Tuesday, October 3, 2023
Homeजरा हटकेनानावटी खटला नौदल अधिकाऱ्यांनी खून केलेला, परंतु जेव्हा ते कोर्टात यायचे तेव्हा...

नानावटी खटला नौदल अधिकाऱ्यांनी खून केलेला, परंतु जेव्हा ते कोर्टात यायचे तेव्हा मुली अक्षरशः फुलं उधळायच्या..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… दिवस होता 27 एप्रिल 1959 चा. कडाक्याचा उन्हाळा होता. या दमट उन्हाळ्यापासून थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मुंबईचे पोलीस उपायुक्त जॉन लोबो निलगिरी पर्वतरांगांमध्ये जाण्याच्या विचारात होते. या विचारात संध्याकाळचे पाच वाजून गेले. तेवढ्यात पोलीस स्टेशनमधला फोन खणाणला. नौदल कमांडर सॅम्युअल पलीकडच्या लाइनवर होते. ते म्हणाले, “कमांडर नानावटी तुम्हाला भेटायला येत आहेत. ते आता माझ्यासोबत आहेत.”लोबो यांनी विचारलं, “नेमकं काय झालंय?’ सॅम्युअल उत्तरले, ‘त्यांचा एका व्यक्तीशी वाद झालाय आणि त्यांनी त्या व्यक्तीला गोळ्या घातल्यात.” काही वेळाने लोबो यांना त्यांच्या खोलीबाहेर आवाज आला,”लोबो साहेबांची खोली कुठे आहे?”

पांढर्‍या रंगातला नेव्हीचा गणवेश घातलेला एक उंचपुरा माणूस लोबो साहेबांच्या खोलीत शिरला. त्या व्यक्तीने स्वतःची ओळख कमांडर नानावटी अशी करून दिली. वेळ न दवडता नानावटी पुढे म्हणाले, “मी एका माणसावर गोळी झाडली आहे.”

नानावटींना धक्का – नानावटींचं सगळं ऐकून घेतल्यानंतर लोबो उत्तरले , ‘त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. मला गावदेवी पोलीस ठाण्यातून याची माहिती मिळालीय.’

हे ऐकून नानावटींचा चेहरा फिका पडला. काही सेकंदांसाठी कोणी काहीच बोललं नाही.

लोबो या शांततेचा भंग करत म्हटले, ‘तुम्हाला एक कप चहा घ्यायला आवडेल का?’ घामाघूम झालेले नानावटी म्हणाले ‘नाही, मला फक्त एक ग्लास पाणी हवंय.’

हा किस्सा काय होता असा प्रश्न तुम्हाला पडेल.

झालं असं होतं की, आयएनएस म्हैसूरचे सेकंड इन कमांड लेफ्टनंट कमांडर नानावटी काही दिवसांच्या ड्युटीवरून आपल्या घरी परतले होते. घरी आल्याबरोबर त्यांनी आपली पत्नी सिल्व्हियाचा हात हातात घेतला. पण सिल्व्हियाने नकार दिला. (Nanavati Case) यामुळे नानावटी हादरले.

दुखावलेल्या नानावटींनी सिल्व्हियाला विचारलं, ‘तुझं आता माझ्यावर प्रेम राहिलं नाही का?’

सिल्व्हिया ‘नाही’ असं म्हणाली. नानावटींनी पुन्हा विचारलं, ‘आपल्यात दुसरी कोणी व्यक्ती आली आहे का?’ यावेळी सिल्वियाने जे उत्तर दिलं ते न ऐकण्यासाठी नानावटींनी आपला जीवही ओवाळून टाकला असता.

बची करकरिया यांचं पुस्तक – सिल्व्हियाचं उत्तर ऐकून कावस नानावटी एक शब्दही बोलले नाहीत. यानंतर दोघेही आपल्या कुत्र्याला डॉक्टरांकडे दाखवण्यासाठी घेऊन गेले.

परत येऊन त्यांनी शोरबेदार कटलेट्स, कोळंबी करी आणि भात असं जेवण केलं. पुढे ठरल्याप्रमाणे नानावटी यांनी सिल्व्हिया आणि मुलांना ‘टॉम थंब’ या इंग्रजी चित्रपटाचा शो पाहण्यासाठी मेट्रो सिनेमाजवळ सोडलं.

यानंतर नानावटी त्यांच्या नेव्हल ऑफिसला गेले. तिथून त्यांनी 38 स्मिथ अँड बेसन रिव्हॉल्व्हर घेतलं आणि तडक आपल्या पत्नीचा प्रियकर प्रेम आहुजा याचं घर गाठलं. (Nanavati Case) त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

त्यावेळी आहुजा कमरेला टॉवेल गुंडाळून आंघोळ करून आरशासमोर केस विंचरत होता. ‘इन हॉट ब्लड- द नानावटी केस दॅट शूक इंडिया’च्या लेखिका बची करकरिया म्हणतात, “मला या केसबद्दल विशेष असं काय वाटतं तर हे किरकोळ हत्या प्रकरण इतकं पुढं गेलं की, तत्कालीन पंतप्रधान नेहरूंना पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागली होती.

उच्च न्यायालयाने नानावटी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर अवघ्या चार तासांत मुंबईच्या राज्यपालांनी नानावटी यांच्या अपिलावर निर्णय होईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. या स्थगितीचा आढावा घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला घटनापीठ बसवावं लागलं. (Nanavati Case) एका विवाहबाह्य संबंधाच्या केसमध्ये असं घडण्याची ही पहिलीच वेळ होती.

या प्रकरणात संरक्षणमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनांच मध्यस्थी करावी लागली होती. हे एक विचित्र प्रकरण होतं ज्यात प्रेम होतं, विश्वासघात होता, हा हायप्रोफाईल गुन्हा होता. यामुळेच या घटनेला जवळपास 60 वर्षं झाली तरी या प्रकरणात लोकांचा रस कायम आहे.”

प्रख्यात वकीलांनी लढवलेला खटला – त्यावेळी भारताचे प्रख्यात वकील दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करत होते. नानावटी यांच्या बाजूने प्रसिद्ध फौजदारी वकील कार्ल खंडालवाला केस लढवत होते.

खंडालवाला यांनी आपल्या अशिलासाठी सहानुभूती किंवा कोणत्याही दयेची मागणी करणार नसल्याचं सांगत आपला युक्तिवाद संपवला. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या अशिलाने कोणताही गुन्हा केलेला नव्हता.

नंतर रजनी पटेल, वाय व्ही चंद्रचूड, नानी पालखीवाला, एमसी सेटलवाड, सीके दफ्तरी आणि गोपाल स्वरूप पाठक यांनी एका बाजूने चर्चेत भाग घेतला.

त्यावेळी आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे राम जेठमलानी या प्रकरणाने राष्ट्रीय पातळीवरील नाव झाले.

करकरिया सांगतात, “त्यावेळी राम जेठमलानी हे एक ज्युनियर वकील होते, पब्लिक प्रॉसिक्युटर नव्हते. प्रेम आहुजाची बहीण मॅमीने पर्यवेक्षक म्हणून त्यांची सेवा घेतली होती. त्यावेळी जेठमलानी अतिशय हुशार वकील होते. (Nanavati Case) त्यांनी खंडालवाल यांचा युक्तिवाद खोदून काढताना म्हटलं की, नानावटी आणि आहुजामध्ये हाणामारी झाली आणि मग जर नानावटी यांनी गोळी झाडली असेल तर हाणामारीनंतरही प्रेम आहुजा यांचा टॉवेल कमरेला जसा होता तसाच कसा राहिला? त्यांच्या या युक्तिवादाने बचावपक्षाची कोंडी झाली.”

वरिष्ठ नौदल अधिकारी – कार्ल खंडालवाल यांचा युक्तिवाद असा होता की, गोळ्या अपघाताने झाडल्या गेल्या आणि नानावटी यांचा प्रेम आहुजाला मारण्याचा कोणताच हेतू नव्हता.

प्रेम आहुजाच्या बाजूने युक्तिवाद करताना सी एम त्रिवेदी म्हणाले, “माझ्या विरोधकांचा युक्तिवाद तथ्य आणि वस्तुस्थितीची जागा घेऊ शकत नाहीत. त्यांना आपण कोर्टात आहोत की नाटकाच्या रंगमंचावर हे कळत नाहीये अशी मला शंका आहे. मी ज्युरींना सावध करू इच्छितो की, या माणसाच्या देखाव्याचा आणि मोठ्या व्यक्तींच्या जबाबांचा प्रभाव या केसवर पडू नये. या माणसाचे चारित्र्य सिद्ध करण्यासाठी नौदलाचे वरिष्ठ अधिकारी न्यायालयात येऊन साक्ष देत आहेत याचाही परिणाम या केसवर होऊ नये. मला असं वाटतं की, संपूर्ण नौदल नागरी प्रशासनाच्या विरोधात उतरलंय. खरं सांगायचं तर हा संपूर्ण प्रेमाचा त्रिकोण आहे.”

ललिता रामदास या माजी नौदल प्रमुख अॅडमिरल रामदास यांच्या पत्नी आहेत. ही घटना घडली तेव्हा त्या कॉलेजमध्ये शिकत होत्या. तत्कालीन नौदल प्रमुख अॅडमिरल रामदास कटारी हे त्यांचे वडील होते. नानावटी वडिलांचे आवडते अधिकारी असल्याने ललिता त्यांना ‘अंकल’ म्हणायच्या.

आर्थर रोड जेल – ललिता रामदास सांगतात , “मी जेव्हा नानावटींना पहिल्यांदा भेटले तेव्हा ते लेफ्टनंट होते. ते सर्वजण आमच्या घरी यायचे, जेवायचे, गप्पा मारायचे. माझे वडील अॅडमिरल रामदास स्वातंत्र्यानंतर पहिले भारतीय नौदल प्रमुख बनले होते. माझ्या दृष्टीने नानावटी हे व्यावसायिक नौदल अधिकारी होते. सिल्व्हिया आणि नानावटी यांचं लग्न मला आठवतं. (Nanavati Case) सिल्व्हिया खूप सुंदर होती, तर नानावटी खूप डॅशिंग होते. ते दोघेही ‘पॉवर कपल’ होते.”

विशेष म्हणजे या गुन्ह्यानंतर कमांडर नानावटी यांना आर्थर रोड तुरुंगात न ठेवता नौदलाच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

नानावटी यांना भेटण्यासाठी त्यांच्या कुत्र्यालाही नौदलाच्या तुरुंगात नेण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

जेव्हा जेव्हा नानावटी न्यायालयाच्या सुनावणीसाठी यायचे तेव्हा तेव्हा ते नौदलाचा पांढरा गणवेश परिधान करायचे. त्यांना मिळालेली पदक त्यांच्या छातीवर लावलेली असायची. मी करकरियांना विचारलं की, “त्यांच्या वकिलांच्या सांगण्यावरून ते असं करायचे का?”

ब्लिट्झचा पाठिंबा – बची यांचं उत्तर होतं, “ते असं जाणून बुजून करायचे असं वाटायचं. एकतर ते उंचपुरे, गोरे होते. त्यांची उंची सहा फुटांपेक्षा जास्त होती. नानावटी यांची भारतीय नौदलातील सर्वात सक्षम अधिकाऱ्यांमध्ये गणना होते, असं न्यायालयात वारंवार सांगितलं जायचं. प्रेमने त्यांच्या पत्नीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून देशविरोधी कृत्य केल्याचं भासवण्यात येत होतं.”

या संपूर्ण प्रकरणात मुंबईतून प्रकाशित होणार्‍या ‘ब्लिट्झ’ या इंग्रजी टॅब्लॉइडने नानावटींच्या समर्थनार्थ उघडपणे बाजू मांडली.

आजकाल गुन्हेगाराची सर्रास मीडिया ट्रायल केली जाते. पण तेव्हा ‘ब्लिट्झ’ने पीडिताची मीडिया ट्रायल करून नवा पायंडा पाडला होता. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या किडवाई मीडिया रिसर्च सेंटरच्या प्राध्यापिका सबिना गडियोक यांनी त्यावेळच्या या हत्याकांडाच्या मीडिया कव्हरेजवर एक लेख लिहिला आहे.

हे वाचा : इरकलच्या साडीत पाण्यानं चिंब भिजलेलं अंग.. या अभिनेत्रीने मादक फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा..

सबिना म्हणतात, ” नानावटी प्रकरण हे टेलिव्हिजन युगापूर्वी घडलेला मीडिया इव्हेन्ट होता. प्रेम आहुजाच्या नावाने तर टॉवेल विकले जाऊ लागले. हे टॉवेल विकताना फेरीवाले ओरडायचे- आहुजा का तौलिया… मारेगा तो भी नहीं गिरेगा.”

राष्ट्रीय महत्त्व – नानावटी जेव्हा कोर्टात जायचे तेव्हा मुली उभ्या राहून त्यांच्यावर फुलं उधळायच्या. ब्लिट्झने तर छापलं होतं की, भलेही नानावटी कायदेशीर लढाई हरतील पण त्यांनी मन आणि हृदयाची लढाई जिंकली आहे.

कदाचित याच कारणामुळे त्यांना माफी मिळाली असेल, पण त्यांच्या वाढत्या बहरत्या कारकिर्दीला मात्र खो बसला. अशा प्रकारे एका स्कँडलला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं.

हा काळ राजकीयदृष्ट्या थंड होता असं म्हणता येणार नाही. भारताचा पाकिस्तानसोबतचा तणाव वाढत होता. चीनसोबत भारताचे मतभेदही सुरू झाले होते.

भारतात नव्या राज्यांची निर्मिती होत होती. केरळमध्ये पहिल्यांदाच कम्युनिस्ट सरकार सत्तेवर आलं होतं. मात्र असं असतानाही नानावटी प्रकरणाची चर्चा सर्वत्र होत होती. दिल्लीतील वृत्तपत्रांमध्येही याविषयी कॉलमच्या कॉलम छापले जात होते.

मीडिया कव्हरेजचा परिणाम असा झाला की, गुन्हा करूनही संपूर्ण देशाची सहानुभूती नानावटींच्या बाजूने होती.काही ठिकाणी तर या खटल्याची तुलना महात्मा गांधींच्या हत्येच्या खटल्याशी करण्यात आली.

गांधी हत्याकांडाशी तुलना – सबिना सांगतात, “इंडियन एक्स्प्रेसने त्यांची तुलना केवळ गांधी हत्या प्रकरणाशीच केली नाही तर बंगालमधील भुवाल संन्यासी प्रकरण, मेरठ कॉन्स्परीसी केस आणि भगतसिंग यांच्या प्रकरणाशीही या प्रकरणाची तुलना करण्यात आली.”

‘ब्लिट्झ’ने तर असा तर्क मांडला की, कमांडर नानावटी यांच्या अफाट अनुभवाचा फायदा भारताला चीनबरोबरच्या युद्धात होईल त्यामुळे त्यांना सोडलंच पाहिजे. (Nanavati Case) नानावटी यांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल कटारी त्यांच्या कॅनबेरा विमानातून मुंबईला येण्याची ही पहिलीच वेळ होती.

नानावटींच्या समर्थनार्थ संपूर्ण नौदल आणि अगदी संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन उघडपणे मैदानात उतरले होते.

बची करकरिया सांगतात, “संरक्षणमंत्र्यांनी तर खूप पुढं जाऊन नानावटींना पाठिंबा दिला. नानावटींनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात नौदल ऑफिसर म्हणून काम केले होते. कदाचित मेनन त्यांना तेव्हापासून ओळखत असावेत. नानावटींच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्यांची शिफारस केली नसल्याचेही नेहरूंनी स्पष्ट केलं होतं. पण नानावटी हे अत्यंत कर्तबगार अधिकारी आहेत. (Nanavati Case) त्यामुळे त्यांना एवढी कठोर वागणूक देऊ नये, असं नौदल प्रमुखांनी निश्चितपणे सांगितलं होतं.”

नानावटींवर चित्रपट – पण या सर्व जनपाठिंब्यानंतरही कावस नानावटी कायदेशीर लढाई हरले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पण नानावटींना जास्त काळ तुरुंगात राहावं लागले नाही. महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांनी त्यांना शिक्षेत माफी दिली.

नानावटी आणि सिल्व्हियाच्या या गोष्टीला फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्येही भरपूर कव्हरेज मिळालं. टाइम आणि न्यूयॉर्करने तर त्यावर कथा रचल्या.

या विषयावर किमान तीन हिंदी चित्रपट तयार झाले.

नानावटी यांचं निधन – प्रोफेसर सबिना गडियोक सांगतात, ” ‘ये रास्ते है प्यार के’ हा एक चित्रपट, त्यानंतर ‘अचानक’ हा चित्रपट आणि अलीकडेच आलेला ‘रुस्तम’ चित्रपट या कथेवर आधारित होता. सलमान रश्दींच्या ‘मिडनाईट चिल्ड्रन’ मध्ये त्याची झलक पाहायला मिळाली. 2002 मध्ये इंदिरा सिन्हा यांनी त्यावर ‘द डेथ ऑफ मिस्टर लव्ह’ ही कादंबरी लिहिली. रोहिंग्टन मिस्त्री यांच्या ‘सच अ लाँग जर्नी’ या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. (Nanavati Case) दोन वर्षांपूर्वी ‘बॉम्बे वेल्वेट’ चित्रपटात ‘ये तूने क्या किया, सिल्विया’ या प्रसंगावर एक गाणंही चित्रित करण्यात आलं होतं.

17 मार्च,1964 रोजी नानावटी यांची लोणावळ्यातील ‘सनडाउन’ या बंगल्यातून सुटका झाली. त्या बंगल्यात ते सहा महिन्यांपासून एक एक महिन्याच्या पॅरोलवर राहत होते.

हे वाचा : स्मिता पाटील यांनी स्वतः त्यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केलेली.. अमिताभ बच्चन यांच्या बद्दल वर्तवलेली भविष्यवाणी देखील ठरली होती खरी.!!

नानावटी यांना तीन वर्षांपेक्षा कमी काळ तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून सुटताच नानावटी पत्नी सिल्वियासह कॅनडाला गेले आणि तिथेच स्थायिक झाले.

तेथे 2003 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांच्या पत्नी सिल्व्हिया अद्यापही जिवंत आहेत, मात्र त्यांना या विषयावर कुणाशीही काहीच बोलायचं नाहीये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स