मुठभर मीठ टॉयलेटमध्ये जावून ठेवा, सर्वच दु :ख होतील दूर, घरातील अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी एकदा कराच हा उपाय..!!

मित्रांनो, मीठ केवळ आपल्या रोजच्या जेवणाला चवदार बनवत नाही तर आपल्या घरामधील अनेक नकारात्मक उर्जा आणि वास्तूदोष दूर करण्यासाठी देखील हे खूप प्रभावी आहे. विविध ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, मीठामध्ये एक आश्चर्यकारक शक्ती असते.

मीठ हे शुक्र व चंद्राचे प्रतिनिधीत्व करणारा घटक मानले जाते. मीठ आपल्या घरातील राहू आणि केतुचा अशुभ प्रभाव सहजपणे दूर करू शकते. तसेच, मीठामुळे आपल्या घरातील सकारात्मक उर्जेचा संचार वाढून आपणास आनंद समृद्धी मिळवून देऊ शकते.

तर मित्रांनो, आज येथे आपण जाणून घेणार आहोत मीठाचे असे काही उपाय जे आपल्याला घरात आनंद तथा सुबत्ता मिळवून देतील.

घरात वास्तु दोष असल्यास एका काचेच्या भांड्यात मीठ भरून टॉयलेट आणि वॉशरूममध्ये ठेवा. मीठ आणि काच दोन्ही राहूच्या कारक वस्तू मानल्या जातात. असे केल्याने राहू-केतुचे अशुभ प्रभाव संपतील तसेच घरातील वास्तूदोषही संपतील.

जर मीठाचे तुकडे लाल रंगाच्या कपड्यात बनवून घराच्या मुख्य गेटवर टांगलेत तर नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाही. दुसरीकडे, जर ती कार्यालयाच्या दाराशी टांगलेले असेल तर प्रगतीचे अनेक नव नवीन मार्ग उघडतात आणि तिजोरीत ठेवाल तर कधीच पैशाची कमतरता भासत नसते.

आठवड्यातून एकदा तरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मीठाच्या पाण्याने आंघोळ करावी, असे केल्याने वाईट नजरे पासून आपण सुरक्षित राहतो, तसेच घरातील सदस्यांचे आरोग्यही चांगले असते.

गुरुवारी वगळता आठवड्याच्या प्रत्येक दिवशी पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने घरातील लादी किंवा फ्लोरींग पुसून टाका. यामुळे सूक्ष्म जंतूंचा नाश होईल, आणि घरातील नकारात्मक उर्जाही दूर होईल. याच बरोबर घरावर असलेले राहु आणि केतुचे अशुभ परिणामही दूर होतील.

जर घरातील एखाद्या सदस्याला वाईट नजर लागली असेल तर मग एक चिमूटभर मीठ घेऊन ते तीनदा त्या सदस्याच्या डोक्यावरुन उतरवून घ्या. मग एकतर ते बाहेर फेकून द्या किंवा पाण्यात वाहून द्या. असे केल्याने नजर उतरवून घेतली जाईल.

जर राहू-केतूची स्थिती किंवा दशा चालू असेल तर अशा वेळेस बर्‍याचदा मनात वाईट विचार येतात, यासाठी एका काचेच्या भांड्यात मीठ घेऊन आणि ते एका कोपऱ्यात ठेवा. याचा सकारात्मक परिणाम होईल.

रात्री झोपण्यापूर्वी मीठाच्या पाण्याने पाय स्वच्छ केल्याने तणाव दूर होतो आणि मन सुद्धा शांत राहते.

टीप:- वर दिलेली माहिती आणि उपाय हे सा-मा-जिक आणि धा-र्मि -क मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच ही माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेयर करा.

Leave a Comment