नवऱ्याच्या ‘या’ 5 सवयी कोणतीच पत्नी सहन करणार नाही.. वेळीच सुधारा या सवयी नाहीतर आयुष्य होईल उद्धवस्त.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आपण अनुभवतो की लग्नानंतर मुलगा व मुलगी दोघांचेही आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. अशा परिस्थितीत, विशेषत: मुलांना खूप समस्या असतात, परंतु काही सवयी मुलांच्याही अशा असतात ज्या पत्नीसाठी त्रासदायक ठरू शकतात.

ही गोष्ट तर कोणीच नाकारणार नाही की नवरा बायकोने आपल्या नात्यात लहान सहन गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. जर थोडीशी सुद्धा चूक झाली तर गोष्ट बिघडू लागते आणि त्याचा परिणाम नात्यावर होतो. लग्नानंतर दोन्ही जोडीदारांना थोडेफार तर बदलावेच लागते तेव्हाच कुठेतरी त्यांच्यात कम्फर्ट निर्माण होतो आणि नाते नीट सुरू राहते.

लव्ह मॅरेज असो की अ‍ॅरेंज्ड मॅरेज सोबत राहताना अनेक गोष्टी अशा असतात ज्या जोडीदारांना सहन होत नाहीत. खासकरून पुरुषांच्या बाबतीत ही गोष्ट होते ज्यांना बॅचलर लाईफ मध्ये स्वतःच्या मनाप्रमाणे किंवा मित्रांसोबत मनमुराद आयुष्य जगण्याची सवय असते पण लग्न झाल्यावर मात्र बंधनं येतात अन् त्यांना मोठ्या प्रमाणात अ‍ॅडजस्ट करून जगावे लागते.

बायकोच्या अनेक सवयी किंवा अनेक मर्यादा त्यांना नकोशा वाटतात. आम्ही आज या लेखातून पुरुषांच्या अशा काही सवयी सांगणार आहोत ज्या बायकांना अजिबात आवडत नाहीत. जर तुम्हाला सुद्धा या सवयी असतील तर त्या वेळीच बदललेल्या योग्य! ह्या गोष्टी वेळीच बदलल्या तर त्याचा परिणाम नात्यावर होणार नाही आणि नाते मस्त सुरू राहील!

स्वतःवर प्रेम करणे ही गोष्ट योग्य असली तरी याचा अर्थ हा नाही की नेहमी स्वतःबद्दलच विचार करावा किंवा स्वार्थी असावे. अनेकदा पती आपल्या स्वतःचाच एवढा विचार करतात की आपल्या बायकोच्या इच्छा विसरून जातात. ते प्रत्येक गोष्ट स्वतःच्या सोयीने ठरवतात.

नेहमी स्वतःला पुढे ठेवून विचार करणे आणि मग आपल्या जोडीदाराबाबत विचार करणे या गोष्टी नात्यात कटुता निर्माण करू शकते. प्रत्येक पत्नीची इच्छा असते की पतीने तिच्यासाठी टाईम काढावा, तिची काळजी घ्यावी आणि तिने काही न बोलताही तिच्या मनातील गोष्टी समजून घ्याव्यात.

​अन्य स्त्रियांशी फ्लर्ट करणे.. लग्न झाल्यावर सुद्धा तुम्ही दुसऱ्या स्त्रियांकडे आकर्षित होत असाल आणि त्यांच्या सोबत फ्लर्ट करण्याची तुमची सवय जात नसेल तर यामुळे तुमची पत्नी खूप जास्त दुखावली जाऊ शकते. कोणतीच पत्नी आपल्या पतीला अन्य स्त्रीच्या जवळ जाताना पाहू शकत नाही.

याचा थेट अर्थ पत्नी असा काढू शकते की तिचा पती तिच्यावर चिट करतो आहे. सतत अन्य स्त्रियांशी फ्लर्ट करण्याची सवय असलेल्या पतीबाबत पत्नीच्या मनात काडीचा सुद्धा आदर नसतो. त्यामुळे वेळीच ही सवय मोडावी नाहीतर नात्यात अधिक कटुता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही.

सतत खोटे बोलणे.. पती पत्नीचे नाते हे स्फटीकाप्रमाणे स्वच्छ असावे असे म्हणतात. त्यात कोणत्याही प्रकारचे खोटे वा असत्य वागणे नसावे. जर तुम्ही सतत आपल्या पत्नीशी खोटे बोलत असाल चा तसे वागत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की तिला काही कळत नाही तर हा तुमचा गैरसमज आहे.

खोट्याच्या आधारावर जर तुम्ही नाते उभे करू पाहत असाल तर हे जास्त काळ टिकणार नाही हे लक्षात घ्या आणि जर तुमच्याकडून काही चूक झाली तर खोटे न बोलता तिची माफी मागा जेणेकरून ती जास्त रागावणार नाही. पण जर तुम्ही सतत खोट्याच्या आधार घेतला तर नात्यातील विश्वास संपेल आणि नाते कधीही तुटेल.

वेळ न देणे.. ही सवय जवळपास सर्वच पतींमध्ये दिसून येते. या सवयीचा परिणाम लगेच दिसून न येता हळूहळू दिसून येतो आणि जेव्हा पत्नीच्या सहनशीलतेचा कडेलोट होतो तेव्हा नाते तुटण्याच्या मार्गावर जाऊन पोहोचते. कोणत्याही पत्नीला केवळ आणि केवळ पतीचा वेळ आणि त्याचे प्रेम हवे असते.

सुखी संसाराचा किंवा पत्नीला खुश ठेवण्याचा हा एकमेव प्रभावी मार्ग आहे हे अनेक पती लक्षात घेत नाहीत. हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा नात्यात अजिबातच समस्या निर्माण होणार नाही. त्यामुळे आपल्या पत्नीला अधिकाधिक वेळ देण्याची सवय लावून घ्या आणि नाते आनंदी ठेवा.

आदर न देणे.. पूर्वीच्या काळी स्त्रिया आपल्या नवऱ्याला घाबरून असायच्या. पतीने आदर नाही दिला तरी त्यांना चालायचं पण पतीला मात्र त्या आदर द्यायच्या. आता ही स्थिती बदलली आहे कारण काळ सुद्धा बदलला आहे.

आताच्या स्त्रिया आपला पती आपल्याला आदर देईल, समान वागणूक देईल अशी अपेक्षा करतात आणि त्यात चूक सुद्धा नाही, जेव्हा पती या गोष्टीत कमी पडतात, तेव्हा गोष्टी बिघडू लागतात आणि नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. संसार डगमगू लागतो. त्यामुळेच प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीला आदर द्यायलाच हवा.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!