मोठ्यांना नमस्कार करण्याचं महत्त्वं माहिती आहे का…???

आपल्या पेक्षा वयाने आणि कर्तुत्वाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडायची पध्दत आपल्या भारतीय संस्कृतीत आहे…

नमस्काराचे महत्व …

महाभारताचे यु’द्ध सुरु होते. दररोज कौरवसेनेचे मोठमोठे योद्धे मा’रले जात होते. पितामह भिष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हा’नी होत होती..

दुर्योधन जो आपल्या ता’पट स्वभावामुळे कु’प्रसिध्द असतोच.. एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो. त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की..

“मी उद्या सर्व पांडवांचा व’ध करेन..”

त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोहोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमते बाबत सर्वांनाच कल्पना होती… भीष्म प्रतिज्ञा म्हणजे.. काळ्या काताळावरिल रेघच..
तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले. पांडवांची अ’स्वस्थता त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले..

“माझ्या सोबत चल…
द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले. ती वेळ रात्रीची होती. स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की,आत जाऊन पितामहांना प्रणाम कर..
सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आत‌ जाऊन पितामहांना प्रणाम करताच, पितामह द्रौपदी ला “अखंड सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद देतात..

त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की.., “वत्स, एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस..??”

“माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत” असे द्रौपदीने सांगताच पितामह स्वतः श्रीकृष्णाला भेटायला बाहेर येतात आणि ते दोघंही एकमेकांना प्रणाम करतात..

भीष्म पितामह श्री कृष्णा ला म्हणतात.. माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मा’त देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करु शकतात..”

शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणतात की, “बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले,
हे तुझ्या लक्षात आले का..??

जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असतास आणि दुर्योधन, दु:शासन ह्यांच्या प’त्नींनी जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर हि यु’द्धाची वेळच आली नसती..

अशी असते नमस्कार..
आणि आशीर्वादाची श’क्ती..!!

तात्पर्य..

वर्तमानकाळात आपल्या घरी ज्या स’मस्या आहेत, त्यांचे मूळ कारण हेच आहे की, कळत नकळत आपल्या हातून व’डिलधाऱ्या मंडळीची उ’पेक्षा केली जाते..


जर प्रत्येक घरात वडिलधाऱ्या मंडळीना दररोज नमस्कार करुन त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील, तर त्या घराघरात वि’तंडवाद सहज टा’ळता येऊ शकतात..
असे घर स्वर्ग बनू शकते..

मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की, ज्याला कुठलेही श’स्त्र भे’दू शकत नाही..

कारण..

नमस्कारात प्रेम आहे..
नमस्कारात विनय आहे..
नमस्कारात अनुशासन आहे..
नमस्कार आदर शिकवतो..
नमस्कारामुळे मनात सुविचार येतात..
नमस्कारामुळे क्रो’ध न’ष्ट होतो..
नमस्कारामुळे अ’हंकार न’ष्ट होतो..
नमस्कारात शीतलता आहे..
नमस्कार अ’श्रू पुसण्याचे काम करतो..
नमस्कार आपली संस्कृती आहे..
ह्या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे..

? आपणास माझा साष्टांग नमस्कार !! ?

टीप – वर दिलेली माहिती ही धा’र्मिक मा’न्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कुणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment