मोठा गुरुवार गुपचूप गाडा ईथे 1 रुपयाचा शिक्का, विवाहबाधा दूर होईल… माता लक्ष्मीची कृपा होईल..!!!


आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मित्रांनो श्रीमंत लोकांच्या कुंडलीतील गुरू ग्रह अत्यंत मजबूत असतो आणि त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर धन, पैसा, ऐश्वर्य निर्माण होत. आणि त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहते. आता अनेकांना प्रश्न पडेल की हा गुरू ग्रह मजबूत होण्यासाठी नक्की काय करावं? मित्रांनो गुरु ग्रह म्हणजेच बृहस्पति देव यांना प्रसन्न करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी काही छोटे-छोटे उपाय आपण गुरूवारच्या दिवशी करू शकतो.

ज्यामुळे बृहस्पति देवाची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्या घरात सुद्धा सुख समृद्धी धन ऐश्वर्य निर्माण होईल. मित्रांना आपण फक्त पैशासंबंधीच बोलणार नाही आहोत तर ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, जीवनात अनेक संकटे येत आहेत किंवा एखादं कार्य करायला गेल्यास की ते कार्य सहजासहजी होत नसेल, त्यात अनेक अडचणी येत असतील तर अशा लोकांसाठी सुद्धा काही छोटे छोटे परंतु अत्यंत प्रभावी असे गुरूवारच्या दिवशी करायचे काही उपाय आज आपण पाहणार आहोत.

नोकरीमध्ये प्रमोशन हव आहे किंवा व्यवसाय धंदा आहे त्यामध्ये वृद्धी व्हावी असे वाटत असेल तर अशा लोकांनी केळीच्या झाडाची पूजा करायची आहे. केळीच्या झाडाला हळद युक्त जनरल पण करायचं आहे. आता हे कसं करावं, तर गुरूवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे आणि त्यानंतर केळीच्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायच आहे. त्याची मनोभावे पूजा करावी, हळद-कुंकू अक्षता या झाडाला अर्पण करावे त्यानंतर आपण या ठिकाणी गाईच्या तुपाचा एक दिवा सुद्धा नक्की प्रज्वलित करायचा आहे.

मित्रांनो ही पूजा झाल्यानंतर भिजवलेली थोडीशी चण्याची डाळ आणि थोडासा गूळ हे नैवेद्य म्हणून अर्पण करायच आहे आणि या ठिकाणी हळद मिश्रित पाणी पाणी केळीच्या झाडाला अर्पण करायच आहे. मित्रांनो ही सर्व पूजा झाल्यानंतर आपण हात जोडायचे आहेत आणि या केळीच्या झाडाला आपण आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत जे काही संकट आहेत ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. ही पूजा करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे. हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे आणि या मंत्राचा तुम्ही जप सुद्धा करू शकता. जेवढे शक्य तेवढ्या जास्त वेळा म्हणजे अकरा वेळा, एकवीस वेळा, तुम्ही हे करू शकता.

त्यांनतर तुम्हाला केळीच्या झाडाला 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत पण जर ते शक्य नसेल तर आपण स्वतः भोवती सुद्धा प्रदक्षिणा घालू शकता. त्यानंतर ज्यांना प्रत्येक कार्यात अडचणी येतात निर्विघ्नपणे कार्य पार पडत नसेल तर अशा लोकांनी गुरूवारच्या दिवशी केळीच्या झाडाच्या बुंध्याशी आपण साखर मिश्रित जल अर्पण करायच आहे.

उपाय करताना प्रथम केळीच्या झाडाची आधी सांगितल्याप्रमाणे विधिवत पूजा करायची आहे आणि मगच पुढील उपाय करायचा आहे. आता ज्या लोकांचे विवाह होण्यामध्ये अडचणी येत आहेत विवाह जुळत नसतील किंवा आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी निर्माण व्हावी यासाठी गुरूवारच्या दिवशी केळीच्या झाडाच्या बुंध्याशी दोन हळकुंड आपल्याला अर्पण करायचे आहे. मित्रांनो हे हळकुंड चांगले असावेत, किडलेले किंवा खराब झालेले हळकुंड या ठिकाणी वापरू नका. तर असे दोन हळकुंड या केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहेत.

आता काही लोक फक्त जाऊन दोन हळकुंड अर्पण करून येतील तर असं करू नका. मागे सांगितल्याप्रमाणे या केळीच्या झाडाची प्रथम आपल्याला पूजा करायचे आहे त्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा गायीच्या तुपाचा असावा आणि त्यानंतर या दोन हळकुंड आपल्याला अर्पण करायचे आहेत. या केळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा आणि मनोकामना आहे ती मनोभावे या झाडाजवळ बोलून दाखवायचे आहे. यामुळे विवाह होण्याचे अनेक योग निर्माण होतात तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते.

आता पाहूया आजचा धनप्राप्ती चा प्रभावी चमत्कारी असा उपाय. मित्रांनो ज्यांच्या घरामध्ये खूप गरीब आहे, घरामध्ये पैसा येत नाही, पैसा टिकत नाही किंवा पैसा हा आजार पणामध्ये किंवा विनाकारण खर्च होऊ लागतो, तर मित्रांनो अशा लोकांनी आपल्या घरामध्ये भरपूर पैसा यावा, धन यावे यासाठी या गुरूवारच्या दिवशी केळीच्या झाडाच्या बुंध्याशी एक रुपयाचा शिक्का घेऊन जायचं आहे. एक रुपयाचा शिक्का स्वच्छ धुऊन पुसून तो केळीच्या झाडा जवळ घेऊन जायचा आहे. प्रथम केळीच्या झाडाची विधिवत पूजा करून त्या ठिकाणी गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे. आणि मग एक रुपयाचा शिक्का या केळीच्या झाडाच्या बुंध्याशी जी माती आहे त्या मातीमध्ये पुरायचा आहे.

मित्रांनो हे असे करताना मात्र आपण माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. हा एक रुपयाचा शिक्का आपल्याला तिथेच ठेवायचा आहे, पुन्हा घरी घेउन यायचा नाही. अत्यंत प्रभावी असा हा उपाय करून पहा. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की होईल.

टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!