Wednesday, December 6, 2023
Homeजरा हटकेनोकरीत बढती मिळविण्यासाठी करा हे खास उपाय..!!

नोकरीत बढती मिळविण्यासाठी करा हे खास उपाय..!!

मित्रांनो, आपण सर्वांनी बर्‍याच वेळा अनुभवले असेल, की कठोर परिश्रम करूनही आपल्याला यश मिळत नाही. फारच कमी लोकांना त्यांच्यान कठोर परिश्रमांचे योग्य ते फळ मिळते.

आणि आज ते यशाच्या उंच शिखरावर आहेत, परंतु आपण कितीही कष्ट केले तरी काही फायदा नाही. अशा परिस्थितीत काही खास उपाय, मंत्र आणि साधनेद्वारे बरेच काही करता येऊ शकते.

होय, आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत, जे उपाय तुम्ही एकदा केले तर यश तुमच्या पायाशी येईल आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हाल. चला तर मग मित्रांनो, ते उपाय जाणून घेऊया…

असे म्हणतात की,

शक्य असेल थर दररोज पक्ष्यांना धान्याचे दाणे खाऊ घालावे. तसेच रोज मंदिरात जावे, आणि देवाचे दर्शन घ्यावे कारण यामुळे सर्व अशुभ ग्रहांचा परिणाम दूर होतो.

प्रत्येक शुक्रवारी तांदूळाचे दान केले पाहिजे आणि लक्ष्मीजींची पूजा केली पाहिजे, याचा आपल्याला विशेष फायदा होत असतो.

हनुमान चालीसाचे आणि सुंदरकांड देखील दररोज पठण केले पाहिजे कारण यामुळे शत्रूंचा पराभव निश्चित होईल आणि तुमची सर्व कामे देखील पूर्ण होतील.

शनिवारच्या दिवशी काळे अथवा निळे कपडे घालावे आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा, याचा सुद्धा बराच फायदा होईल.

शास्त्र वचनांनुसार असेही म्हटले जाते की, पीठाचे लहान गोळे बनवून माशांना दररोज खायला घालावे कारण यामुळे शनि, राहू, केतू यांचे आपल्या कुंडलीतील अशुभ परिणाम दूर होण्यास मदत होते.

जर आपण दररोजच्या स्वयंपाकामध्ये सकाळी चपात्या बनवत असाल तर त्यातून एक प्रथम गायीसाठी बनवावी आणि संध्याकाळच्या वेळी कुत्र्यासाठी बनवावी.

असे केल्याने तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. या उपायाने भगवंताचे आशिर्वाद सुद्धा आपल्याला लाभतात.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स