नविन नविन लग्न झाल्यावर.. लक्षात असू द्या हे आठ नियम..

प्रत्येक स्री किंवा पुरुषांची लग्नानंतर एकमेकांकडून बऱ्याच अपेक्षा असतात. काही जण अगदी परीकथेतील असल्यासारखा विचार करतात तर काहींना स्वतःला समजून घेणारा असा सुयोग्य जोडीदार हवा असतो. दोघांनाही वैवाहिक आयुष्य सुखकर करण्यासाठी खूप कष्ट करावेच लागतात. आज आम्ही काही टिप्स देत आहोत ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य यशस्वी होईल.

१. आपल्या जोडीदाराची इतर कोणाबरोबरही तुलना करू नका
प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी तरी आदर्श असते. पण नेहमीच त्यांची तुलना आपल्या जोडीदाराशी कराणे अनावश्यक ठरते. आपल्या पत्नीच्या स्वयंपाक कौशल्याची तुलना आपल्या आईशी केल्याने तुमच्या नातेसंबंधावर वैवाहिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. तुमचे वडील किंवा भाऊ तुमचे आदर्श असू शकतात परंतु त्यांची तुलना पतीशी करणे योग्य नाही. चांगले जोडीदार हे नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या कौशल्याचे कौतुक करतात.

२. आर्थिक व्यवहार आधीच पारदर्शक ठेवावेत
बहुतेक विवाहांमध्ये आर्थिक बाजू ही विरोधाभासी जाणवते जी नंतर तुमच्या नात्यातील मोठा अडथळा बनते. दोन्ही जोडीदारांनी आपापल्या आर्थिक परिस्थितीविषयी लग्नापूर्वी एकमेकांशी स्पष्टपणे बोलावे. या चर्चेमुळे दोघांना वर्तमान, भविष्यात सक्षम होता आणि वैवाहिक आयुष्य समृद्ध होते.

३. कधीही स्वामित्व गाजविण्याचा अतिरेक करू नका

कोणत्याही नात्यात जर तुम्ही आदराची अपेक्षा करत असाल तर तो आधी द्यायला शिका. बरेच विवाह केवळ या कारणाने मोडतात की, दोघेही सतत आपण कसे वरचढ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. प्रत्येक घटस्फोटाचे जोडीदाराची गुर्मी एक प्रमुख कारण असते जे स्वीकारण्यासारखे नाही. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पर्यायांचा,विचारांचा आणि शुभेच्छांचा आदर करावा.

४. भूतकाळाची जोडीदाराला सर्व माहिती द्या
तुम्ही एखाद्या नात्यात गुंतला होता हा गुन्हा नाही. पण ही गोष्ट तुमच्या वर्तमानातील जोडीदारापासून लपवणे हे योग्य नाही. विश्वास ठेव माझ्यावर असे म्हणण्यासाठी तो आधी निर्माण करावा लागतो. तुमच्या जोडीदाराला तुमच्या भूतकाळाविषयी इतर कोणाकडून समजल्यास तो जास्ती दुखावला जातो. एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही नवे आयुष्य सुरू करता तेव्हा ते प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे करावे. तुम्ही जर चुकीचे नसाल आणि तुमचा जोडीदार खरोखरी खूप समजूतदार असेल तर तुम्हाला वैवाहिक आयुष्याबाबत भीती वाटण्याचे कारणच नाही.

५. अनावश्यक युक्तिवाद खोडून काढू नये
जेव्हा दोन व्यक्ती एकत्र तर येतात तेव्हा त्यांच्यात वाद, प्रतिवाद होणे हे अपरिहार्य आहे. पण दोघांनी याची परिसीमा निश्चित केली पाहिजे. जेव्हा तुम्ही खूप चिडलेले असता तेंव्हा एकमेकांवर अनावश्यक प्रतिक्रिया देणे टाळा विशेषतः: जोडीदाराच्या कामाविषयी किंवा त्याच्या कुटुंबीयांविषयी.

६. एकमेकांना पुरेशी स्पेस द्या

वैवाहिक आयुष्यात एकमेकांना योग्य वेळा द्यायला हवा यात शंका नाही. पण याचा अर्थ जोडीदार चोवीस दुणे अठ्ठेचाळीस तास बरोबर असेल अशी अपेक्षा करणे चूक आहे. त्यांना स्वतःचे असे आयुष्य आहे हे मान्य करा आणि ते जगू द्या. त्यांना त्यांचे मित्र-शुभचिंतक यांच्यासोबत वेळ घालवू द्या. तुमचे प्रेम ही जोडीदाराची शक्ती असावी त्याचे ओझे वाटून देऊ नका.

७. काहीवेळा तडजोड करणे चांगले असते
भविष्यात नाते दृढ होण्याच्या दृष्टीने काही गोष्टीत छोट्या-मोठ्या तडजोडी करायाला हरकत नाही. तडजोडीमुळे वैवाहिक आयुष्याची गोडी वाढते. कधी तरी नेहमीच्या मालिकांवर पाणी सोडून फुटबॉल किंवा क्रिकेटचे सामने बघा, कधी तरी घरातल्या कामांपासून सुटका करून त्यांचे कौतुक करा. अशा तडजोडी नेहमी एकाच जोडीदाराने कराव्यात असे नाही.

८. आपल्या भावना दडपू नका
यशस्वी वैवाहिक आयुष्यात दोघांचे नाते मैत्रीचे, समजुतीचे थोडीशी कुरकुर पण भरपूर प्रेमाने भरलेले असावे. तुम्ही एखादी गोष्ट खूप अगतिकतेने सांगावीशी वाटते तेव्हा ती मनातच न ठेवता जोडीदाराला लगेच सांगा. तुमच्या भावना दडपू नका.

Leave a Comment