही निंदा करू नये. आपल्या पेक्षा मोठे व्यक्ती किंवा वडीलधार्‍यांची निंदा करणे मोठे पाप आहे.

पाचवे पाप चुकीच्या व्यक्तींच्या संपर्कात राहाणे – भगवान शिवांच्या नुसार चोरी करणे, हत्या करणे पाप आहे. त्याचबरोबर अशा लोकांच्या संपर्कात येणे, त्यांना मदत करणे हे मोठे पाप आहे. ही पापे नकळत होतात. तर ही होती 5 पाप ज्यापासून मनुष्याने स्वत:ला वाचविले पाहिजे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment