मित्रांनो अश्विन महिन्यात येणारा नवरात्राचा उत्सव शारदीय नवरात्र उत्सव म्हणून ओळखला जातो. शास्त्रामध्ये या नवरात्र उत्सवाला फार महत्त्व आहे. नवरात्र मध्ये देवी आईच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपांचे पूजन केले जाते.
अशी मान्यता आहे की जर आपण नवरात्राच्या या नऊ दिवसात देवी आईची खरी भक्ती व आराधना केली. सर्व नियमांचे पालन करून देवीचे पूजन व उपासना केली तर देवी लक्ष्मी सदैव आपल्या घरात राहते.
वास्तुशास्त्रात काही खास अशा वस्तू सांगण्यात आल्या आहेत. त्यांना नवरात्रीच्या उत्सवात घरी आणले तर आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहते. चला तर जाणून घेऊया त्या कोण कोणत्या वस्तू आहेत. त्यांना नवरात्रात घरी आणणे खूप फलदायी असते.
वडाचे पान – हिंदू धर्मात वडाच्या झाडाला आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या अगोदर वडाची पाने आपल्या घरी आणावीत. त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढून आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवून द्यावे. आणि नवरात्रीचे नऊ दिवस त्या पानाचे पूजन करावे. या उपायांमुळे देवी आईची कृपा आपल्यावर नेहमी राहते.
कमळाचे फूल- देवी आईला कमळाचे फूल अतिप्रिय आहे. नवरात्रीत कमळाचे फूल किंवा कमळाच्या फुलाचे चित्र घरात आणल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. नवरात्री दरम्यान कमळाचे फूल आपल्या घरी आणून देवी आईला अर्पण केल्यास आपल्याला शुभ फळे मिळतात. यामुळे व्यक्तीच्या धनधान्याची वृद्धी होते.
देवी सरस्वतीचे वाहन मोरपंख आहे. म्हणून घरात नवरात्री दरम्यान मोरपंख आणणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की नवरात्रीच्या काळात मोरपंख घरी आणून ते मोरपंख घराच्या ईशान्य भागात ठेवावे.
तर यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढलेली राहते. आणि जर आपण हे मोरपंख देवघरात ठेवले तर आपल्या जीवनात विद्या व धनाची कमतरता कधीच राहत नाही.
सोने व चांदीचे नाणे- देवी लक्ष्मी व श्री गणेश यांची प्रतिमा असलेले सोने व चांदी चे नाणे खूपच शुभ मानले जाते. शास्त्रानुसार जर आपण नवरात्रीच्या वेळी सोन्याची किंवा चांदीची नाणे घरी आणून देवघरात स्थापित केले यामुळे आपल्या कुटुंबातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. व आपल्यावर देवी आईची कृपा होते.
केळीचे झाड- शास्त्रामध्ये केळीच्या झाडाला खूप पूजनीय मानले जाते. नवरात्रीमध्ये केळीचे झाड घरी आणणे व ते एका कुंडीत लावून मागील अंगणात लावले तर खूप शुभ असते.
असे मानले जाते दररोज पूजनानंतर या केळीच्या झाडाला पाणी अर्पण केल्यास आपल्याला कधीच पैशाची कमतरता भासत नाही. आणि देवी आईचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो.
शंखपुष्पी- शंखपुष्पी चे झाड म्हणजे गोखरणी चे झाड. शंखपुष्पी चे झाड धार्मिक दृष्ट्या खूप शुभ मानले जाते. नवरात्रीच्या काळात जर शंखपुष्पीची मुळी विकत आणली. व शुभमुहूर्तावर ती मुळी एका डब्यात ठेवून.
या डबीला आपल्या तिजोरीत ठेवले. तर आपल्याला व आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक सामना करावा लागत नाही.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद!