Saturday, June 10, 2023
Homeआरोग्यनारळपाणी पिण्याचे आहेत निरनिराळे आरोग्यदायी लाभ..

नारळपाणी पिण्याचे आहेत निरनिराळे आरोग्यदायी लाभ..

नारळाचे पाणी : नारळाच्या पाण्याची मधुरता आपणास वेगळी वर्णन करून सांगायची आवश्यकता नाही ….मात्र हे जल म्हणजे अमृतजल आहे ….नारळाच्या पाण्याचे काही अद्भुत चीकित्सीय उपयोग पाहूया ….

१. नारळाचे पाणी त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असून त्वचेचा पोत सुंदर आणि तजेलदार राहावा यासाठी हे पाणी बाहेरून लावण्यास अत्यंत उपयुक्त आहे …चेहऱ्यावर मुरूम उठून त्यांचे डाग किंवा खड्डे राहिले असतील तर चेहऱ्यास रोज एक दहा मिनिटे मालिश करावी ….

२. अपचनाचा नियमित त्रास असेल तर रोज एक दहा दिवस नारळाचे पाणी प्यावे .. पचनशक्ती उत्तम राहते …

३. कोणतेही एनर्जी ड्रिंक घेत बसण्यापेक्षा नारळपाणी हा उत्तम पर्याय आहे ..

४. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर नारळपाणी नियमित सेवन करावे … त्रास बरंच कमी होतो …

५. लघवीचे प्रमाण कमी झाले असेल तर नारळाच्या पाण्यात खडीसाखर घालून प्यावे … किंवा लघवी लालसर होत असेल तर एक आठवडा नारळपाणी घ्यावे ..

६. नारळाचे पाणी हृदयाला बळ देणारे आहे .. त्यामुळे हृदयाला अशक्तपणा आला असेल तर नारळपाणी नित्य प्यावे …

७. नारळाच्या दुधाप्रमाणेच नारळाचे पाणी देखील तारुण्य टिकवून ठेवते …

८. पाणी पिऊनही घशाला कोरड पडत असेल तर थोडे थोडे नारळाचे पाणी प्यावे फायदा होतो ,कोरड थांबते …

९. मूतखडा वारंवार होत असेल तर नारळाच्या पाण्यासारखे दुसरे औषध नाही … नारळाचे पाणी मूतखडा विरघळवण्यास मदत तर करतेच पण पुन्हा खडा होऊ देत नाही …

१० . सातत्याने मानसिक थकवा आणि नैराश्य येत असेल तर नारळपाणी एक महिनाभर सेवन करावे ….कोणतीही रासायनिक औषधे घेण्यापेक्षा हा सुंदर उपाय आहे …

११. तेलकट चेहरा असणार्या लोकांनी नारळ पाण्याने नेहमी चेहरा स्वच्छ केल्यास चेहऱ्यावर तेल कमी होऊन चेहरा उजळतो ..

१२. गर्भवती स्त्रियांना नारळाचे पाणी म्हणजे ईश्वरी देणगी आहे … नऊच्या नऊ महिने बाळाच्या परिपूर्ण वाढीसाठी नारळपाणी मदत करते

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स