मित्रांमध्ये दुश्मनी होण्यासाठी कारणीभूत ठरतात हे वास्तूदोष.. वास्तू नियमानुसार या 5 गोष्टी चुकूनही करु नये..!!!

ही 5 कामे मित्रांमध्ये वै र निर्माण करतात, वास्तूनुसार या पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवा..!!!

नमस्कार मित्रांनो, वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय सामंजस्य आणि समृद्ध जीवन जगणारे विज्ञान आहे जे आपल्या सभोवतालच्या नकारात्मक गोष्टींना दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवते. वास्तुमध्ये पंचतत्वांचा समावेश असतो आणि चांगल्या वास्तुसाठी तसेच सुरक्षीततेसाठी यात संतुलन ठेवणं गरजेचे असते

वास्तू आपल्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करते. त्याचबरोबर वास्तु हा मानवी जीवनाचा एक भाग मानला जातो. जीवनात, आपल्या घरातील आणि कुटुंबातील लोकांव्यतिरिक्त, जर आपल्याला प्रिय असलेली दुसरी व्यक्ती असेल तर ती आपले मित्र असतात.

कारण मित्रांमध्ये कोणत्याही प्रकारचा पडदा नसतो. सर्व प्रकारच्या गोष्टी मित्रांमध्ये मुक्तपणे सांगता येतात. दोघांनाही एकमेकांची सर्व रहस्ये माहित असतात आणि दुसरीकडे आपण अडचणीच्या वेळीही मित्रावर विश्वास ठेवू शकतो.

पण कधीकधी आयुष्यात एक क्षण असा येतो की अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरही, मित्र आणि आपल्या मध्ये दुरावा निर्माण होतो जे एकमेकांशिवाय जगूच शकत नाहीत ते एकमेकांचे श त्रू बनतात.

आणि तिथे मैत्रीचे पवित्र नाते तुटते, ज्यामुळे कधीकधी वास्तु हे देखील कारण असू शकते. चला तर मग जाणून घेऊया वास्तूच्या अशाच काही गोष्टींविषयी ज्यामुळे मैत्रीचे घट्ट नातेही तुटते.

1) वास्तुनुसार, मित्रांमध्ये काळ्या रंगाच्या वस्तूंचा कधीही व्यवहार होऊ नये. रंग हे ऊर्जेचे प्रसारक असतात. वास्तुशास्त्रानुसार रंग तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही प्रभाव पाडतात. ज्योतिषशास्त्रात काळा रंग राहूचा रंग मानला जातो.

जो मित्रांसाठी योग्य मानला जात नाही. म्हणूनच मित्रांमध्ये काळ्या रंगाच्या वस्तू देण्यापासून आणि घेण्यापासून टाळले पाहिजे, अन्यथा तुमच्या मैत्रीवर राहूचा परिणाम होऊ शकतो.

2) वास्तुनुसार, मैत्रीचे नाते अतूट ठेवण्यासाठी, भेटवस्तू म्हणून आपल्या मित्रांना रुमाल आणि परफ्यूम कधीही देऊ नका. यामुळे मित्रांमध्ये विश्वासाचा अभाव निर्माण होतो. परंतु मैत्रीचे दुसरे नाव तर विश्वास आहे.

3) वास्तु नुसार, घाणेरडे कपडे, आणि कचरा घराच्या मुख्य दरवाजाच्या मागे किंवा समोर कधीही ठेवू नका. मित्र-मैत्रिणीं सह प्रत्येकासाठी ये-जा करण्याचा हाच मार्ग असतो. यामुळे देखील, तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होते.

वास्तुशास्त्राच्या मते कपड्यांचा संबंध आपल्या भाग्याशी असतो. चांगले कपडे हे सौभाग्याचे प्रतिक असतात. आणि जुने घाणेरडे कपडे दु र्दै वा चे प्रतिक असतात. असे जुने न धुतलेले, मळकट कपडे घरात ठेवू नये. जर असे जुने जी र्ण कपडे घरात असतील तर त्यांना ताबडतोब बाहेर काढावे.

4) वास्तुनुसार, आपल्या घराच्या छतावर रद्दी आणि गॅ स इत्यादी गोष्टी ठेवणे टाळा. वास्तुशास्त्रानुसार जुने वृत्तपत्र कधीही घराच्या आत ठेवू नये. वास्तू सांगते की घरात पडलेला कचऱ्याचा ढीग नेहमी घरात नकारात्मक ऊर्जा आणतो.

यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो. घरातील लोकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा स्थितीत जुन्या वर्तमानपत्रांचा ढीग कधीही घराच्या आत ठेवू नये. यामुळे कुटुंबातील सदस्य आणि मित्रांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.

5) वास्तुनुसार, मित्र आणि परस्पर लोकांमध्ये शनिवारी कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करणे टाळा. या दिवशी शनिदेव प्रबळ होतात आणि या व्यवहारामुळे तुमचे सं बं ध बिघडतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment