नाशिकच्या कल्याणी ताईंचा अंगावर शहारे आणणारा अनुभव.. स्वामींच्या अदभुत लिला..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे..!!नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभवाच्या लेखमाले मध्ये तुमचे स्वागत आहे, आज स्वामी महाराजांच्या अनुभवाचे लेख देशाबाहेर देखील वाचले जात आहेत, आमच्या हातून हे अनुभव आपल्यापर्यन्त पोचवण्याचे काम होत आहे हे आमचे भाग्य.

जर तुम्हाला लेख आवडत असतील, आणि स्वामी महाराजांवर तुमची श्रद्धा असेल तर ‘शेअर’ करायला विसरू नका. नमस्कार माझे नाव कल्याणी, मी नाशिक येथे राहते. आज मी तुम्हाला माझा स्वामी अनुभव सांगणार आहे. माझा हा अनुभव खूप मोठा आहे, पण मी होता होईल तितका थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अनुभव अंगाला शहारा आणणारा आहे. तर ऐका(वाचा)..

लॉकडाउन मध्ये मी एक दिवस 2021 च्या एप्रिल‌ महिन्यात मी जॉब साठी मुंबईला माझ्या बहिणीकडे गेले होते. तिथे मी 8 ते 10 दिवस राहिले. पण मला मुंबईला काही करमत नव्हते. मला आमच्या येथे कपालेश्वर महादेवांची खुप आठवण येत होती कारण मी रोज त्यांच्या मंदिरात दर्शनाला जात असे. मला असे झाले होते की, मी कधी एकदा नाशिकला परत जाईल आणि महाराजांना भेटेल.

मला नाशिकला परत यायचे होते. पण लॉकडाउन असल्यामुळे मला येता येत नव्हते आणि लॉक डाऊन पण 1 मे ला अनलॉक होणार होता. माझ्याकडे मुंबईला राहण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता. अचानक एक दिवस मला वाटले की आपण जावे घरी म्हणून मी माझ्या ताई ला कॉल केला की मी आत्ता निघते नाशिकला. माझी ताई तेव्हा जॉब वर गेलेली होती.

तिने संगितले की, मी येतेय घरी… मी येई पर्यंत तू जाऊ नको. माझी ताई 1 वाजता घरी आली आणि मी तिला भेटले व लगेच नाशिक ला निघाले. मला आधीच माहित होते की मला गाडी मिळणार नाही, पण माला जायचे होतेच… नाशिक ला जाण्यासाठी निघताना मी देवाच्या पाया पडले होते आणि लगेच निघाले. ट्रेनचे तिकीट मिळणार नाही हे माहीत होते म्हणून मला माझ्या ताईने तिच्या जॉब चा आयडीकार्ड दिलेले आणि तो दाखवले तेव्हा कुठे मला ट्रेन चे तिकीट मिळाले होते.

मग घाटकोपर या स्टेशन वर मी 2 तास कसारा या ट्रेन ची वाट बघत बसले, 3 वाजता ट्रेन आली आणि मी नाशिक कडे येण्यासाठी निघाले. कसारावरून काळी पिवळी मधे बसले आणि मी स्वामी ना बोलले स्वामी मी नाशिकला येते आहे तुम्ही माझ्यासोबत आहात ना? जर तुम्ही माझ्यासोबत असाल … मला सुखरूप पोचवणार असाल तर काहीतरी इशारा द्या… काहीतरी खून द्या.

मी असे मनात म्हणून अर्धा तास देखील झाला नसेल अन अचानक आमच्या गाडीच्या मागून एक फोर व्हिलर आली.. आणि त्या गाडीवर श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले मला दिसले, त्या गाडी मधे स्वामीची मूर्ती होती. मला खून पटलेली होती, मी ते बघून खूप खुष झाले. आणि काहीही अडथळा न येतं मी घरी 5:45 ला पोहचले. घरी आले लगेच फ्रेश झाले आणि आमच्या येथे पंचवटी मधे कपालेश्वर महादेवाच्या मंदिरात गेले.

खूप खूष झाले… कारण मी खूप दिवसांनी माझ्या भोलेंना डोळे बघुन बघत होते. त्यांना बघुन माझे डोळे भरून आले आणि खूप छान वाटले…तो दिवस पण सोमवार होता. अचानक त्याच दिवशी रात्री 10:30 वाजता मी जेवण झाल्यावर बाहेर चक्कर मारण्यासाठी बाहेर आले. तर माझी मैत्रीण ऋतुजा आणि माझा भाऊ रेवण हे दोघे फोन वर कोणासोबत बोलत होते.

मला ऋतूजाने अचानक आवाज दिला आणि बोलली की कल्याणी दी तुझ्याकडे एक काम आहे. मी बोलले हा बोल ना.! अग कस्तुरी ची एक फ्रेंड आहे… त्याचे नाव देव आहे, तर तिच्या मम्मी आणि पप्पांना दोघांना कोरोना झाला आहे आणि ते दोघे कोवड सेंटर ला आहेत. तिचे पप्पा बरे आहेत पण तिची मम्मी खूप सिरीयस आहे.

तर तू प्लिज तुझ्या मामांना फोन कर आणि दुसरीकडे कुठे बेड मिळतोय का बघ. तिला कोणी नाही… सख्खा भाऊ नाही की कोणी सख्खी बहीण नाही… ती एकटीच आहे आणि घाबरली आहे. तर प्लिज त्यांना विचारून बघ. माझे मामा राजकरणात असल्या कारणाने मग मी मामांना लगेच फोन केला. तर ते बोलले येवढ्या रात्री बेड नाही मिळणार तू सकाळी ये माझ्याकडे मी आणि फोन ठेवून दिला. कस्तुरी आणि माझाही फोन झाला.

उद्या काहीही करून उद्या बेड मिळायला पाहिजे, तिची मम्मी खूप सीरियस आहे आणि त्यांचा 2 दिवसापासून लेवळ पण फक्त 30 आहे. तिच्या आईचा स्कोर पण 12 च्या पुढे आहे. त्यांचा वायु लेवळ पण वाढत नाहीये आणि त्यांना बीपी चा पण त्रास आहे. गेल्या 2 दिवसापासून बेड मिळत नाहीये मग मी तिला बोलले काही होणार नाही त्या काकूंना होईल सर्व ठीक मिळेल त्यांना उद्या बेड मिळेल त्यांना…

आम्ही देवाला प्रार्थना करू.. म्हणून मी परत त्याच दिवशी रात्री पुन्हा कपालेश्वर ला गेले आणि सांगितले की त्या काकूंना काहीच होऊ नका देऊ सर्व काही ठीक करा. मी स्वामींना साकडे घातले आणि घरी आले आणि पुन्हा एकदा देवाजवळ स्वामीच्या मूर्ती पुढे बसले. स्वामींना परत प्रार्थना केली की त्या काकूंना काहीच होऊ नका देऊ.

मी ती रात्र कशी तरी काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता मी आणि कस्तुरी मामांकडे गेलो आणि त्यांना सर्व काही सांगितले मग मामा बोलले की मी हॉस्पिटल मधे फोन करतो आणि तुला कळवतो. 10 वाजेपर्यंत बेड होईल खाली… पण आमच्याकडे वेळ कमी होता…

कारण देव च्या मम्मीला काही करून बेड हा उपलब्ध करून द्यायचा होता. कारण डॉक्टरांनी त्यांची गॅरंटी दिलेली नवती. मी आणि कस्तुरी आमच्या घरी आलो. मग मी कस्तुरीला बोलले मी स्वामी समर्थांचे तीर्थ बनवते … तर देव ची मम्मी ते तीर्थ पिऊ शकेल का… तर ती बोलली हा पिऊ शकेल.

पण मग कस्तुरी हसायला लागली. तिला बोलले मी हसू नको… खरच त्या काकूंना बरे वाटेल … स्वामी त्यांना बरे करतील. तेव्हा कस्तुरींने चॅलेंज केले की कल्याणी दी जर तुझ्या स्वामींनी जर त्या काकूंना आज संध्याकाळपर्यंत बरे केले आणि त्यांना बेड मिळाला तर मी तुझ्या स्वामींना मानेल आणि त्यांच्या पुढे हात जोडेल…

मान्य करेल की स्वामी आहेत… मी देखील आणि चॅलेंज स्वीकारले. मी तीर्थ करायला स्वामी पुढे बसले…आणि स्वामीना सर्व काही सांगितले की, काका आणि काकू दोघांना बरे वाटू द्या एक वेळ माझा जीव घ्या पण त्यांना बरे करा. मी तारक मंत्राचे तीर्थ करतेय या तिर्थाने त्यांना बरे वाटू द्या.

मी पाण्याचा ग्लास भरला आणि स्वामीना फोटोवरून आणि मुर्तीवरुंन अगरबत्ती ओवळली आणि पाण्याचा ग्लास जवळ ती अगरबत्ती ठेवली. 11 वेळा तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि तीर्थ बनवून झाले… मग कस्तुरी आणि मी ते तीर्थ आणि अगरबत्तीची विभूती घेऊन सेंटर ला निघालो.

आणि तिथे पोहचल्यावर मी ते तीर्थ देव कडे दिले त्याला सांगितले की हे तीर्थ काका आणि काकूंना दे. कस्तुरी ने तिच्या मामांना महादेवांचा अभिषेक करायला सांगितले. मी देव ला संगितेले की काकूंना स्वामीची ही विभूती लाव… आणि सारखे स्वामींचे नामस्मरण करायला सांग… श्री स्वामी समर्थ म्हणायला लाव..

मी पण सतत नामस्मरण करत होते… आणि देव ने तिच्या मम्मी पप्पांना ते तीर्थ पाजले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते तीर्थ पाजल्यां नंतर त्याच्या 15-20 मिनिटांनी त्या काकूंचा प्राणवायू लेवळ ही 30 वरून 58 इतका झाली. विशेष बाब म्हणजे काकूंचा 3 दिवसांपासून वायु लेवल वाढतच नव्हती.

काकूंना बेड मिळत नव्हता अचानक समोरून हॉस्पिटल मधून कॉल आला की बेड खाली आहे. त्याच दिवशी सेंटर जवळ तीन मोटासायकल होत्या, मित्रांनो कदाचित तुमचा भरोसा बसणार नाही पण प्रत्येक मोटासायकल वर श्री स्वामी समर्थांचा फोटो आणि श्री स्वामी समर्थ असे नाव लिहलेले किंवा ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे लिहलेले होते.

मी ते बघून खूप खुष झाले… परत त्या काकूंना 2 तासाने पुन्हा तीर्थ पाजले… आणि पुन्हा त्यांचा मग लेवल हा 58 वरून 69 इतका झाला… आम्ही खूप खुष होतो… आणि मंग काकूंना दुसऱ्या हॉस्पिटल मधे नेण्यात आले… तिथे त्यांना बेड पण मिळाला.. श्री स्वामी समर्थ !!

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment