नियमित स्वामींची सेवा घडत असताना सेवा मधेच सोडली की काय होते ? बघा अनुभव आणि प्रचिती..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्र- मैत्रिणींनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा मध्येच सोडली की काय होते याचा एका सेवेकरिता ताईंचा अनुभव पाहणार आहोत. त्यांनी माहिती देताना आपले नाव सांगितलेले नाही. हा अनुभव आपण पाहणार आहोत त्यांच्याच शब्दात.. मी स्वामी समर्थ महाराजांनी बद्दलचा एक अनुभव शेअर करू इच्छिते.

साधारणपणे सहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझं लग्न जमत नव्हते मी तशी दिसायला बरी आहे आणि एज्युकेटेड आहे. पण असे असूनही काही ना काही गोष्टी वाईट घडायच्या. तेव्हा मी खूप निराश होते. या दरम्यान मला माझी एक हॉस्टेलची मैत्रीण एकदा स्वामींच्या मठात घेऊन गेली.

तेथे गेल्यानंतर मला स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचायला सांगितले. मी ते वाचू लागले आणि लगेच पंधरा दिवसांमध्ये मला एक चांगलं स्थळ मिळालं आणि माझं लग्नही झालं तेव्हापासून मी स्वामींची भक्त झाले.

पण लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी मूल होत नव्हतं सर्व मेडिकल ट्रीटमेंट केल्या. पण रिझल्ट मिळत नव्हता. तेव्हा एका दिवशी मला अचानक आठवण झाली की मी लग्न झाल्यापासून स्वामींच्या मठात गेलेच नाही.

तेव्हा मी ठरवलं की काही झालं तरी डॉक्टरांकडे जायचे आधी मठात जाऊन स्वामींचे आशिर्वाद घ्यायचे आणि परत मी स्वामींचे चरित्र सारामृत वाचायला सुरुवात केली.

आणि ते अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत त्या आठवड्यात मला आनंदाची बातमी मिळाली. हे फक्त आणि फक्त स्वामी करू शकतात अनुभव सांगावासा वाटतोय. पण त्यानंतर सेवा न केल्यामुळे दिवस खूप खराब जायचा किंवा काही ना काही चुकीचं घडायचं.

पण ज्या दिवशी सेवा करायचं तो दिवस अगदी प्रसन्न जायचा. काही दिवसाच्या ऑब्झर्वेशन नंतर हे माझ्या लक्षात आलं आणि मी त्यानंतर सेवा सातत्याने सुरू ठेवले. तुम्ही जर स्वामींची रोज सेवा करत असाल आणि एखाद्या दिवशी सेवा राहून गेली असेल तर तुमच्या लक्षात येईल किंवा स्वामींची सेवा आता पूर्णपणे त्यांनी सोडून दिले आहे.

ते हे नेहमीच अनुभवत असतील. स्वामींची सेवा कधी सोडायची नाही. नाहीतर आपण आपल्या ध्येया पासून भरकटतो. आपण स्वामींच्या हात धरला तर ते आपल्याला खूप वर पर्यंत घेऊन जातात. आपणाला यशस्वी बनवतात आपल्या नेहमी पाठीशी राहतात. अनेक अडचणीतून बाहेर काढतात. हा माझा अनुभव आहे.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची उत्तरे अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment