मिठाई घेऊन तयार रहा..!! येणारे 45 दिवस या राशींसाठी असतील शुभ.. मंगळाची होणार कृपादृष्टी..!!!

ज्योतिषशास्त्रात मंगळाला ऊर्जा, भूमि, सामर्थ्य, धैर्य, पराक्रम, शौर्य, गतिशीलता आणि असिम चैतन्याचा ग्रह मानले जाते. तसेच मंगळाला धरतीपुत्र म्हटले जाते, प्राचीन ज्योतिष्यामध्ये याला भुमिपुत्र आणि युद्धाचे देवता देखील मानले जात होते.

मंगळ ग्रहाला मेष आणि वृश्चिक राशीचे स्वामी मानले जाते. तो मकर राशीत उच्च स्थानात असतो, आणि कर्क राशीत दुर्बल स्थानात असतो. दुसरीकडे, नक्षत्रांमध्ये मंगळ मृगशीरा, चित्रा आणि धनिष्ठा नक्षत्रांचा स्वामी आहे.

गरुड पुराणानुसार, मानवी शरीरात डोळ्यांच्या ठिकाणी मंगळाचे स्थान आहे. जर एखाद्याचा मंगळ चांगला असेल तर तो स्वभावाने निर्भय आणि धैर्यवान असतो.

मंगळाच्या शुभ परिणामांमुळे एखाद्याचे भविष्य बदलते. यावेळी मंगळ सिंह राशीमध्ये विराजमान आहे. मंगळ 6 सप्टेंबरपर्यंत सिंह राशीमध्ये राहील. काही राशींसाठी 6 सप्टेंबरपर्यंतचा काळ खूप शुभ ठरणार आहे.

या राशींना 45 दिवस मंगळाचा विशेष आशीर्वाद लाभणार आहे. 6 सप्टेंबरपर्यंत कोणत्या राशी चक्रांवर मंगळाची विशेष कृपा असेल ते जाणुन घेऊया…

वृषभ –

गुंतवणूकीसाठी वहा काळ चांगला आहे. तुम्हाला व्यवहारामधून नफा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरी व व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आर्थिक फायदा होईल. आपल्या जोडीदाराबरोबर स्पेशल वेळ घालवावा.

कर्क –

नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आदर मिळेल. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना शुभ परिणाम मिळेल. व्यवसायातही नफा मिळेल.

कामात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची गरज नाही. आपल्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल.

तुळ –

तुम्हाला कामात यश मिळेल. गुंतवणूकीसाठी वेळ चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवाल. विवाहासाठी शुभ योग आहेत. शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ शुभ म्हणता येईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.

धनु –

आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात रस असेल. शिक्षणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही वेळ वरदानापेक्षा कमी नाही. नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन सुखी होईल. प्रियकराबरोबर वेळ घालवाल.

कुंभ –

हा काळ व्यवसायासाठी वरदानापेक्षा कमी नाही. व्यवसायात नफा होईल. कुटुंबातील सदस्यांचेही संपूर्ण सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. आपल्या जोडीदाराबरोबर वेळ घालवावा. कामात यशस्वी व्हाल. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment